Current affairs | Evening News Marathi
Current affairs 20 July 2020 Marathi |
20 जुलै मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
दिल्लीच्या AIIMS संस्थेच्या 'e- ICU' व्हिडिओ सल्लामसलत कार्यक्रमाला सुरुवात
कोविड-19 चा मृत्यूदर कमी करण्यासाठी भारत सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना अजून बळकटी देण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेनी (AIIMS) 8 जुलै 2020 पासून अतिदक्षता विभागातल्या चिकित्सकांसाठी एका ‘व्हिडीओ सल्लामसलत कार्यक्रम’ला सुरूवात केली आहे.
कोविड-19 वर उपचार करणाऱ्या देशभरातील रुग्णालयातल्या चिकित्सकांमध्ये चर्चा घडवून आणणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
देशभरातल्या रुग्णालयात तसेच अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णांच्या संबंधात चिकित्सकांचे असलेले प्रश्न, शंका आणि त्यांचे रुग्ण व्यवस्थापनाचे अनुभव यांच्याबद्दल AIIMSच्या तज्ञांशी आणि देशातील अनेक चिकित्सकांशी या व्हिडिओ व्यासपीठावर चर्चा घडवून आणू शकतील.
मुंबई (10), गोवा (3), दिल्ली (3), गुजरात (3), तेलंगणा (2), आसाम (5), कर्नाटक (1), बिहार (1), आंध्रप्रदेश (1), केरळ (1) आणि तामिळनाडू (13), अशा एकूण 43 वैद्यकीय संस्थांचा समावेश असणारी चार चर्चासत्रे आतापर्यंत घेण्यात आलेली आहेत. या चर्चासत्रांमध्ये कोविड-19 च्या व्यवस्थापना संदर्भातले सर्व मुद्दे लक्षात घेण्यात आले होते. रेमेडेजीवीर, टोसिलिझुमब, तसेच प्लाझ्मा चिकित्सा यांचा उपयोग तर्कशुद्ध पद्धतीने करण्याच्या गरजेवर या चर्चेमध्ये भर देण्यात आला.
सध्या अतिदक्षता विभागातल्या तसेच ऑक्सिजन यंत्रणा असलेल्या आणि विलगीकरण कक्षात वापरल्या जाणाऱ्या खाटांसह एक हजार पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या देशभरातल्या रुग्णालयांमधील कोविड-19 वर उपचार देणाऱ्या चिकित्सकांना आपापले अनुभव सामायिक करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. येत्या काळात हा कार्यक्रम 500 पेक्षा कमी खाटा असणाऱ्या छोट्या रुग्णालयांसाठी उपलब्ध करून दिला जाणार.
PPE संचाची चाचणी आणि प्रमाणीकरणासाठी NABL संस्थेकडून CIPET संस्थेला मान्यता
रसायने व खते मंत्रालयाचे रसायन व पेट्रोकेमिकल्स विभाग यांच्या अखत्यारीतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) या संस्थेला वैयक्तिक सुरक्षात्मक उपकरणे (PPE) संचाची चाचणी आणि प्रमाणीकरणसाठी राष्ट्रीय चाचणी व अंशशोधण प्रयोगशाळा मान्यता मंडळाची (NABL) मान्यता प्राप्त झाली आहे.
PPE संचात आंतरराष्ट्रीय दर्जाचे हातमोजे, घालावायचा परिधान, फेस शिल्ड, गॉगल आणि ट्रिपल-लेयर मेडिकल फेस मास्क इत्यादींचा समावेश आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) तसेच आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (ISO) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार CIPET आरोग्यसेवा क्षेत्रात संशोधन आणि विकास उपक्रम राबवत आहे.
No comments:
Post a Comment