Current affairs | Evening News Marathi
Current affairs 25 July 2020 Marathi |
25 जुलै मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
‘सार्वजनिक प्रशासनामधील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2020’ यासाठी सुधारित योजना
Revised plan for ‘Prime Minister Award 2020 for Excellence in Public Administration’
केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री, डॉ. जितेंद्र सिंग यांनी ‘सार्वजनिक प्रशासनामधील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2020’ यासाठी सुधारित योजना जाहीर केली आहे आणि त्यासंबंधी एका संकेतस्थळाचे लोकार्पण केले.
ठळक बाबी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारात लोकसहभाग घेण्याच्या सरकारच्या प्रारूपाच्या अनुषंगाने या योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. परिणाम निर्देशक, आर्थिक विकास, लोकसहभाग आणि जनतेच्या तक्रारींचे निवारण या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी सार्वजनिक प्रशासनात उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार या योजनेत नव्याने सुधारणा करण्यात आली.
- जिल्हा कामगिरी निर्देशक कार्यक्रम, नवोन्मेष सर्वसाधारण श्रेणी, आकांक्षी जिल्हे कार्यक्रम आणि नमामि गंगे कार्यक्रम या चार प्रमुख विभागांमध्ये नामांकन मागविण्यात आले आहे.
- जिल्हा कामगिरी निर्देशक कार्यक्रमाच्या अंतर्गत समावेशक विकासासाठी अग्रक्रम क्षेत्रात पतपुरवठा, जन भागीदारी - स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) आणि स्वच्छ भारत अभियान (शहरी) कार्यक्रमांच्या प्राथमिकता योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सेवा वितरण आणि सार्वजनिक तक्रारींचे निराकरण याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांचे मूल्यांकन केले जाणार. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरील नवकल्पनांसाठी स्वतंत्र पुरस्कार श्रेणी देण्यासाठी या योजनेची व्याप्ती आहे.
- पुनर्रचित योजनेत “गंगा पुनरुज्जीवनासाठी चांगली कामगिरी” पुरस्कार ही गंगा जिल्ह्यांच्या विकासाला समर्पित असलेली पुरस्काराची नवी श्रेणी तयार करण्यात आली आहे. याद्वारे नमामि गंगे कार्यक्रमाच्या अंतर्गत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार 57 अधिसूचित जिल्हा गंगा समित्यांपैकी एका जिल्ह्याला देण्यात येणार.
- 31 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त या पुरस्कारांचे वाटप करण्यात येणार. 2020 योजनेत एकूण 15 पुरस्कार देण्यात येतील.
संशोधनात्मक तंत्रज्ञान विकासासाठी भारत-रशिया भागीदारीचा 15 कोटी रुपयांचा निधी
Indo-Russian partnership fund of Rs 15 crore for research technology development
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने भारत आणि रशिया या देशांच्या संयुक्त सहयोगातून संशोधन व विकास तंत्रज्ञान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या भागीदारीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही देश संयुक्त तंत्रज्ञान मूल्यांकन, स्टार्टअप उद्योगांसाठी संयुक्त संशोधन तसेच तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भागीदारी करणार आहेत.
दोन्ही देशांमध्ये प्रदीर्घ काळापासून व्दिपक्षीय संशोधन सहकार्य करण्यात येत आहे. आता भारत आणि रशिया या देशांमध्ये संयुक्त तंत्रज्ञान मूल्यांकन आणि वाणिज्यिक कार्यक्रम सुरू होत आहे.
ठळक बाबी
- भारतातली फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) आणि रशियातली FASIE संस्था यांच्या भागीदारीतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
- या कार्यक्रमानुसार पाच प्रकल्पांपर्यंत प्रत्येकी दोन वार्षिक चक्रांतर्गत निधी देण्यात येणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सहकार्य आवश्यक असलेल्या प्रकल्पांची निवड यासाठी करण्यात येणार आहे.
- कार्यक्रमामध्ये माहिती तंत्रज्ञान, ICT, वैद्यकीय आणि औषधोपचार, नवीकरणीय ऊर्जा, अंतराळ, पर्यायी तंत्रज्ञान, पर्यावरण, नवीन साहित्य, जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या प्रकल्पांचा विचार करण्यात येणार आहे.
- विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने FICCI हा कार्यक्रम भारतामध्ये राबविणार आहे. योजनेनुसार भारतातल्या दहा लघु, मध्यम उद्योगांना किंवा स्टार्टअप उद्योगांना FICCI कडून दोन वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात येणार.
No comments:
Post a Comment