Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, August 12, 2017

    जुलिअन डेट

    Views

    जुलिअन डेट
    (काॅपी-पेस्ट, दै लोकसत्ता)

    भारतात आणि इतरत्र आज जे कॅलेंडर मोठय़ा प्रमाणावर वापरले जाते त्याला ग्रेगोरिअन कॅलेंडर म्हटले जाते. याशिवाय जगात इतरही काही कॅलेंडर वापरली जात होती आणि आहेत. एकाच वेळेला अनेक कॅलेंडर वापरात असल्याने अनेकदा गोंधळ उडण्याची शक्यता असते. विशेषत: एखादी खगोलशास्त्रीय किंवा इतिहासविषयक घटना घडली तर तिची नोंद कोणत्या कॅलेंडरप्रमाणे करावयाची असा प्रश्न पडतो. यावर तोडगा म्हणून जुलिअन डेट ही कालमापन पद्धत अस्तित्वात आली.
    आता साहजिकच प्रश्न पडतो की या मापनाची सुरुवात केव्हा झाली असे समजायचे. त्या साठी इ. स. पू. १ जानेवारी ४७१३ या दिवसाचे दु. १२.०० ही वेळ आरंभबिंदू निश्चित करण्यात आली आहे. हीच तारीख निवडण्याचे कारण म्हणजे जगातील काही कॅलेंडरची सुरुवात या दिवशी झाली आहे.
    तसेच मानवी इतिहासातील कोणत्याही ठळक घटनेची नेमकी नोंद या तारखेच्या पूर्वी झालेली नाही.
           आज जगात ग्रेगोरिअन पद्धत मोठय़ा प्रमाणावर वापरली जात असली तरी त्यातही वेगवेगळे काल – विभाग (Time Zone) वापरले जातात हे आपल्याला माहीत आहे. भारतात असा एकच विभाग असला तरी अमेरिकेत मात्र अनेक विभाग आहेत.

         आंतरराष्ट्रीय वार रेषा पार करताना आपल्याला एक दिवस कमी/अधिक करावा लागतो तो वेळेतल्या या फरकामुळेच. त्यामुळे खगोलशास्त्रातील संशोधनात एखादी घटना नोंदविताना किंवा आलेख काढताना जुलिअन डेट ही संकल्पना वापरली जाते. ही तारीख काढण्यासाठी आता आज्ञावली उपलब्ध आहेत. आपण ग्रेगोरिअन कॅलेंडरप्रमाणे आजची तारीख टाकली की लगेच जुलिअन डेट मिळते. 

    उदा.१ डिसेंबर २०१६ दुपारी १२.०० (जागतिक वेळ) या क्षणाची जुलिअन डेट होती  २४५७७२३.५  समजा २४ जानेवारी २०१७ यादिवशी दुपारचे १२ वाजून ५ मिनिटे झालेली आहेत.  या क्षणाची जुलिअन डेट २४५७७७८.००२७८ इतकी असेल.या ठिकाणी जुलिअन वेळ असा शब्द न वापरता जुलिअन डेट असा शब्द वापरला आहे, कारण तसा प्रघात आहे. त्यामुळे जुलिअन डेट ही अपूर्ण आकडय़ात येऊ शकते.असे रूपांतर करून देणारी अनेक संकेत-स्थळे गुगलवर उपलब्ध आहेत. उपलब्ध आज्ञावली वापरून आपण उलट रूपांतरही करू शकतो.


    ➖➖➖➖➖➖

    कृपया  शेअर करुन विज्ञान प्रसार करा  !