Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, July 26, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 26 July 2020 Marathi | 26 जुलै मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 26 July 2020  Marathi |
       26 जुलै  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स



    रिझर्व्ह बँक श्रीलंकासोबत 400 दशलक्ष डॉलच्या चलनाची अदलाबदल करणार

    कोविड-19 महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंका देशाच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याच्या हेतूने, भारतीय रिझर्व्ह बँकेनी श्रीलंकासोबत 400 दशलक्ष (40 कोटी) डॉलर एवढ्या रकमेच्या चलनाची अदलाबदल (करन्सी स्वॅप) करण्यासाठी मान्यता दिली आहे.
    श्रीलंकन सरकारने यासाठी भारताकडे मदत मागितली होती. श्रीलंकाला कमी होत चाललेल्या परकीय चलन साठ्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत दिली जाणार आहे.
    आता, भारतीय रिझर्व्ह बँक आणि श्रीलंकाचे सरकार यांच्यामध्ये यासंबंधीचा करार होणार आहे. 24 जुलै 2020 रोजी श्रीलंकाचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली.
    पार्श्वभूमीवर
    महामारीमुळे श्रीलंकामध्ये लागू केलेल्या टाळेबंदीमुळे उद्योगधंदे बंद आहेत, त्याचा परिणाम म्हणून मुख्यतः पर्यटनावर अवलंबून असलेल्या श्रीलंकाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यात महामारीच्या व्यवस्थापणावर होणारा खर्च, प्राथमिक गरजा, बॅंकांमध्ये अतिरिक्त गुंतवणूक तसेच आयातमध्ये झालेली वाढ अश्या कारणांनी देशाला परकीय चलन मिळणे जवळजवळ बंद झाले आहे. यामुळे परकीय चलन साठा घटला आहे. याचा परिणाम म्हणून डॉलरच्या तुलनेत श्रीलंकन रुपयाचे मूल्य घसरू लागले आहे. अश्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी श्रीलंकाने भारताकडे मदत मागितली होती.


    भारतीय भुदलात महिला अधिकाऱ्यांच्या परमनेन्ट कमिशसाठी सरकारची मान्यता

    भारतीय भुदलात महिला अधिकाऱ्यांच्या परमनेन्ट कमिशसाठी केंद्र सरकारच्यावतीने औपचारीक मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 23 जुलै 2020 रोजी एक स्वीकृती पत्र जाहीर केले. भारतीय भुदलातल्या विविध पदांवर आता महिलांची नेमणूक केली जाऊ शकते.
    परमनेन्ट कमिशन म्हणजे काय?
    परमनेन्ट कमिशनचा अर्थ असा होतो की जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत दलात रुजू असणार. म्हणजेच परमनेन्ट कमिशनमार्फत एखाद्याची निवड झाल्यानंतर ती व्यक्ती त्याच्या निवृत्ती-वयाच्या कालावधीपर्यंत देशाची सेवा करू शकते.
    घेतलेला निर्णय
    • शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) मधील महिला अधिकाऱ्यांचा भारतीय भुदलातल्या सर्व दहाही विभागांमध्ये परमनेन्ट कमिशनसाठी मान्यता देण्यात आली आहे.
    • महिलांना आर्मी एयर डिफेन्स, सिग्नल, इंजीनियर, आर्मी एव्हिएशन, इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल इंजीनियरिंग, आर्मी सर्विस कॉर्प्स, आर्मी ऑर्डिनंन्स कॉर्प्स आणि इंटेलिजेंस कॉर्प्स या विभागांमध्ये परमनेन्ट कमिनश मिळू शकणार. यासोबतच जज अँड एडवोकेट जनरल, आर्मी एज्युकेशनल कॉर्प्स यांमध्येही सुविधा मिळणार.
    • निवड मंडळाकडून सर्व SSC महिलांना सर्व कागदोपत्री कारवाई पूर्ण केल्यानंतर पुढील प्रक्रिया चालू केली जाणार आहे. दरम्यान, या नियुक्त्या लढाई मोहीमांमध्ये होणार नाहीत.
    पार्श्वभूमी
    फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने परमनेन्ट कमिशन बनविण्यासाठी केंद्र सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला होता.

    No comments:

    Post a Comment