Current affairs | Evening News Marathi
Current affairs 28 July 2020 Marathi |
28 जुलै मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
“BelYo”: भारताचे पहिले ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’
“BelYo” या नावाने भारताचे पहिले ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’ तयार करण्यात आले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) मान्यता दिलेल्या 730 शासकीय प्रयोगशाळा आणि 270 खासगी प्रयोगशाळांपर्यंत पोहोचणे आणि माहिती गोळा करणे हे हा मंच तयार करण्यामागचे उद्दीष्ट आहे.
ठळक बाबी
- हा मंच भौतिक स्वरूपात असलेली नागरिकांची कोविड-19 संबंधित वैद्यकीय आणि लसीकरण माहिती डिजिटल स्वरूपात रूपांतरित करतो, जी रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणाऱ्या आरोग्य सेतूसारख्या कोणत्याही अॅपमार्फत पुनर्प्राप्त केली जाऊ शकते.
- एखादी व्यक्ती क्यूआर कोडच्या मदतीने स्वतःचे परीक्षण करू शकते आणि त्यासंबंधीची माहिती पुनर्प्राप्त करू शकते, ज्यामुळे प्रक्रिया 100 टक्के संपर्क-विरहित होते.
- हा मंच बेलफ्रिक्स बीटी ही कंपनी, बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेच्या (IISc) संगोपनाखाली असलेली योसिंक ही स्टार्टअप कंपनी यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे.
- याच्या विकासासाठी एमफॅसिस एफ1 फाउंडेशन या संस्थेनी वित्तपूरवठा केला.
DRDO कडून 'डेअर टू ड्रीम 2.0' ही नव उद्योजकांसाठीची स्पर्धा जाहीर
27 जुलै 2020 रोजी माजी राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त, संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) संशोधन कार्यासंबंधी “डेअर टू ड्रीम 2.0” ही स्पर्धा जाहीर केली.
नव्याने उदयाला येत असलेले तंत्रज्ञान लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत व्यक्तिगत पातळीवर संशोधन करणारे संशोधक आणि नवउद्योजक यांच्या संरक्षण आणि उड्डयणशास्त्र तंत्रज्ञान क्षेत्रातल्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे.
हे देशातल्या संशोधक व नवउद्योजकांसाठी प्रोत्साहनपर खुले आव्हान आहे. तज्ञ समितीकडून योग्य परीक्षणानंतर विजेते निवडले जाणार. नवउद्योजकांना 10 लक्ष रुपयांपर्यंत तर व्यक्तिगत गटात पाच लक्ष रुपये अशी रोख बक्षिसे विजेत्यांसाठी जाहीर करण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment