Current affairs | Evening News Marathi
Current affairs 12 June 2020 Marathi |
12 जून मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
दोन थरांची मालवाहू रेलगाडी चालवून भारतीय रेल्वेने निर्माण केला नवा जागतिक आदर्श
भारतीय रेल्वेनी पहिल्यांदाच कॉन्टॅक्ट वायरची 7.57 मीटर इतकी जास्त उंची असलेले ओव्हर हेड इक्विपमेंट (OHE) बसवून आणि पश्चिम रेल्वेवरील विद्युतीकृत सेक्शनमध्ये दोन थरांची मालवाहू रेलगाडी चालवून एक नवा जागतिक आदर्श निर्माण केला आहे. या परिचालनाची यशस्वी सुरुवात 10 जून 2020 रोजी पालनपूर आणि गुजरातमधील बोताड स्थानकांपासून झाली.
ठळक बाबी
- संपूर्ण जगात अभूतपूर्व अशी पहिलीच कामगिरी आहे आणि त्यामुळे भारतीय रेल्वेचा नवा हरित उपक्रम म्हणून ‘हरित भारत’ मोहीमेला देखील चालना मिळणार आहे.
- या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय रेल्वेनी जास्त उंचीच्या OHE सेक्शनमध्ये जास्त उंचीवर पोहोचू शकणाऱ्या पेंटोग्राफच्या साहाय्याने दोन थरांची मालवाहू रेलगाडी चालवणारी पहिली रेल्वे बनण्याचा बहुमान मिळवला आहे.
- वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत कमी वेळेत, कमी खर्चात अधिकाधिक पुरवठा करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल ठरते.
भारतीय रेल्वे विषयी
भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातली सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातला विभाग असा रेल्वे विभाग हा भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो. रेल्वे खात्याचा कारभार कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे मंडळ करते.
भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ सन 1853 मध्ये झाला. सन 1947 पर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. सन 1951 मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.
भारतात पहिली रेलगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते.
1951 साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर, सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) त्यांची विभागणी करण्यात आली. यानुसार हैदराबादची निझाम रेल्वे, ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून 'मध्य रेल' असा विभाग बनवला. 'बॉम्बे बरोडा अॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे', सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून 'पश्चिम रेल्वे' विभाग बनवण्यात आला. उत्तर रेल्वे ही 'ईस्टर्न पंजाब रेल्वे' व जोधपूर रेल्वे, बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली. अवध, आसाम, तिरहुत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) स्थापन झाली. 'पूर्व रेल'मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि 'ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी' यांचा समावेश होता.
आज व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे 16 विभाग करण्यात आले आहेत. कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा दिला गेला आहे.
"आय फ्लोज – मुंबई": मुंबईसाठी पूर इशारा प्रणाली
“आय फ्लोज – मुंबई (IFLOWS-MUMBAI)” ही एक अत्याधुनिक एकात्मिक पूर इशारा प्रणाली म्हणून विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे मुंबईला विशेषत: अतिवृष्टीच्या घटना आणि चक्रीवादळासंबधी इशारा मिळण्यास मदत होऊ शकणार आहे.
पुराची पूर्वतयारी म्हणून लोकांना आधीच सतर्क केले जावे, जेणेकरून ते पूर येण्यापुर्वीच त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असावे या हेतूने ही यंत्रणा महत्त्वाची ठरते.
ठळक बाबी
- ‘आय-फ्लोज’ मॉड्यूलर रचनेवर तयार केले गेले आहे आणि त्यात माहितीचे एकीकरण, पूर, जलप्रलय, असुरक्षा, जोखीम, प्रसार मॉड्यूल आणि निर्णय पाठिंबा प्रणाली अशी सात मॉड्यूल (घटक) आहेत.
- या प्रणालीमध्ये नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकॉस्टिंग (NCMRWF), भारतीय हवामान विभाग (IMD), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) या संस्थांनी तयार केलेल्या ‘रेन गेज नेटवर्क’ स्टेशनवरील क्षेत्रीय माहिती, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि IMD, महापालिकेद्वारे प्रदान केलेल्या भू-वापरावरील पायाभूत सुविधा आदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
- हवामानाच्या मॉडेलच्या माहितीच्या आधारे, हायड्रोलॉजिकल मॉडेलचा वापर पर्जन्यवृष्टीच्या रूपरेषेत बदल करण्यासाठी आणि नदी प्रणालींना तो प्रवाह प्रदान करण्यासाठी केला जातो. हायड्रॉलिक मॉडेलचा उपयोग अभ्यासाच्या क्षेत्रात पुराचे मूल्यांकन करण्यासाठी पाण्याच्या हालचालीची प्रतिकृती तयार करण्यासाठी प्रवाहाच्या गतीची समीकरणे सोडविण्यासाठी केला जातो.
- मुंबई समुद्राशी जोडलेले आणि सात बेटांनी मिळून तयार झालेले एक शहर असल्याने शहरावरील भरती आणि वादळाचे परिणाम मोजण्यासाठी हायड्रोडायनामिक मॉडेल आणि वादळ वृद्धी मॉडेलचा उपयोग केला जातो. या प्रणालीमध्ये शहरातील गटारे शोधण्याची आणि पूरक्षेत्रांचा अंदाज बांधण्याची तरतूद या प्रणालीमध्ये आहे. महापालिका आणि IMD, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने NCCRने मिठी, दहिसर, ओशिवरा, पोइसर, उल्हास, तलाव आणि खाडी या सर्व नद्यांमधून बैथीमीटरी माहिती एकत्र केली आहे.
- पुरामुळे होणाऱ्या घटकांच्या असुरक्षा आणि जोखमीची गणना करण्यासाठी GIS तंत्र आधारित निर्णय समर्थन प्रणाली तयार केली आहे.
पार्श्वभूमी
तापमानात वाढ आणि हवामान बदलांमुळे परिणामी पावसाळ्यात होणाऱ्या बदलांमुळे भारतामध्ये अतिवृष्टीचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई या महानगराला अधूनमधून अनेकदा प्रदीर्घ कालावधीसाठी पुराचा अनुभव आला आहे. अलीकडेच 29 ऑगस्ट 2017 रोजी आलेल्या पुरामुळे हे शहर ठप्प झाले होते. यापूर्वी 26 जुलै 2005 रोजी देखील भयंकर पुर आला होता, जेव्हा 24 तासांच्या कालावधीत 100 वर्षांच्या कालवधीत सर्वाधिक 94 सेंटीमीटर पाऊस पडला होता आणि त्यामुळे संपूर्ण शहरच पूर्णपणे अधू झाले होते.
त्यामुळे, पूरग्रस्त शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र सरकारने भू-शास्त्र मंत्रालयाला “IFLOWS-MUMBAI” ही एकात्मिक पूर इशारा प्रणाली विकसित करण्याची विनंती केली होती.
No comments:
Post a Comment