Current affairs | Evening News Marathi
Current affairs 24 July 2020 Marathi |
24 जुलै मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
‘भारतात शिका’ कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतात पहिल्यांदाच ‘Ind-SAT’ परीक्षेचे आयोजन
‘भारतात शिका’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिनांक 22 जुलै 2020 रोजी पहिल्यांदाच भारतीय शैक्षणिक मूल्यांकन (Ind-SAT) परीक्षा घेतली.
ठळक बाबी
- राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे (NTA) प्रक्षेपित आंतरजाल पद्धतीने घेतलेल्या या परीक्षेत नेपाळ, इथिओपिया, बांग्लादेश, भुटान, युगांडा, टांझानिया, रवांडा, श्रीलंका, केनिया, झांबिया, इंडोनेशिया आणि मॉरीशस या देशांमधून सुमारे पाच हजार उमेदवार सहभागी झाले होते.
- मंत्रालयाच्या अंतर्गत EdCIL (भारत) मर्यादित या सार्वजनिक उपक्रमाने आणि SII या अंमलबजावणी संस्थेनी या परीक्षेसाठी नोंदणी आणि इतर बाबींची पूर्तता केली.
- Ind-SAT परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे ‘भारतात शिका’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाणार आहे.
- भारतातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी परदेशी उमेदवारांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या उद्देशाने आशियाई तसेच आफ्रिकी देशांमध्ये Ind-SAT परीक्षेचे आयोजन करण्याच्या प्रस्ताव वित्तमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पिय भाषणात मांडला होता. यावर्षी प्रायोगिक तत्वावर 12 देशांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. भविष्यात इतरही देशांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
‘भारतात शिका’ कार्यक्रमाविषयी
‘भारतात शिका’ हा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यक्रम असून त्याच्या अंतर्गत परदेशी विद्यार्थी भारतातल्या निवडक अशा 116 उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येतात.
इयत्ता बारावी वा शालांत परीक्षेतल्या गुणांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. गुणानुक्रमे पहिल्या 2000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते तर इतर काही विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कामध्ये सवलत दिली जाते. या कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षात, 2018-19 साली सुमारे 780 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर दुसऱ्या वर्षी ही संख्या 3200 वर पोहोचली.
‘भारतात शिका’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत निवडक भारतीय विद्यापिठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी परदेशातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी तसेच शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी Ind-SAT ही परीक्षा घेतली जाते. भारतात शिकण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता मापण्याच्या उद्देशाने या परिक्षेची रचना करण्यात आली आहे.
निकाराग्वा: आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा 87 वा सभासद
निकाराग्वा हा आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) या सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये औपचारीकपणे सहभागी होणारा 87 वा देश ठरला आहे. देशाच्या प्रतिनिधींनी 22 जुलै 2020 रोजी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात असलेल्या करारावर स्वाक्षरी केली.
आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) विषयी
2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान करारनाम्याच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) कार्यक्रम हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स या देशांच्या पुढाकाराने चालू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे. भारतात हरयाणाच्या गुडगाव इथल्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE, गवलपहारी) येथे ISAचे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संघटना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 87 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात असलेल्या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी 58 देशांनी त्याला मान्यता दिली आहे.
निकाराग्वा देश
निकाराग्वा हा मध्य अमेरिका उपखंडातला सर्वात मोठा देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेला होन्डुरास व दक्षिणेला कोस्टा रिका हे देश, पूर्वेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे.
मानाग्वा ही निकाराग्वाची राजधानी आहे. कोर्डोबा हे देशाचे राष्ट्रीय चलन आहे.
No comments:
Post a Comment