Current affairs | Evening News Marathi
Current affairs 21 July 2020 Marathi |
21 जुलै मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
देशातील पहिले सार्वजनिक इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग प्लाझा नवी दिल्लीत उघडले
भारतात ऊर्जा कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आणि विजेवर चालणाऱ्या ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, केंद्रीय ऊर्जा, नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांच्या हस्ते 20 जुलै 2020 रोजी नवी दिल्लीत चेम्सफर्ड क्लब येथे देशातील पहिल्या “EV (इलेक्ट्रिक व्हेईकल) चार्जिंग प्लाझा”चे उद्घाटन करण्यात आले.
नवी दिल्ली महानगरपालिकेच्या सहकार्याने EESL या सार्वजनिक कंपनीने भारतातील पहिला-वहिला सार्वजनिक EV चार्जिंग प्लाझा मध्य दिल्लीत उभारला आहे. या केंद्रामध्ये विविध आकारमानाच्या पाच विजेरी वाहनांच्या चार्जिंगची सोय आहे.
विजेरी वाहन खरेदीच्या मागणीत वाढ करण्यासाठी आणि सार्वजनिक चार्जिंग केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यासाठी नावीन्यपूर्ण व्यवसायिक उपक्रम निर्धारित करण्याच्या उद्देशाने भारतात विजेरी वाहनांसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी एनर्जी एफीश्यन्सी सर्व्हिसेज लिमिटेड (EESL) सातत्याने प्रयत्नशील आहे.
आर. के. सिंग यांनी यावेळी अंतर्गत भागातील हवेच्या दर्जात सुधारणा करणाऱ्या आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणाऱ्या एका "रिट्रोफिट ऑफ एयर कंडिशनिंग टु इम्प्रूव्ह इनडोअर एयर क्वालिटी फॉर सेफ्टी एंड एफिशियन्सी" (RAISE) नावाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा शुभारंभ केला. या उपक्रमामुळे देशभरात कामाच्या ठिकाणी निर्माण होणारी दूषित हवा शुद्ध करण्यासाठी आणि वातावरण अधिक निरोगी आणि हरित बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होणार. हा देखील EESL कंपनीचा कार्यक्रम आहे.
आरोग्यदायी आणि ऊर्जा कार्यक्षम इमारतींसाठी आंतरराष्ट्रीय विकासासाठी अमेरिकेची मदत (USAID) या संस्थेच्या सहकार्याने “मैत्री” हा कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे. या भागीदारीच्या अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जात आहे.
‘मनोदर्पण’: विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचा उपक्रम
केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते 21 जुलै 2020 रोजी ‘मनोदर्पण’ या उपक्रमाचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले. हा केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचा उपक्रम आहे.
ठळक बाबी
- कोविड-19 महामारीच्या काळात अध्ययनाच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याबरोबरच त्यांचे मानसिक आरोग्य देखील चांगले ठेवणे आवश्यक आहे. या मुद्याची दाखल घेत मंत्रालयाने विद्यार्थ्यांना महामारीच्या काळात आणि त्यानंतर त्यांचे मानसिक आरोग्य स्वस्थ राखण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी मानसिक व सामाजिक पाठबळ देणारा हा उपक्रम हाती घेतला आहे.
- कोविड-19 च्या उद्रेकाच्या पश्चात भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 12 मे 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची सुरुवात केली. मानवी भांडवल बळकट करण्याचा आणि उत्पादकता वाढवण्याचा तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्रभावी सुधारणा व उपक्रम राबवण्याचा एक भाग म्हणून आत्मनिर्भर भारत अभियानात ‘मनोदर्पण’ उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
- निरोगी जीवनशैली कायम राखण्यासाठी देशभरातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि तणावमुक्त जीवन जगावे, असे आवाहन देखील करण्यात आले.
No comments:
Post a Comment