Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 June 2020 Marathi |
13 जून मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा संयुक्त ‘विज्ञान दळणवळण मंच’
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने विविध सार्वजनिक क्षेत्रातल्या विज्ञान दळणवळण संस्था आणि शाखांमध्ये संवाद, सहकार्य आणि समन्वय साधण्याच्या उद्देशाने एक संयुक्त ‘विज्ञान दळणवळण मंच’ स्थापन केला आहे.
मुख्य बाबी
- हा मंच विविध संस्थांमध्ये सुरु असलेले विज्ञान दळणवळणाच्या (संप्रेषण) प्रयत्नांना एकत्र आणतो आणि राष्ट्रीय धोरण दळणवळणाच्या आराखड्याकडे लक्ष वेधून व्यापक पातळीवर सामान्य धोरण आणि उत्तम पद्धती अवलंबण्यास मदत करू शकतो.
- विज्ञान व तंत्रज्ञान व्यतिरिक्त कृषी, आरोग्य, संस्कृती, संरक्षण, अंतराळ, अणुऊर्जा आणि माहिती व प्रसारण यासह विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी यांचे प्रतिनिधित्व येथे आहे.
- हा मंच देशातील मॅक्रो (वृहत) आणि सूक्ष्म दोन्ही स्तरावर विज्ञान दळणवळण कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीची आणि योजनांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात कार्य करणार, ज्यामुळे विज्ञानाबद्दल जनजागृती वाढणार आणि मोठ्या प्रमाणात विज्ञानात रस निर्माण होण्यात मदत होणार आहे.
- विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दळणवळण (NCSTC) सचिवालय मंचाला सहकार्य देणार आहे. NCSTC देशातल्या विविध संस्था, कार्यक्रम आणि विज्ञान संप्रेषण केंद्रित उपक्रमांच्या समन्वयासाठी कार्य करते. ही परिषद विज्ञान समजून घेणे आणि लोकांमध्ये विज्ञानाची रूची वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशभरात कार्यक्रम आयोजित करणे, देशातील विज्ञान संप्रेषण आणि विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी धोरणे आणि इतर क्रियाकलापांचे आयोजन करण्याची देखील जबाबदारी आहे.
पार्श्वभूमी
विज्ञान दळणवळणासाठी भारताची मजबूत संघटनात्मक रचना आहे. विज्ञान दळणवळणाच्या विकासासाठी कमीतकमी पाच राष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत - राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आणि सूचना स्रोत संस्था (1951), होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (1974), राष्ट्रीय विज्ञान वस्तुसंग्रहालय परिषद (1978), राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दळणवळण परिषद (1982), आणि विज्ञान प्रसार (1989).
याव्यतिरिक्त, विविध वैज्ञानिक संस्थांचे त्यांचे विज्ञान दळणवळण विभाग आहेत. यामध्ये विज्ञान प्रसार एकक (CSIR), कृषी ज्ञान व्यवस्थापन संचालनालय (ICAR), प्रकाशने व माहिती विभाग (ICMR), जनसंपर्क संचालनालय (DRDO), जन जागरूकता विभाग (DAE), मीडिया आणि जनसंपर्क कार्यालय (ISRO), विज्ञान कक्ष, आकाशवाणी इत्यादीचा समावेश आहे.
या संस्था विज्ञान दळणवळणात हातभार लावण्यासाठी आणि त्यांचे मत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध पद्धती आणि माध्यमांचा उपयोग करीत आहेत. तथापि, सामान्य धोरणे विकसित करण्यासाठी आणि व्यापक स्तरावर सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी संवाद आणि एकत्रीकरणासाठी यामध्ये पुरेसा वाव आहे. देशव्यापी कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करणे आवश्यक आहे. त्यातून राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आराखडा उभा होऊ शकतो.
'आरोग्यपथ': आरोग्यसेवा पुरवठा साखळीत आपत्कालीन पुरवठ्याच्या वास्तविक-वेळेत उपलब्धतेसाठी संकेतस्थळ
आपत्कालीन आरोग्य सेवेचा पुरवठा वास्तविक वेळेत उपलब्ध व्हावा, या उद्देशाने वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) 'आरोग्यपथ' या नावाने एक राष्ट्रीय आरोग्यसेवा पुरवठा साखळी संकेतस्थळ कार्यरत केले आहे. उत्पादक, पुरवठादार आणि ग्राहकांना हे व्यासपीठ सेवा पुरविणार.
कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या राष्ट्रीय आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीत, जिथे पुरवठा साखळीत चिंताजनक व्यत्यय येत आहे, तिथे आपत्कालीन आरोग्यसेवा उत्पादन आणि वितरण क्षमतेशी विविध कारणांमुळे तडजोड केली जाऊ शकते. या आव्हानांना सामोरे जाताना एखाद्याला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याच्या दृष्टीकोनातून "आरोग्यपथ" नावाचे माहिती व्यासपीठ विकसित केले गेले आहे.
ठळक बाबी
- महत्वपूर्ण आरोग्य सेवांची उपलब्धता एकाच ठिकाणी प्रदान करणारे हे एकात्मिक सार्वजनिक व्यासपीठ ग्राहकांना नियमितपणे अनुभवाला येणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यात देखील उपयुक्त ठरू शकते.
- या समस्यांमध्ये मर्यादित पुरवठादारांवर अवलंबून असणे, चांगल्या प्रतीची उत्पादने ओळखण्यासाठी वेळ घेणारी प्रक्रिया, अपेक्षित वेळेत वाजवी दराने प्रमाणित उत्पादनांचा पुरवठा करणार्या पुरवठादारांना मर्यादित प्रवेश, नव्याने सुरु झालेल्या उत्पादनांच्या संदर्भात जागरूकता नसणे, इत्यादी समस्यांचा समावेश आहे.
- रोगनिदान प्रयोगशाळा, वैद्यकीय दुकाने, रुग्णालये इत्यादींसारख्या संभाव्य मागणी केंद्रांमधील संपर्कातील अंतरांवर मात करुन हे उत्पादक आणि पुरवठादारांना विविध ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचण्यास मदत करते.
No comments:
Post a Comment