Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, September 1, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 1 September 2020 Marathi | 1 सप्टेंबर मराठी करेंट अफेयर्स

    Views

     20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 1 September 2020  Marathi |
       1 सप्टेंबर  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स


    देशातली पहिली बंगळुरू-सोलापूर ‘रो-रो’ रेल्वेसेवा कार्यरत

    मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या हस्ते 30 ऑगस्ट 2020 रोजी पहिल्या "रोल ऑन रोल ऑफ' (रो-रो) रेल्वे सेवेचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन करण्यात आले. ही सेवा बंगळुरू (नेलमंगला) आणि सोलापूर (बाळे, महाराष्ट्र) या शहरांच्या दरम्यान आहे.

    ठळक बाबी

    • अत्यावश्‍यक वस्तूंची जलद वाहतूक करण्यासाठी रेल्वे मंडळाने एप्रिलमध्ये बंगळुरू (नेलमंगला) ते सोलापूर (बाळे, महाराष्ट्र) पर्यंत पहिल्या "रोल ऑन रोल ऑफ' (रो-रो) सेवेला मान्यता दिली होती.
    • रो-रो सेवा मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि नैर्ऋत्य रेल्वे या तिन्ही विभागात कार्यरत केली जाणार आहे. प्रत्येक फेरीसाठी सहा दिवस लागणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आवश्‍यक त्या राज्यामध्ये ही सेवा पोचविली जाणार आहे.
    • रेल्वे वाहतुकीद्वारे रो-रो सेवांच्या माध्यमातून मालवाहू वाहनांची वाहतूक केली जाणार आहे. एका फेरीत 42 ट्रक वाहून नेण्याची क्षमता असणार.
    • चालक आणि एक व्यक्ती ट्रकसोबत प्रवास करू शकते. त्यांना प्रवासासाठी द्वितीय श्रेणीची तिकीटे खरेदी करावी लागणार आहेत.
    • एकूण 682 किमी लांबीच्या रेल्वेमार्गावर 1,260 टन वाहनवाहू क्षमता असणार. प्रत्येक ट्रक किंवा लॉरीतून 30 टन मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

    या योजनेच्या माध्यमातून सोयीस्कर, अडथळामुक्त, स्वस्त व पर्यावरणपूरक वाहतूक करता येणार आहे. सेवेच्या माध्यमातून कृषी, उद्योग, रसायन इत्यादि क्षेत्रांना लाभ मिळणार आहे.


    राजीव कुमार: नवीन निवडणूक आयुक्त

    भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी पदभार स्वीकारला.

    राजीव कुमार भारतीय प्रशासनिक सेवेमधले 1984 च्या तुकडीतले अधिकारी आहेत. त्यांनी 36 वर्षांपेक्षा जास्त काळ भारत सरकारमध्ये सेवा केली आहे.

    ठळक बाबी

    • राजीव कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्याबरोबर काम करणार.
    • राजीव कुमार 24 वे निवडणूक आयुक्त आहेत.
    • अशोक लवासा यांची आशियाई विकास बँक (मनिला, फिलीपीन्स) येथे उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ही नियुक्ती झाली.

    भारतीय निवडणूक आयोग (ECI) विषयी

    भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.

    घटनात्मक तरतुदी

    • कलम 324: ही तरतूद आयोगाच्या कार्यप्रणालीविषयी आहे. आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.
    • कलम 325: संसद आणि राज्य विधानसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रादेशिक मतदारसंघासाठी एक सार्वत्रिक निवडणूक होणार. धर्म, वंश, जात किंवा लैंगिकतेच्या आधारावर निवडणूक चालवली जाणार.
    • कलम 326: लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांसाठी निवडणुकीच्या आधारावर प्रौढ मताधिकारांच्या संदर्भात आहे.
    • कलम 327: निवडणुकीच्या संदर्भात प्राधान्य देण्यासाठी संसदेला अधिकार देते.
    • कलम 328: निवडणुकीच्या संदर्भात कायदे तयार करण्याचे अधिकार राज्य विधानसभेला देते.
    • कलम 329: निवडणुकीच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप प्रतिबंधित करते.

    संविधानानुसार, उमेदवाराला मनाई करण्यास आयोगाला शक्ती आहे, जर ती व्यक्ती निवडणुकीचा खर्च नोंदविण्यात अपयशी ठरणार.

    आयोगाची संरचना आणि जबाबदारी

    आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.

    निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आचारसंहिता पाळणे प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवारांसाठी बंधनकारक असते. यालाच ‘आदर्श आचारसंहिता’ (Model Code of Conduct –MCC) म्हणून देखील ओळखले जाते. आदर्श आचारसंहिता हे निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या आचरणासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारा तयार केलेली मार्गदर्शके आहेत.

    No comments:

    Post a Comment