Current affairs | Evening News Marathi
Current affairs 2 June 2020 Marathi |
2 जून मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
फेरीवाल्यांना दिलासा देणारी ‘पीएम स्वनिधी’ योजना
दिनांक 1 जून 2020 रोजी केंद्र सरकारने फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या ‘पीएम स्वनिधी’ (PM-SVANIDHI) योजनेची घोषणा केली. PM-SVANIDHI याचे पूर्ण नाव “प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी” असे आहे.
जवळपास 50 लक्ष फेरीवाल्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
ठळक बाबी
- या योजनेच्या अंतर्गत फेरीवाऱ्यालांना 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. पानवाले, केशकर्तनालय चालविणारे, चांभारांनाही याचा लाभ मिळणार आहे.
- वर्षभरासाठी हे कर्ज दिले जाणार असून मासिक तत्त्वावर त्याची परतफेड करायची आहे. यावर 7 टक्के दराने व्याज आकारले जाणार असून वेळेवर कर्जफेड करणाऱ्यांनी भरलेले व्याज त्यांच्या बँक खात्यात परत केले जाणार आहे.
- याशिवाय या फेरीवाल्यांना भविष्यात 20 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे कर्जही मिळू शकणार.
- नियमित बँकांशिवाय सहकारी बँका, लघू वित्त बँका, गैर बँकिंग वित्तीय संस्था इथूनही हे कर्ज मिळणार आहे.
MSME उद्योगांना सक्षम करण्यासाठी ‘चॅम्पियन्स’ या तंत्रज्ञान व्यासपीठाचे उद्घाटन
दिनांक 1 जून 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘चॅम्पियन्स’ (CHAMPIONS) या तंत्रज्ञान व्यासपीठाचा शुभारंभ करण्यात आला. हे व्यासपीठ लहान औद्योगिक एकाकांच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना प्रोत्साहन, पाठिंबा आणि मदत देण्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी तयार करण्यात आले आहे.
चॅम्पियन्स (CHAMPIONS) याचे पूर्ण नाव “उत्पादन आणि राष्ट्रीय सामर्थ्य वाढविण्यासाठी आधुनिक प्रक्रियेची निर्मिती आणि सामंजस्यपूर्ण अनुप्रयोग” (Creation and Harmonious Application of Modern Processes for Increasing the Output and National Strength) असे आहे.
एकाच जागी सर्व उपाययोजना उपलब्ध करून देण्याचा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा हा एक उपक्रम आहे. कोविड-19 महामारीच्या कठीण परिस्थितीत MSME उद्योगांना मदत करण्यासाठी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते होण्यास मदत करण्यासाठी ही ICT आधारित प्रणाली तयार केली गेली आहे.
व्यासपीठाची उद्दीष्टे
- वित्त, कच्चा माल, कामगार, नियामक परवानग्यांसह विशेषतः महामारीसारख्या कठीण परिस्थितीत निर्माण झालेल्या उद्योगांच्या अडचणी सोडविणे.
- वैद्यकीय उपकरणे, PPE कीट, मास्क इ. सारख्या वैद्यकीय वस्तूंचे उत्पादन आणि त्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा होण्यात उद्योगांना नवीन संधी मिळविण्यात मदत करणे.
व्यासपीठाविषयी
- नियंत्रण कक्षासह ही तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी व्यवस्थापन माहिती प्रणाली आहे. टेलिफोन, इंटरनेट आणि व्हिडिओ कॉन्फरन्स या ICT साधनांच्या व्यतिरिक्त, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहितीचे विश्लेषण आणि मशीन लर्निंगद्वारे सक्षम करण्यात आलेली प्रणाली आहे.
- हे वास्तविकपणे भारत सरकारच्या CPGRAMS हे मुख्य तक्रार निवारण मंच आणि MSME मंत्रालयाच्या स्वत:च्या इतर संकेतस्थळ-आधारित यंत्रणेसह वास्तविक वेळेत पूर्णपणे समाकलित केलेले आहे.
- प्रणालीचा एक भाग म्हणून हब अँड स्पोक मॉडेलमध्ये नियंत्रण कक्षाचे जाळे तयार केले आहे. नवी दिल्ली येथील MSMEच्या सचिव कार्यालयात त्याचे मुख्य केंद्र आहे. तसेच आत्तापर्यंत, 66 राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन आणि कार्यान्वित केले आहेत.
No comments:
Post a Comment