Current affairs | Evening News Marathi
Current affairs 11 June 2020 Marathi |
11 जून मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
जागतिक बँकेचा “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट: जून 2020” अहवाल
जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाच्या अहवालाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे.
अहवालानुसार -
- 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 3.2 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.
- महामारीमुळे झालेल्या नुकसानामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 5.2 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे. महामारीमुळे उद्भवलेली मंदी ही 1870 सालानंतर पहिल्यांदाच पाहिली गेली आहे.
- 2020 साली महामारीमुळे देशांतर्गत मागणी व पुरवठा, व्यापार आणि वित्तपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक क्रियाकलापांमध्ये सात टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.
- 2020-21 या आर्थिक वर्षात उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्था 2.5 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे, जे की गेल्या 60 वर्षांत प्रथमच पाहिले गेले आहे.
- दरडोई उत्पन्नात 3.6 टक्क्यांनी घट होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे यावर्षी कोट्यवधी लोक अत्यंत दारिद्र्यात ढकलले जाणार आहेत.
- सध्याच्या अंदाजानुसार महामारीच्या मंदीमुळे जागतिक दरडोई GDP मध्ये 6.2 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.
- जागतिक व्यापार, पर्यटन, वस्तूंच्या निर्यातीवर आणि बाह्य वित्तपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणाऱ्या देशांना महामारीचा सर्वात मोठा फटका बसत आहे.
- वर्ष 1870 नंतर 1876, 1885, 1893, 1908, 1914, 1917-21, 1930-32, 1938, 1945-46, 1975, 1982, 1991, 2009 आणि 2020 या वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेने 14 वेळा जागतिक मंदी अनुभवली आहे.
विविध व्यवसायात युवांना प्रशिक्षण देण्यासाठी NFLचा ITI सोबत करार
केंद्र सरकारच्या "स्किल इंडिया" उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय खते मर्यादित (NFL) या केंद्रीय खते विभागाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमाने कारखान्याजवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबत (ITI) करार करीत आहे.
या कराराच्या अंतर्गत युवांना विविध व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षित केले जाणार आहे, ज्यामुळे अवजड आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रात असलेली त्यांच्या रोजगाराच्या संधीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
ठळक बाबी
- पंजाबमधल्या NFLच्या नांगल प्रकल्पाने तरुणांना 12 प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी ITI, नांगल या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. ड्युअल सिस्टम ऑफ ट्रेनिंग योजनेच्या अंतर्गत या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्याअंतर्गत ते संस्थेत सैद्धांतिक कौशल्ये आणि NFL नांगल प्रकल्पात प्रत्यक्ष नोकरीचे प्रशिक्षण घेऊ शकणार.
- ITI संस्थेसोबत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर NFL पंजाब राज्यात असा पुढाकार घेणारी सार्वजनिक क्षेत्रातली पहिली कंपनी बनली आहे.
- संस्थांमधून अधिकाधिक तरुणांना प्रशिक्षण देऊन ‘कुशल भारत’ अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यात असे आणखी पर्याय शोधण्याची कंपनीची योजना आहे.
राष्ट्रीय खते मर्यादित (NFL) विषयी
ही एक मिनीरत्न कंपनी आहे. ही भारतातली रासायनिक खते, सेंद्रिय खते आणि औद्योगिक रसायनांचे उत्पादन घेणारी सार्वजनिक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 23 ऑगस्ट 1974 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय नोएडा येथे आहे.
NFLचे नैसर्गिक वायूवर आधारित पाच अमोनिया-युरिया प्रकल्प आहेत. पंजाबमध्ये नांगल आणि भटिंडा प्रकल्प, हरयाणामध्ये पानिपत आणि मध्यप्रदेशात गुणा जिल्ह्यात विजयपूर येथे दोन प्रकल्प आहेत.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) विषयी
औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे ही विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण महासंचालक अंतर्गत स्थापन करण्यात आलेली माध्यमिक स्तरानंतरच्या शाळा आहेत. संघटनेची स्थापना 1950 साली झाली.
No comments:
Post a Comment