Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, July 6, 2017

    भारत-चीन वादाला कारणीभूत ठरलेलं सिक्किम प्रकरण आहे तरी काय?

    Views
    भारत-चीन वादाला कारणीभूत ठरलेलं सिक्किम प्रकरण आहे तरी काय?

             भारत आणि चीनमध्ये सध्या प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. भारतावर दबाव आणण्यासाठी चिनी नौदलाने हिंदी महासागरात युद्धनौका आणि पाणबुडी तैनात केली आहे. सामरिकदृष्ट्या भारताला अडचणीत आणू पाहणाऱ्या चीनने चिथावणीखोर भाषेचा वापर करत भारताला आव्हान देण्याचादेखील प्रयत्न केला आहे. सिक्किमच्या सीमेवरुन सुरु झालेला दोन्ही देशांमधील तणाव आता थेट हिंदी महासागरापर्यंत पोहोचला आहे. मात्र ज्यामुळे चीनकडून थेट युद्धखोरीची भाषा केली जाते आहे, तो सिक्कीममधील वाद नेमका आहे तरी काय, हे आपण जाणून घेणार आहोत.

    – डोक्लाम नावाने ओळखला जाणारा प्रांत भारत, भूतान आणि चीन असा तीन देशांत वाटला गेला आहे. तिबेटी ल्हासास जोडणारा चीनचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावित रेल्वे मार्ग या प्रांतातून जातो. तसेच या प्रांतातून रस्ते महामार्गाचीही चीनची योजना आहे. त्याच हेतूने चीनने गेल्या महिन्यात पहिल्यांदा या प्रांतात हलके घुसखोरी सुरू केली.

    – डोक्लाम डोंगरापाशी चीन- भारत- भूतान अशी तिहेरी सीमा आहे. यातील ८९ चौरस किमीच्या पठारावर आपलीच मालकी असून त्यामुळे रस्ता वा रेल्वेउभारणी करण्याचा आपल्याला हक्क आहे, असा चीनचा दावा आहे.

    – मागील आठवड्यात चीनकडून भारत, चीन आणि भूतान सीमेवरील भारतीय लष्कराचे बंकर बुलडोझरच्या मदतीने काढून टाकण्यात आले. याआधी चीनने भारतीय लष्कराला बंकर हटवण्यास सांगितले होते. मात्र भारतीय जवानांनी दाद दिली नाही. त्यामुळे चीनने थेट बुलडोझरच्या मदतीने भारतीय बंकर उद्ध्वस्त केले. मात्र चीनने यासाठी बुलडोझरचा वापर केला, हा दावा भारताने फेटाळून लावला.

    – यानंतर ‘भारताने १९६२ च्या युद्धातील पराभव विसरु नये,’ असा इशारा चीनकडून भारताला देण्यात आला. यानंतर शुक्रवारी (३० जून) भारताने चीनला उत्तर दिले. ‘भारत आता १९६२ चा भारत राहिलेला नाही. २०१७ मधील भारत वेगळा आहे,’ असे प्रत्युत्तर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी चीनला दिले.

    – २६ जून रोजी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक पत्रक काढण्यात आले होते. यामध्ये भारतीय जवानांनी सिक्किम सेक्टरमधील सीमारेषा ओलांडून चिनी हद्दीत घुसखोरी केली होती, असा उल्लेख होता. चीनचा हा दावा खोटा आणि चुकीचा असल्याचे भारताने म्हटले. सिक्किम आणि भूतान सीमेवर चीन येतच नाही, असेही भारताने म्हटले.

    – यानंतर सिक्किम सेक्टरमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (३० जून) महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत भारतीय जवान आणि चिनी लष्कराची उपस्थिती होती. चीन-भारत सीमेवर चीनकडून तयार करण्यात येत असलेल्या रस्त्याबद्दल यावेळी चर्चा झाली. सामरिकदृष्ट्या हा रस्ता चीनसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

    – भारत आणि चीनमध्ये सिक्किममध्ये तणाव निर्माण झाला असताना चीनकडून कैलास मानसरोवर यात्रा रोखण्यात आली. नाथू ला सीमेवरुन चीनने ५० भाविकांना मानसरोवर यात्रेला जाण्याची परवानगी नाकारली. दोन्ही देशांमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर चीनने हे पाऊल उचलले.

    – भारत आणि चीनमध्ये संघर्ष वाढत असताना भूतानने सुरुवातीला चीनवर कराराचा भंग केल्याचा आरोप केला. भूतानच्या भूमीवर रस्त्याची उभारणी करण्यासाठी करण्यात आलेल्या कराराचा भंग केल्याचा आरोप भूतानने सुरुवातीला केला. चीनने डोक्लाम भागातील रस्ते बांधणी थांबवावी, असेदेखील भूतानने म्हटले.

    – यानंतर चीनने लगेचच भूतानचा दावा खोडून काढला. ‘डोक्लाम प्रांतात गेल्या अनेक वर्षांपासून चिनी गुरे चरण्यासाठी जातात. त्यामुळे कित्येक वर्षांपासून डोक्लाम भाग चीनच्या अखत्यारित येतो. त्यामुळे या भागावर चीनचा हक्क आहे,’ असा दावा चीनने केला.

    – चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी सरकारची अधिकृत मांडत डोक्लामवर आपला दावा सांगितला. ‘डोक्लाम भागामुळे सध्या वाद सुरु आहे. हा भाग निर्विवादपणे चीनच्या नियंत्रणाखाली येतो,’ असे कांग यांनी म्हटले.

    – यानंतर भारत आणि चीनकडून सीमेवर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली. भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सिक्किमला भेट देत या भागाचा आढावा घेतला. रावत यांच्या भेटीमुळे चीनचा जळफळाट झाला. ‘युद्धाची परिस्थिती निर्माण करणे थांबवा,’ असा इशारा चीनकडून देण्यात आला. भारतीय सैन्याची कृती बेजबाबदार असल्याचेदेखील चीनने म्हटले.

    – ‘आम्ही अडीच सीमारेषांवर युद्धासाठी सज्ज आहोत,’ या भारतीय लष्करप्रमुखांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेतला. ‘भारतीय लष्करातील लोकांनी इतिहासापासून बोध घ्यावा आणि युद्धाची वातावरणनिर्मिती थांबवावी,’ असे चीनच्या लष्कराचे प्रवक्ते कोल वू कियान यांनी म्हटले.

    No comments:

    Post a Comment