Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, May 24, 2018

    Nicolaus Copernicus निकोलस कोपर्निकस _पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ स्मृतिदिन - मे २४,१५४३

    Views
     Nicolaus Copernicus | निकोलस कोपर्निकस

    पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

    स्मृतिदिन - मे २४,१५४३
                   निकोलस कोपर्निकस (जन्म - फेब्रुवारी १९,१४७३ - 
     मृत्यु - मे २४,१५४३) हे पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी ग्रहमालेचा अभ्यास व निरीक्षणातून महत्वाचे सिद्धान्त मांडले. यानुसार सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला. परंपरागत धार्मिक विचारांनुसार पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू असून सूर्य प्रुथ्वीभोवती फिरतो या रूढ समजूतीस कोपर्निकसने धक्का दिला. त्यामुळे धर्मसंस्थेने त्यांना पाखंडी ठरवून त्यांचे विचार दडपण्याचा प्रयत्न केला.
    जन्म व बालजीवन
                 कोपर्निकस यांचा जन्म १९ फेब्रुवारी १४७३ रोजी पोलंडच्या टॅारन या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोपरनाइड व आईचे नाव बार्बारा होते. दोन मुले व दोन मुलींत कोपर्निकस सर्वांत लहान होते.
    कोपर्निकस दहा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे मामा लुकास यांच्या देखरेखीखाली झाले.

    No comments:

    Post a Comment