Current affairs | Evening News Marathi
Current affairs 7 June 2020 Marathi |
7 जून मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
मातृत्व वय संबंधित बाबी तपासण्यासाठी कृती दलाची स्थापना
केंद्र सरकारने मातृत्व वय, मातामृत्यू दर कमी करण्यासाठी असलेल्या आवश्यक गोष्टी, पोषण पातळीत सुधारणा आणि इतर संबंधित बाबी तपासण्यासाठी एका कृती दलाची स्थापना केली आहे.
कृती दलाची रचना
- अध्यक्ष - जया जेटली
- सदस्य (कार्यकारी) – नीती आयोगाचे डॉ. विनोद पॉल तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, कायदा विभाग यांचे सचिव
- सदस्य - नजमा अख्तर, वसुधा कामत आणि डॉ. दिप्ती शहा
कृती दलाच्या जबाबदाऱ्या
- विवाहाचे वय आणि मातृत्व यामधील परस्पर संबंध तपासण्यासाठी खालील विषयांचा अभ्यास करणे
- माता आणि नवजात / अर्भक / मुलाची गरोदरपणी, जन्माच्या वेळी आणि त्यानंतर आरोग्य, वैद्यकीय कल्याण आणि पोषण स्थिती
- शिशु मृत्यु दर (IMR), माता मृत्यु दर (MMR), एकूण प्रजनन दर (TFR), जन्माचे लिंग गुणोत्तर (SRB), बाल लिंग गुणोत्तर (CSR) इ. यासारख्या प्रमुख बाबी
- या संदर्भात आरोग्य आणि पोषण संबंधित इतर कोणतेही मुद्दे
- महिलांमध्ये उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी उपाय सुचविणे.
- कृती दलाच्या शिफारशींचे समर्थन करण्यासाठी योग्य कायदेशीर साधने आणि / किंवा विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणा सुचविणे.
- कृती दलाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी मुदतीसह तपशीलवार अंमलबजावणीची रूपरेखा तयार करणे.
- नीती आयोगाकडे 31 जुलै 2020 पर्यंत अहवाल सादर करणार.
पार्श्वभूमी
1929 सालाच्या शारदा कायद्यात सुधारणा करून 1978 साली स्त्रीच्या विवाहाचे वय पंधरा वर्षांवरून अठरा वर्षे करण्यात आले. या निर्णयाचा फायदा म्हणजे कालांतराने महिलाना उच्च शिक्षण आणि व्यवसाय करण्यासाठी संधी खुल्या झाल्या. तरीही आजदेखील मातामृत्यू दर कमी करण्याची तसेच पोषण पातळीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने मुलींच्या मातृत्वामध्ये प्रवेश करण्याच्या वयाच्या संपूर्ण मुद्द्याकडे पाहिले जाणे आवश्यक आहे.
कोविड-19 रुग्णांचे नमुने घेण्यासाठी स्वदेशी ‘नासॉफरेन्जियल स्वॅब’ विकसित
CSIRची राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (CSIR-NCL), पुणे येथील संशोधकांनी कोविड-19 रूग्णाच्या घशातून नमुने गोळा करण्यासाठी स्वदेशी “नासॉफरेन्जियल” (NP) स्वॅब विकसित केले आहे.
महामारीच्या परिस्थितीत, “नासॉफरेन्जियल” (NP) स्वॅबच्या वाढत्या मागणीच्या स्थितीत पुरवठा साखळीत विलंब होतो, किंमती वाढतात आणि गुणवत्तेमध्ये फरक पडतो. ही समस्या सोडविण्यासाठी हा शोध महत्त्वाचा ठरणार आहे.
नासॉफरेन्जियल स्वॅब एक वैद्यकीय उपकरण आहे ज्याची गुणवत्ता, पॉलिमर ग्रेड, परिमाण आणि निर्जंतुकीकरणाची कठोर वैशिष्ट्ये आहेत. NP स्वॅबमध्ये एक दंडगोलाकार प्लास्टिकची काठी असते ज्यात सिंथेटिक ब्रिस्टल्स / फ्लॉक ब्रश सारखे टोक असते. फ्लॉकिंग प्रक्रिया दांतांच्या ब्रशप्रमाणेच काठीच्या टोकावर समांतर दिशेने बारीक बारीक रेषेत मदत करतात, याशिवाय यामध्ये गोल एकसमान भूमिती आहे आणि NP स्वॅब ब्रिस्टल्स मायक्रॉन व्यासाचे असतात.
कोविड-19 तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या नियमावलीनूसार नमुना संकलनासाठी स्वदेशी NP स्वॅब तयार करण्याची प्रक्रिया मुंबईच्या रसायन कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ते दररोज 1 लक्ष NP स्वॅब्स तयार करण्यास सक्षम असतील.
No comments:
Post a Comment