Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 16 September 2020 Marathi 16 सप्टेंबर मराठी करेंट अफेयर्स
जागतिक ओझोन दिन: 16 सप्टेंबर
1995 सालापासून दरवर्षी 16 सप्टेंबर या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांच्या नेतृत्वात जगभरात "आंतरराष्ट्रीय ओझोन दिन" किंवा “आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिन” साजरा केला जातो.
2020 साली आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिनाचा विषय “ओझोन फॉर लाइफ” हा आहे.
ओझोन वायू
ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे. ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र ‘O3’ असे लिहितात. ओझोन वायूचा थर ही सूर्यापासून निघणार्या धोकादायक किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणारी एक नैसर्गिक ढाल आहे, ज्यामुळे ग्रहावरचे जीवन टिकवण्यास मदत होते.
क्रिस्टियन फ़्रेड्रिक स्कोएनबेन या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने 1840 साली ओझोनचा शोध लावला. 1913 साली फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्री बुइसन यांनी पृथ्वीवरील ओझोन थराचा शोध लावला. 1930 साली भौतिकशास्त्रज्ञ सिडनी चॅपमॅन यांनी ओझोनचा थर तयार होण्याची प्रक्रिया शोधून काढली.
ओझोन हा वातावरणात मुख्यत: दोन थरांमध्ये आढळतो. जमिनीपासून 10-16 किमीपर्यंतचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर (troposphere) आणि त्यावरील 50 किमीचा थर हा स्थितांबर (stratosphere) म्हणून ओळखला जातो. ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक असते. ओझोन हा हरितगृह वायू (greenhouse gas) असल्यामुळे तो तपांबराचे व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढविण्यासही कारणीभूत होऊ शकतो. स्थितांबरातील (stratosphere) ओझोन सूर्यकिरणांतील अतिनील (ultraviolet or UV) किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो. अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होणे, गुणसूत्रांचे उत्परिवर्तन होणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात. शिवाय पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो.
ओझोन थर कमी करण्यास प्रामुख्याने क्लोरोफ्लुरोकार्बन (CFC) आणि इतर काही रसायने कारणीभूत ठरतात. यामुळे ओझोन थराच्या संरक्षणासाठी 16 सप्टेंबर 1987 रोजी कॅनडातील मॉन्ट्रियल शहरात जगभरातल्या प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षर्या केल्या. हा करार ओझोनच्या थरास हानीकारक ठरणार्या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा होता. मॉन्ट्रियल करारामधून CFC च्या उत्पादनावर बंदी आणणे, त्यांना पर्यायी रसायने शोधणे वगैरे उपाययोजना आखली गेली. या करारातील अटी 1989 सालापासून लागू झाल्या. भारताने 1992 सालापासून मॉन्ट्रियल करारातल्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली.
कृष्णा-गोदावरी खोऱ्यात मिथेन इंधनाचा साठा आहे: एक शोध
संपत चाललेल्या जीवाश्म इंधनाला एक पर्याय म्हणून स्वच्छ ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध भारतीय भूप्रदेशात लागला आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत असलेली आघरकर संशोधन संस्थेनी केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, कृष्णा-गोदावरी खोऱ्यात ‘मिथेन हायड्रेट’ साठ्याचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे मिथेन या नैसर्गिक वायूचा पुरेसा पुरवठा होऊ शकतो.
ठळक बाबी
- मिथेन स्वच्छ आणि स्वस्त इंधन आहे.
- अंदाजानुसार, एक क्युबिक मीटर मिथेन हायड्रेटमध्ये 160-180 क्युबिक मीटर मिथेन असते. त्यानुसार, खोऱ्यातला मिथेन हायड्रेटसचा अगदी कमी अंदाज केला तरी, ते जगातल्या जीवाश्म इंधन साठ्यांच्या तुलनेत दुप्पट आहे.
- खोऱ्यात आढळलेले मिथेन हायड्रेट साठे बायोजेनिक मूळ असलेले आहेत. हायड्रोजन-बंधित पाणी आणि मिथेन वायू सागरामध्ये उच्च दाब आणि कमी तापमानाला एकत्र आले असता मिथेन हायड्रेटची निर्मिती होते.
- मिथेन हायड्रेट म्हणून सांधलेल्या बायोजेनिक मिथेनची निर्मिती करणार्या मिथेनोजेन शोधून काढले गेले आहे, जे ऊर्जेचे महत्त्वपूर्ण स्रोत असू शकते.
कृष्णा-गोदावरी खोरे
20 हजार चौरस किलोमीटर एवढ्या भूमी क्षेत्रात तसेच बंगालच्या उपसागराच्या 24 हजार चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात 2000 किलोमीटर एवढ्या आईसोबाथ (पाण्याच्या खोलीच्या समसमान ठिकाणी जोडली जाणारी नकाशावरील रेषा) पर्यंत कृष्णा-गोदावरी खोरे विस्तारलेले आहे.
हा एक क्रॅटॉनिक फॉल्ट भूभाग आहे तसेच ईशान्य-नैऋत्य फॉल्टद्वारे मर्यादित आहे, ज्याला वायव्येकडील प्रणाहिता-गोदावरी ग्रॅबेन आणि पश्चिमेस कुडप्पा खोरेपासून वेगळे करते.
No comments:
Post a Comment