Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, February 4, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 4 February 2020 Marathi | 4 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 4 February 2020  Marathi |
       4 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स


    'ऑपरेशन व्हेनिला': मादागास्करमध्ये भारतीय नौदलाची मानवतावादी मोहीम

    मादागास्करमध्ये आलेल्या ‘डियाने’ चक्रीवादळानंतर चालविलेल्या 'ऑपरेशन व्हेनिला' या मोहिमेच्या अंतर्गत तिथल्या लोकांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारतीय नौदलाचे ‘ऐरावत’ जहाज पाठवले गेले आहे.
    1 जानेवारी 2020 रोजी भारताने जीवनावश्यक साहित्य मादागास्करच्या अधिकार्‍यांकडे सोपवल्या. जहाजावरील वैद्यकीय पथकाने स्थानिक अधिकार्‍यांच्या सहकार्याने 01 आणि 02 फेब्रुवारी रोजी अंतसिरानाना या शहरात वैद्यकीय शिबिर घेतले.
    ठळक बाबी
    • सेशेल्सकडे मार्गक्रम करणार्‍या भारतीय जहाजाला विंनतीवरून या बेटराष्ट्राकडे वळविण्यात आले होते.
    • सूचना मिळतास मदतीसाठी पोहचणारा पहिला परकीय देश म्हणून भारत ठरला आहे.
    • मादागास्करसंदर्भात भारताने दिलेली मदत ही भारताच्या 'सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन (SAGAR)' या दृष्टीकोनातून भारतीय नौदलाच्या परराष्ट्र सहकार्य पुढाकार’च्या अनुषंगाने आहे.
    • मादागास्कर हा इंडियन ओशन रिम असोसिएशन (IORA) या आंतर-सरकारी संघटनेचा सदस्य देखील आहे.
    • हिंद महासागर क्षेत्रात येणार्‍या संकटकालीन परिस्थितीला प्रतिसाद देणारा पहिला म्हणून भारतीय नौदल उदयास आले आहे.
    INS ऐरावत हे एक उभयचर लढाऊ जहाज आहे. हे जहाज मानवतावादी मदत व आपत्ती निवारण (HADR) मोहिमेचा देखील एक भाग आहे, हे आवश्यक मदत साहित्य वाहून नेते.
    मादागास्कर देश
    मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतला एक द्वीप-देश आहे. हे जगातल्या सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. या देशाच्या चारही बाजूंना हिंद महासागर आहे.
    राजधानी - अंतानानारिव्हो
    अधिकृत भाषा - मालागासी, इंग्लिश, फ्रेंच
    राष्ट्रीय चलन - मालागासी एरियरी


    जागतिक कर्करोग दिन: फेब्रुवारी

    दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक आरोग्य संस्था (WHO) याच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक कर्करोग दिन’ पाळला जातो.
    सन 2019, सन 2020, सन 2021 या तीन वर्षांसाठी 'आय एम अॅण्ड आय वील' या संकल्पनेखाली एक जागतिक मोहीम चालवली जात आहे. याबाबत जगभरात कर्करोगाविषयी जनजागृती फैलावण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात.
    कर्करोग म्हणजे काय?
    कर्करोग हा असा आजार आहे, ज्यामध्ये जेव्हा शरीरातल्या सामान्य पेशींच्या गटामध्ये बदल होतो तेव्हा त्या पेशींची अनियंत्रित, असामान्य वाढ होते आणि शरीरात गाठी तयार होतात. ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) वगळता इतर सर्व कर्करोगाबाबत हे सत्य आहे.
    कर्करोगामुळे पेशी अनियंत्रितपणे विभाजित होतात. त्यामुळे गाठी (ट्यूमर) तयार होतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि इतर दुर्बलता देखील येऊ शकतात जी प्राणघातक असू शकते.
    कर्करोगासंबंधी जागतिक दृष्य
    • दरवर्षी जगभरात जवळपास 9.6 दशलक्ष लोकांचा कर्करोगाने मृत्यू होतो.
    • सामान्य कर्करोगांमध्ये आढळून येणारे किमान एक तृतीयांश प्रकार प्रतिबंधित केले जाऊ शकते.
    • कर्करोग हा जगभरात होणार्‍या मृत्यूसाठी दुसरा अग्रगण्य कारक आहे.
    • 70% कर्करोगासंबंधी मृत्यू कमी-ते-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात.
    • कर्करोगाचा एकूण वार्षिक आर्थिक खर्च अंदाजे USD 1.16 लक्ष कोटी (ट्रिलियन) एवढा आहे.
    कर्करोगाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (UICC) ही संस्था निरंतर कार्यरत आहे. त्यांच्या सूचनेनुसार, सर्वप्रकारच्या कर्करोगामध्ये सुमारे एक तृतीयांश प्रकार आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून अधिकाधिक शारीरिक कामे करून आणि बैठे काम कमीतकमी करून रोखले जाऊ शकतात. मोठ्या संख्येने असेही दिसून आले आहे की उपचारादरम्यान किंवा त्यानंतर व्यायामामुळे चांगले परिणाम दिसून येतात.
    दिनाचा इतिहास
    4 फेब्रुवारी 2000 रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे झालेल्या ‘वर्ल्ड कॅन्सर समिट अगेन्स्ट कॅन्सर फॉर द न्यू मिलेनियम’ या कार्यक्रमात ‘मुस्तफा जागतिक कर्करोग दिन’ची स्थापना केली गेली. तेव्हापासून हा दिन 4 फेब्रुवारीला साजरा करतात.
    जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारीला कर्करोगाबद्दल जागरुकता वाढविण्याकरिता आणि प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहन देण्याकरिता आयोजित केला जातो. हा दिन आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (UICC) यांनी वर्ष 2008 मध्ये लिहिलेल्या ‘जागतिक कर्करोग घोषणापत्र’चे समर्थन करण्यासंदर्भात पाळला जातो.
    आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (UICC)
    आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (Union for International Cancer Control -UICC) ही कर्करोगाविरुद्धच्या लढ्यातील सर्वात मोठी आणि जगभरात जवळपास 155 देशांमध्ये 800 हून अधिक सदस्य संस्थांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 1933 साली या संघटनेची स्थापना झाली आणि याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे.
    ही संघटना जागतिक आरोग्य आणि विकास उद्दिष्टे यामध्ये जागतिक कर्करोगाचा भार कमी करण्यासाठी, अधिकाधीक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर्करोग नियंत्रण एकाग्रीत करण्यासाठी कर्करोग समुदायांना एकत्र आणण्यासाठी क्षमता बांधणी करण्यासाठी आणि पुढाकारामध्ये आघाडी घेण्यासाठी समर्पित आहे. UICC आणि त्याचे बहू-क्षेत्रातील भागीदार हे जगातील सरकारांना यादृष्टीने गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत कार्यक्रम चालवण्यासाठी उत्तेजन देण्यास बांधील आहेत. 


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स,

    No comments:

    Post a Comment