Current affairs | Evening News Marathi
Current affairs 1 February 2020 Marathi |
1 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
नेपाळने जगाच्या उंचस्थानी फॅशन शो आयोजित करण्याचा विश्वविक्रम केला
26 जानेवारी 2020 रोजी नेपाळ या देशाने समुद्रसपाटीपासून सर्वोच्च उंचीवर फॅशन शोचा कार्यक्रम आयोजित केला आणि नवा विश्वविक्रम केला आहे.
हा कार्यक्रम एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळ काला पत्थर येथे 5340 मीटर (17515 फूट) उंचीवर आयोजित करण्यात आला होता. या घटनेची नोंद गिनीज ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड या पुस्तकात झाली.
“माउंट एव्हरेस्ट फॅशन रनवे” नावाचा हा कार्यक्रम नेपाळ पर्यटन विभागाच्या समर्थनाने RB डायमंड्स आणि KASA स्टाईल या कंपन्यांनी आयोजित केला होता. इटली, फिनलँड, श्रीलंका आणि सिंगापूरसह जगातल्या विविध भागातून आलेल्या मॉडेल लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला.
नेपाळ देश
नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन देशाची सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. नेपाळ हा आयताक्रुती राष्ट्रध्वज नसलेला जगातला एकमेव देश आहे. काठमांडू हे नेपाळचे राजधानी शहर आहे आणि नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.
उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातल्या सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातले सर्वोच्च शिखर म्हणजेच ‘एव्हरेस्ट’ नेपाळमध्ये आहे.
DRDO गुजरात विद्यापीठात एक तंत्रज्ञान केंद्र उभारणार
संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एक तंत्रज्ञान केंद्र उभारणार आहे. त्यासाठी गुजरात विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे.
विद्यापीठात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटर फॉर एक्सटेंशन अँड रिसर्च अँड इनोव्हेशन (CERI) नावाने हे केंद्र उभारण्याची शक्यता तपासून पाहिली जात आहे.
पुढच्या आठवड्यात DRDO विद्यापीठातल्या पायाभूत सुविधा पाहण्यास आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाशी कसे सहयोग करावे आणि विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग कसा असावा हे पाहण्यासाठी एक पथक पाठवविणार आहे.
DRDO विषयी
संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ही भारत सरकारची एक संस्था आहे, ज्याकडे लष्करी क्षेत्रात संशोधन आणि विकासाची जबाबदारी आहे. संस्थेची स्थापना वर्ष 1958 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पनातील महत्त्वाचे मुद्दे
• टीबी हारेगा , देश जितेगा हे मिशन राबविण्यात येणार
• २०२५ पर्यत टीबी हटविण्याचा सरकारचा उद्देश
• १२ आजारांसाठी मिशन इंद्रधनुष योजना . गरिबांसाठी ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण राबविणार
• इलेक्ट्रॉनिक उत्पादन वाढीवर भर देणार ५ नवी स्मार्ट शहरे बनविणार
• सर्व जिल्ह्यांमध्ये स्वस्त औषध केंद्र उभारणार चेन्नई - बंगळूर , दिल्ली - मुंबई दरम्यान एक्स्प्रेस हायवे सुरु करणार
• तेजससारख्या रेल्वेगाड्या पर्यटन स्थळांशी जोडणार
• सागरी किनारी दोन हजार किमीचे रस्ते उभारणार
•२०२४ पर्यत नवी शंभर विमानतळे उभारण्यात येणार
• कर चोरी करणाऱ्यांविरोधात कायदा आणणार
• ५ पुरातत्व ठिकाणांचा विकास करणार
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment