Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, February 3, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 3 February 2020 Marathi | 3 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 3 February 2020  Marathi |
       3 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स


    मोहम्मद अलावी: इराक देशाचे नवे पंतप्रधान

    इराक देशाचे नवे पंतप्रधान म्हणून मोहम्मद तौफिक अलावी ह्यांची निवड करण्यात आली आहे. इराकचे राष्ट्रपती बरहम सालेह ह्यांची यासंदर्भात घोषणा केली आहे.
    इराकमध्ये मागील 4 महिन्यांपासून सरकारविरोधी निदर्शने सुरू होती. यात सुमारे 500 जणांचा मृत्यू झाला आहे.
    सध्या 65 वर्षीय अलावी ह्यांनी माजी पंतप्रधान नूरीअल-मलिकी यांच्या सरकारमध्ये दूरसंचार मंत्री पदाची जबाबदारी पार पाडली आहे. अलावीनी तत्कालीन पंतप्रधानांवर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अलावी भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कारवाईसाठी प्रसिद्ध आहेत.
    इराक देश
    इराक हा मध्यपूर्व प्रदेशातला एक प्रजासत्ताक देश आहे. बगदाद ही देशाची राजधानी आहे आणि इराकी दिनार हे राष्ट्रीय चलन आहे.
    • इराकच्या पूर्वेला इराण (कुर्दिस्तान प्रदेश), दक्षिणेला सौदी अरब, आग्नेयेला कुवेत, पश्चिमेला जॉर्डन, वायव्येला सीरिया व उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत.
    • खजुराची निर्यात करण्यात इराकचा जगात पहिला क्रमांक लागतो.
    • अरबी व कुर्दिश ह्या प्रमुख भाषा आहेत.
    • तैग्रिस नदी आणि युफ्रेटिस नदी या दोन नद्यांमधला प्रदेश म्हणून पूर्वी या देशाला 'मेसोपोटेमिया' असे म्हणत.

    टोळधाडीमुळे पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

    पिकांवर आलेल्या टोळधाडीमुळे पाकिस्तान देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. या काळात शेत आणि शेतकर्‍यांचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे.
    टोळधाडीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी 31 जानेवारी 2020 रोजी  मंत्रिमंडळाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत चार राज्यांसाठी 7.3 अब्ज रुपयांच्या ‘राष्ट्रीय कृती कार्यक्रम’ला मंजुरी देण्यात आली.
    ठळक बाबी
    • पाकिस्तानातल्या सिंध प्रांतानंतर पंजाब प्रांतात सुद्धा टोळ पिके नष्ट करीत आहेत.
    • सिंध आणि पंजाबवर हल्ला केल्यानंतर प्रथमच टोळ भारतीय सीमेजवळील खैबर पख्तूनख्वामध्ये दाखल झाले आहेत. टोळ सिंध आणि बलुचिस्तानमधून चोलिस्तान आणि नारा येथे दाखल झाले होते.
    • हवामानातले बदल हे एक कारण आहे ज्यामुळे अधिक काळापर्यंत टोळ जीवंत आहेत. 1993 साली पाकिस्तानला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता त्यापेक्षा आजची परिस्थिती बिकट आहे.
    पाकिस्तान देश
    दक्षिण आशियातला हा एक सार्वभौम इस्लामी प्रजासत्ताक देश आहे. भारताची फाळणी होऊन 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान हे राष्ट्र अस्तित्वात आले. पूर्व पाकिस्तान हा प्रांत पुढे 1971 साली बांगलादेश या नावाने स्वतंत्र देश झाला. इस्लामाबाद ही देशाची राजधानी आहे आणि पाकिस्तानी रुपया राष्ट्रीय चलन आहे.
    पाकिस्तानची (ब्रिटिश भारताची वायव्य सीमा) अफगाणिस्तानबरोबरची सीमा “ड्युरँड रेषा” म्हणून ओळखली जाते व ती 1893 साली सर मॉर्टिमर ड्युरँड यांनी निश्चित केली आहे तर पाकिस्तानची भारताबरोबरची वर्तमानची सीमा 1947 साली ‘रॅडक्लिफ अवॉर्ड’ या सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या निवाड्याप्रमाणे निश्चित केली आहे.
    सॉल्ट रेंज किंवा सैंधव-मीठदगड-डोंगररांग हे एक भूवैज्ञानिक वैशिष्ट्य आहे. ही डोंगररांग झेलमच्या उत्तरेस जोगीतिला व बाक्राला येथून सुरू होऊन नैर्ऋत्य दिशेने जाते आणि कालाबागजवळ सिंधू नदी ओलांडते आणि सिंधूच्या पश्चिमेस बन्नू व डेरा इस्माइलखान या जिल्ह्यांत पसरते.


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स,

    No comments:

    Post a Comment