Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, June 3, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 3 June 2020 Marathi | 3 जून मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 3 June 2020  Marathi |
       3 जून  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स


    1.5 कोटी दुग्ध व्यवसायिकांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) अभियान सुरु

    केंद्रीय सरकार 1 जून ते 31 जुलै 2020 या दिन महिन्यात एका विशेष मोहिमेच्या अंतर्गत दुग्ध संघ आणि दुग्ध उत्पादक कंपन्याशी निगडीत 1.5 कोटी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) प्रदान करणार आहे.
    पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग यांनी वित्तीय सेवा विभागाच्या सहकार्याने या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सर्व परिपत्रक व KCC अर्जाचा नमुना सर्व राज्य दूध महासंघ व दूध संघांना पाठविला आहे.
    1.5 कोटी दुग्ध उत्पादकांना KCC देण्याची विशेष मोहीम ही पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत निधी योजनेचा एक भाग आहे.
    ठळक बाबी
    • दुग्ध सहकारी चळवळी अंतर्गत अंदाजे 1.7 कोटी शेतकरी देशातल्या 230 दुग्ध संघाशी निगडीत आहेत.
    • या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात दुग्ध सहकारी संस्था आणि विविध दूध संघांशी संबंधित आणि KCC नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना यात सामावून घेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
    • ज्या शेतकऱ्यांकडे आधीपासून भूमी-स्वामित्वाच्या आधारे KCC आहे, त्यांची KCC पत मर्यादा वाढविली जाऊ शकते, असे असले तरी त्यांना 3 लक्ष रुपयांच्या मर्यादेपर्यंत व्याजात सूट उपलब्ध असणार आहे.
    • तथापि, तारणशिवाय KCC पतपुरवठा करण्याची सर्वसाधारण मर्यादा 1.6 लक्ष रुपये एवढी आहे, परंतु जे शेतकऱ्यांचे दुग्ध थेट संघाकडून खरेदी केले जाते, अशा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणत्याही मध्यस्थाविना दुग्ध उत्पादक आणि प्रक्रिया करणारे एकक यामध्ये करार झालेला असतो, त्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या विना तारण कर्जाची सीमा 3 लक्ष रुपयांपर्यंत असू शकते. यामुळे दुग्ध संघाशी संबंधित दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांसाठी अधिक पत उपलब्धतेची तसेच बँकांना कर्जाची परतफेड करण्याचे आश्वासन मिळणार.
    पार्श्वभूमी
    15 मे 2020 रोजी अर्थमंत्र्यांनी KCC योजनेच्या अंतर्गत 2.5 कोटी नवीन शेतकर्‍यांना संरक्षण देण्याची घोषणा केली होती. यामुळे सध्या सुरु असलेल्या अर्थव्यवस्थेच्या कोंडीमुळे त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांना पाच लक्ष कोटीं रुपयांचे  अतिरिक्त खेळते भांडवल मिळणार.
    गेल्या 5 वर्षात 6 टक्क्यांहून अधिक CAGRसह दुग्धव्यवसाय हे अर्थव्यवस्थेच्या वेगाने विकसित होणार्‍या क्षेत्रांपैकी एक आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या खेळते भांडवल आणि विपणनाच्या गरजा भागविण्यासाठी अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढणार.
    किसान क्रेडिट कार्ड योजना
    किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारतीय बँकांनी ऑगस्ट 1998 मध्ये सुरू केलेली पतपुरवठा योजना आहे. आर.व्ही. गुप्ता समितीच्या शिफारशीवरून कृषी गरजांसाठी मुदत कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेनी (NABARD) तयार केली आहे.
    या योजनेमधून शेतीसाठी व शेतीपूरक व्यवसायांसाठी खेळते भांडवल पुरविले जाते. यात 10-20 टक्के आकस्मिक खर्चाची तरतूद आहे. शेतकऱ्याला पतपुस्तिका व चेक बुक दिले जाते. पिकविमा तसेच वैयक्तिक अपघात विमा देखील मिळतो.


    अमृतसरला नवीन ‘ग्रीनफील्ड’ मार्ग विकसित करण्याची रस्ते वाहतूक मंत्रीची घोषणा

    केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि MSME मंत्री नितीन गडकरी यांनी 2 जून 2020 रोजी ‘दिल्ली-अमृतसर द्रुतगती महामार्गा’चा भाग म्हणून नाकोदर ते सुलतानपूर लोधी, गोविंदवाल साहिब, खदूर साहिब मार्गे अमृतसर शहराला नवीन ‘ग्रीनफील्ड’ मार्ग विकसित करण्याची घोषणा केली.
    द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
    ठळक बाबी
    • अमृतसर ते गुरदासपूर हा रस्तादेखील पूर्ण विकसित केला जाणार आहे व सिग्नलमुक्त केला जाणार आहे. यासह, वाहतुकीस नाकोदरहून, म्हणजेच अमृतसरमार्गे किंवा करतारपूरमार्गे गुरदासपूरला जाण्याचा पर्याय उपलब्ध असणार.
    • नवा ‘ग्रीनफील्ड’ मार्ग केवळ अमृतसर शहरालाच नव्हे तर पंजाबमधले सुलतानपूर लोधी, गोइंदवाल साहिब, खदूर साहिब तसेच अलीकडे विकसित झालेल्या डेरा बाबा नानक / करतारपूर साहिब आंतरराष्ट्रीय मार्गिकेला देखील सर्वात कमी अंतराची व वैकल्पिक द्रुतगती मार्गाची जोडणी देणार.
    • या मार्गामुळे अमृतसर ते दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गावरील प्रवास सध्याच्या आठ तासांवरून कमी होऊन चार तास होणार.
    प्रस्तावित द्रुतगती महामार्ग हा शहराचे धार्मिक महत्त्व पाहता अमृतसर मार्गे जाणार आहे कारण तेथे दरवर्षी चार दशलक्ष पर्यटक भेट देतात आणि म्हणूनच भारतमाला अंतर्गत दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्गाची संकल्पना मांडण्यात आली होती.

    No comments:

    Post a Comment