Current affairs | Evening News Marathi
Current affairs 31 January 2020 Marathi |
31 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
हॉकीपटू राणी रामपालला ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अॅथलीट’चा पुरस्कार
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिला या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अॅथलीट’चा पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अॅथलीट’ हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावणारी राणी रामपाल ही जगातली पहिली हॉकीपटू ठरली आहे.
या पुरस्काराची घोषणा ‘वर्ल्ड गेम्स’ या जागतिक संस्थेकडून करण्यात आली. राणी रामपालने 1 लक्ष, 99 हजार, 477 मते मिळवत या पुरस्काराच्या शर्यतीत अग्रस्थान पटकावले.
राणी रामपालला “भारतीय हॉकीची राणी” म्हटले जाते. तिने वयाच्या 15 व्या वर्षी भारतीय हॉकी संघात प्रवेश केला. 2020 साली रामपालला भारताच्या प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2009 आशिया चषकात तिचा भाग होता आणि त्या स्पर्धेत भारताने रौप्यपदक जिंकले होते.
‘संप्रीती-9’: भारत आणि बांग्लादेश यांच्यातला संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव
3 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2020 या कालावधीत मेघालयाच्या उमरोई गावात ‘संप्रीती-9’ नावाचा भारत आणि बांग्लादेश यांच्या भूदलांचा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित करण्यात आला आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्या भूदलांचा ‘संप्रीती’ या नावाने संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित केला जातो. यावर्षीचा कार्यक्रम हे या मालिकेतले नववे संस्करण आहे.
सरावादरम्यान कमांड पोस्ट एक्सरसाइज (CPX) आणि फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज (FTX) घेण्यात येणार आहे. दोन्ही देश दहशतवादविरोधी कारवाईच्या बाबतीत त्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान करणार आणि योग्य पद्धतींचा सराव करणार.
बांग्लादेश
बांगलादेश हा भारताच्या पूर्वेला असलेला बंगाली भाषिक मुस्लिम बहुल देश आहे. 1947 साली झालेल्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांग्लादेश म्हणून ओळखला जातो. 1971 साली पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांग्लादेशाची निर्मिती झाली.
ढाका ही बांग्लादेशची राजधानी आहे आणि बांग्लादेशी टका हे राष्ट्रीय चलन आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment