Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, September 14, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 14 September 2020 Marathi 14 सप्टेंबर मराठी करेंट अफेयर्स

    Views

     

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 14 September 2020  Marathi
      14 सप्टेंबर  मराठी करेंट अफेयर्स



    भारतीय संशोधकांनी 400 जायंट रेडिओ गॅलक्सी (GRGशोधल्या

    विश्वातल्या सर्वात मोठ्या एकल अंतराळ घटकांचा म्हणजेच जायंट रेडिओ गॅलक्सी (GRG) यांचा एक संपूर्ण नकाशा आणि एकात्मिक माहिती संग्रह तयार करण्याच्या प्रयत्नात खगोलशास्त्रज्ञ आहेत.

    इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA), पुणे आणि नेदरलँडच्या लिडेन विद्यापीठ यांच्या संशोधकांच्या चमूने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. प्रतीक दाभाडे हे चमूचे नेतृत्व करीत आहेत.

    जायंट रेडिओ गॅलक्सी (GRGम्हणजे काय?

    विशिष्ट परिस्थितीत रेडिओ आकाशगंगांचा काही अंश विशाल स्वरूपात वाढतो म्हणजेच मेगा-पार्सेक माप (दशलक्ष प्रकाश वर्ष या गणनेत) वाढतो त्याला जायंट रेडिओ गॅलक्सी (GRG) म्हणतात. (एक प्रकाश वर्ष = 9.46 लक्ष कोटी किलोमीटर)

    ठळक बाबी

    • IUCAA, पुणेच्या शास्त्रज्ञांना 1974 साली शोधल्या गेलेल्या सुमारे 300 GRG नंतर 2016 सालापर्यंत आतापर्यंत जवळजवळ 400 GRG आढळलेल्या आहेत.
    • वर्तमानात, जगभरात अश्या एकूण 820 GRG शोधून काढण्यात आलेल्या आहेत.
    • प्रथमच GRG आकाशगंगांचा एवढ्या मोठ्या स्वरूपात माहिती संग्रह करण्यात आला आहे. याचा वापर करून त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जात आहे, ज्यामुळे अशा वस्तूंविषयीची समज अनेक पटीने वाढली आहे.




    हिंदी दिन: 14 सप्टेंबर

    14 सप्टेंबर 1949 रोजी भारताने त्याची अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा अवलंब केल्याच्या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ दरवर्षी 14 सप्टेंबर या दिवशी ‘हिंदी दिन’ साजरा केला जातो.

    पार्श्वभूमी

    हजारी प्रसाद द्विवेदी, मैथिली शरण गुप्ता आणि काका कालेलकर यांच्यासारख्या दिग्गजांसोबत हिंदीच्या बाजूने लढा देणारे प्रसिद्ध हिंदी विद्वान लेखक व्योहार राजेंद्र सिंहा यांच्या अग्रणी प्रयत्नांमुळे, 14  सप्टेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाने भारतीय संविधान संघटनेची अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार केला.

    • 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 343 यानुसार देवनागरी लिपीमध्ये लिहिलेल्या हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले गेले.
    • हिंदी ही जगातली मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा असून 520 दशलक्षाहून अधिक लोकांची प्रथम भाषा आहे.
    • संविधानिक मान्यता प्राप्त 23 अधिकृत भाषा - आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मणीपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलगू, उर्दू आणि इंग्रजी (अतिरिक्त कार्यालयीन भाषा).

    No comments:

    Post a Comment