Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 15 September 2020 Marathi 15 सप्टेंबर मराठी करेंट अफेयर्स
राष्ट्रीय अभियंता दिन: 15 सप्टेंबर
National Engineer Day: September 15
भारतात ‘अभियंता दिन’ हा 15 सप्टेंबरला साजरा केला जातो. 15 सप्टेंबर हा प्रसिद्ध अभियंते आणि राजकीय व्यक्तिमत्व मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे.
‘भारत रत्न’ विश्वैश्वरय्या यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्याचे भारत सरकारने ठरवले.
मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या विषयी
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म दिनांक 15 सप्टेंबर 1861 रोजी कर्नाटक राज्यातल्या मैसूर जिल्ह्यात एका तेलुगु कुटुंबात झाला. सर विश्वेश्वरैया 1881 साली बी.ए. परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मैसूर सरकारने उचलली आणि त्यांनी पुणे शहरात अभियात्रिकी विषयाचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे गुण आणि कौशल्य पाहून सरकारने त्यांना नाशिक येथे सहाय्यक अभियंता पदावर सेवेत दाखल करुन घेतले.
ते म्हैसूर शहराच्या वायव्य उपनगरातल्या कृष्णा राजा सागर धरणाचे मुख्य अभियंता होते. खाऱ्या पाण्यापासून विशाखापट्टणम बंदराची गंजण्याची समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग केला होता तसेच हैद्राबादसाठी पूर संरक्षण यंत्रणेची रचना देखील केली.
वर्ष 2021 ते वर्ष 2025 या कालावधीसाठी भारत ‘संयुक्त राष्ट्रसंघ महिला स्थिती आयोग (CSW)’चा सदस्य
Member of the United States of India (United States) (India)
आर्थिक व सामाजिक परिषद (ECOSOC) याचा एक भाग असलेल्या ‘संयुक्त राष्ट्रसंघ महिला स्थिती आयोग’ म्हणजेच ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ (CSW) या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे.
आशिया-प्रशांत प्रदेशासाठी भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी निवडणूक लढवली होती. त्यात भारत बहुमताने निवडून आला. वर्ष 2021 ते वर्ष 2025 या कालावधीसाठी भारत प्रतिष्ठित मंडळाचा सदस्य असणार.
‘संयुक्त राष्ट्रसंघ महिला स्थिती आयोग’ (CSW) विषयी
स्त्री-पुरुष समानतेचा प्रचार करण्यासाठी तसेच महिला सबलीकरणासाठी समर्पित असलेली ही एक प्रमुख वैश्विक आंतरसरकारी संस्था आहे. त्याची स्थापना 21 जून 1946 रोजी झाली. ही संस्था महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देते, जगभरातल्या महिलांच्या जीवनाचे वास्तव अधोरेखित करते आणि स्त्री-पुरुष समानतेला पाठिंबा देते. निवडण्यात आलेले 45 देश आयोगाचे सदस्य म्हणून एकावेळी कामकाज पाहतात.
No comments:
Post a Comment