Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, February 2, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 2 February 2020 Marathi | 2 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 2 February 2020  Marathi |
       2 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स


    जिवंत रोबोट झेनोबॉट्स (Xenobots)

    वैज्ञानिकांनी जैविक ‘स्टेम सेल’ पासून एक रोबोट तैय्यार केला आहे, ज्याला त्यांनी "झेनोबॉट्स" हे नाव दिले आहे. "झेनो" हा शब्द बेडकाची पेशी (झेनोपस लेव्हिज) पासून घेतला गेला आहे कारण त्याच पेशीपासून हा रोबोट तयार झाला आहे.
    या शोधात ईशान्य अमेरिकेतल्या टुफ्ट्स यूनिवर्सिटीचे अ‍ॅलन डिस्कव्हरी सेंटर आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हरमाँट इथल्या संशोधकांचा सहभाग आहे.
    झेनोबॉटची वैशिष्ट्ये
    • हे निसर्गासाठी “संपूर्णपणे नवीन जीवन-रूप” आहे.
    • झेनोबॉटची लांबी-रुंदी 1 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. ते 500-1000 जिवंत पेशींना एकत्र करून बनलेले आहे. ते विविध आकारात तयार करण्यात आले आहेत, असे की ज्यात चार पाय सुद्धा आहेत.
    • ते सरळ रेषेत किंवा गोलाकार पद्धतीने घरंगळत मार्गक्रम करू शकतात, एकत्र होऊ शकतात आणि लहान वस्तू हलवू शकतात.
    • पेशीतली ऊर्जा (cellular energy) वापरुन ते 10 दिवस जगू शकतात.
    झेनोबॉट्स बनविण्यासाठी महासंगणकाचा वापर करण्यात आला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांच्या आकाराविषयी तसेच कार्यांविषयी विविध संशोधन केले जात आहे.
    अश्या जैव-रोबोटमुळे मानवी, प्राणी आणि पर्यावरण-विषयक आरोग्य सुधारण्यात मदत होऊ शकते. हे यंत्र अतीसूक्ष्म प्लास्टिक गोला करून प्रदूषित महासागरे साफ करण्यासाठी वापरले जाऊ शकते. तसेच त्यांचा वापर विषारी किंवा किरणोत्सर्गी सामग्री इत्यादींसाठी मर्यादीत किंवा धोकादायक भागात प्रवेश करण्यासाठी केला जाऊ शकतो.
    मानवी शरीरात प्रवास करण्यासाठी ते सक्षम आहेत. ते चालतात आणि पोहू शकतात, काही आठवडे जेवण न करता जगू शकतात आणि एकत्र गटातही काम करतात.


    जागतिक पाणथळ भूमी दिन: 2 फेब्रुवारी

    दरवर्षी 2 फेब्रुवारी या दिवशी जगभरात 'जागतिक पाणथळ भूमी दिन’ (World Wetlands Day) पाळला जातो. यावर्षी हा दिवस ‘वेटलँड्स अँड बायोडायव्हर्सिटी’ या संकल्पनेखाली आयोजित केला गेला.
    पाणथळ भूमी हा समुद्र किंवा भूमीप्रदेश याजवळ सापडतो आणि तो हंगामीही असू शकतो. त्या प्रदेशात वर्षातले काही महीने किंवा बारमाही काळात पाणी भरलेले असते. ते पर्यावरणात एक महत्वपूर्ण भूमिका बजावतात जसे की, पुराचे पाणी सामावून घेतात, तिथे माश्यांना पाण्यातल्या वनस्पती अन्न म्हणून पुरवते, प्राण्यांना निवारा देते, तळाशी जमणारा गाळ काढून पाणी शुद्ध करते.
    इतिहास
    2 फेब्रुवारी 1971 साली इराण देशाच्या रामसार या शहरात झालेल्या ‘रामसार परिषद’मध्ये पाणथळ भूमीच्या संरक्षणार्थ तसेच संवर्धनासाठी जागतिक प्रयत्न करण्याच्या उद्देशाने ‘कॉन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स ऑफ इंटरनेशनल इम्पॉर्टेन्स’ (रामसार करारनामा म्हणून देखील ओळखला जातो) या वैश्विक करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. 'जागतिक पाणथळ भूमी दिन’ हा पहिल्यांदा 1997 साली पाळण्यात आला.
    जलप्रदेशातल्या जमिनी पृथ्वीवरील जैवविविधता राखण्यासाठी कश्या मदत करतात याविषयी विविध समाज माध्यमातून जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
    पाणथळ भूमीप्रदेशांचे संवर्धन करण्यावर लक्ष देण्यासाठी रामसार करारनाम्याच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या यादीत अलीकडेच भारतातल्या 10 पाणथळ प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातले नंदूर माधमेश्वर; पंजाबमधले बीस संरक्षित क्षेत्र, केशोपूर-मिआनी आणि नांगल; उत्तरप्रदेशातले पार्वती आग्रा, नवाबगंज, समसपूर, समन, सांदी आणि सरसाई नवर इथल्या 10 प्रदेशांचा त्यामध्ये समावेश आहे.
    आंतरराष्ट्रीय कराराच्या अंतर्गत भारतातल्या आता एकूण 37 ठिकाणांना मान्यता मिळालेली आहे. इतर प्रदेश प्रदेश राजस्थान, ओडिशा, केरळ, मध्यप्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू व काश्मीर, आंध्रप्रदेश, गुजरात, मणीपूर, तामिळनाडू आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये आहेत.


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स,

    No comments:

    Post a Comment