पाहा कसे ओळखाल नॅशनल हायवे, स्टेट हायवे आणि हायवे
रस्ताने प्रवास करत असतांना रस्त्याच्या कड्याला किलोमीटर दर्शवणारी दगडं तुम्हाला दिसत असतील. वेगवेगळ्या मार्गावर वेगवेगळ्या रंगाची दगडं तुम्ही पाहिली असतील. यावरुन आपण ओळखू शकतो की तो मार्ग कोणी बनवला आहे आणि तो राष्ट्रीय महामार्ग आहे की राज्य महामार्ग आहे. जाणून घ्या कसे ओळखाल कोणता मार्ग कोणी बनवला आहे.
मुंबई : रस्ताने प्रवास करत असतांना रस्त्याच्या कड्याला किलोमीटर दर्शवणारी दगडं तुम्हाला दिसत असतील. वेगवेगळ्या मार्गावर वेगवेगळ्या रंगाची दगडं तुम्ही पाहिली असतील. यावरुन आपण ओळखू शकतो की तो मार्ग कोणी बनवला आहे आणि तो राष्ट्रीय महामार्ग आहे की राज्य महामार्ग आहे. जाणून घ्या कसे ओळखाल कोणता मार्ग कोणी बनवला आहे.
नॅशनल हायवे - रस्त्याच्या कड्याला किलोमीटर दर्शवणारा दगड जर पिवळा आणि पांढरा असेल तर तो राष्ट्रीय महामार्ग असतो.
स्टेट हायवे - रस्त्याच्या कड्याला किलोमीटर दर्शवणारा दगड जर हिरवा आणि पांढरा असेल तर तो राज्य महामार्ग असतो. जो राज्याने बनवलेला असतो.
सिटी किंवा जिल्हा हायवे - रस्त्याच्या कड्याला किलोमीटर दर्शवणारा दगड काळा आणि पांढरा असेल तर तो जिल्हा महामार्ग असतो.
ग्रामीण भागातला रस्ता - रस्त्याच्या कड्याला किलोमीटर दर्शवणारा दगड लाल आणि पांढरा असेल तर तो ग्रामपंचायतीने बांधलेला मार्ग असतो.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना - या योजने अंतगर्त बांधलेला रस्त्याच्या कड्याला किलोमीटर दर्शवणारा फलक लाल आणि काळ्या रंगाचा असतो.
सौजन्य:झी २४तास