Current affairs | Evening News Marathi
Current affairs 27 July 2020 Marathi |
27 जुलै मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
भारतीय हवामान विभागाचे “मौसम” मोबाइल अॅप
भूशास्त्र मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त, 27 जुलै 2020 रोजी भूशास्त्र मंत्रालयाने भारतीय हवामान विभागासाठी (IMD) "मौसम" नावाच्या मोबाइल अॅपचे अनावरण केले.
ICRISAT ची डिजिटल कृषी व युवा चमू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (IITM), पुणे आणि भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी संयुक्तपणे या अॅपची रचना केली आहे.
तांत्रिक कार्यकुशलतेशिवाय हवामानाची माहिती आणि पूर्वानुमान एका आकर्षक पद्धतीने एकत्रित करण्यासाठी तयार केलेले हे मोबाइल अॅप सर्वसामान्यांना हाताळण्यास सोपे आहे. वापरकर्ते हवामान, हवामान अंदाज, रडार प्रतिमा यांचा वापर करू शकतात आणि त्यांना हवामानाच्या घडामोडींसंदर्भात सतर्कतेचा इशारा मिळू शकतो.
मौसम मोबाइल अॅपवर खालील 5 सेवा उपलब्ध आहेतः
- वर्तमान हवामान - 200 शहरांसाठी दिवसातून 8 वेळा वर्तमान तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा याबद्दलची सुधारित माहिती देण्यात आली आहे. सूर्योदय / सूर्यास्त आणि चंद्रोदय / चंद्रास्त याविषयीची माहिती देखील दिली आहे.
- नाऊकास्ट - IMDच्या राज्य हवामान केंद्राद्वारे सुमारे 800 स्थानके आणि भारतातल्या जिल्ह्यांसाठी स्थानिक हवामानातल्या घटनेविषयी आणि त्यांच्या तीव्रतेबद्दल दर तीन तासांनी इशारा देणे. तीव्र हवामानाच्या बाबतीत, त्याचा परिणाम देखील इशारामध्ये समाविष्ट केला आहे.
- शहरासाठीचा अंदाज - भारतातल्या सुमारे 450 शहरांमध्ये गेल्या 24 तास आणि 7 दिवसांचा हवामानाचा अंदाज उपलब्ध आहे.
- इशारा - नागरिकांना धोकादायक हवामानाबद्दल इशारा देण्यासाठी येत्या पाच दिवसांसाठी सर्व जिल्ह्यांना दिवसातून दोनदा कलर कोडमध्ये (लाल-गंभीर परिस्थिती, नारिंगी- सावधगिरी व पिवळा- सूचना) इशारा दिला जाऊ शकतो.
- रडार उत्पादने - दर 10 मिनिटांनी नवीनतम स्टेशनद्वारे रडार माहिती अद्ययावत केली जाते.
केंद्रीय पर्यावरण मंत्री भारतातल्या व्याघ्र गणनेचा नवीन गिनीज विक्रम लोकांना समर्पित करणार
29 जुलै 2020 रोजी आयोजित जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर भारतातल्या व्याघ्र गणनेनी केलेला नवीन गिनीज विक्रम भारतीय नागरिकांना समर्पित करणार आहेत.
भारतात दर चार वर्षांनी होणाऱ्या ‘राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018’ याच्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातल्या व्याघ्र गणनेनी नवीन गिनीज विश्व विक्रम स्थापित केला आहे. सन 2018-19 मध्ये केलेले सर्वेक्षण हे संसाधन आणि माहिती या दोन्ही गोष्टी संग्रहीत करण्याच्या दृष्टीने आजपर्यंतचे सर्वात व्यापक सर्वेक्षण होते.
ठळक बाबी
- नव्या गणनेनुसार, देशात सुमारे 2967 वाघ आहेत. वर्तमानात, जागतिक संख्येच्या सुमारे 70 टक्के वाघ भारतात आहेत.
- वेगवेगळ्या 141 क्षेत्रात 26,838 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते आणि त्याद्वारे 121,337 चौरस किलोमीटर (46,848 चौरस मैल) क्षेत्रफळाचे प्रभावी सर्वेक्षण करण्यात आले. या सापळा रुपी कॅमेऱ्यांनी वन्यजीवांची 34,858,623 छायाचित्रे हस्तगत केली. त्यात 76,651 वाघ आणि 51,777 बिबट्या होते; बाकीचे इतर स्थानिक प्राणी होते.
- वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प निर्धारित वेळेच्या चार वर्ष आधीच भारताने पूर्ण केला आहे.
पार्श्वभूमी
चार वर्षातून एकदा होणारी राष्ट्रीय व्याघ्र गणना ही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे भारतीय वन्यजीव संस्थेच्या तांत्रिक सहकार्यातून राबविण्यात येत असून राज्य वनविभाग व हितधारक त्याची अंमलबजावणी करीत आहेत. नऊ व्याघ्र क्षेत्रांवर सुरु करण्यात आलेला ‘प्रोजेक्ट टायगर’ सारखा प्रजाती विशेष कार्यक्रम आता 50 व्याघ्र क्षेत्रांवर सुरु आहे.
वाघांचा वावर असणाऱ्या देशातल्या सरकारच्या प्रमुखांनी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे जागतिक पातळीवर वाघांची संख्या 2022 सालापर्यंत दुप्पट करण्याचा निर्धार सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करुन केला आहे. याच बैठकीत 29 जुलै हा दिवस जगभर जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरुन व्याघ्र संवर्धनाविषयी जागृती निर्माण होण्यास मदत मिळणार.
No comments:
Post a Comment