Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, July 30, 2018

    5 सेकंदात टक्के % कसा काढतात ते समजून घ्या. Understand how you find in 5 seconds any number percentage.

    Views
     5 सेकंदात  टक्के % कसा काढतात ते समजून घ्या.
    Understand how you find in 5 seconds any number percentage.



    Marathi | मराठी

    आपण पाहिले आहे की कोणत्याही संख्येचा 1% काढायचा असेल तर त्या संख्येच्या दोन पॉईंट डावीकडे जायचे.
    उदा. 440 चा 1% म्हणजे 4.40 आहे.

    तसेच 440 चे 10% म्हणजे एक पॉईंट डावीकडे जायचे आहे, म्हणजे 44.0

    तसेच कोणत्याही संख्येची 100% म्हणजे तिच संख्या आहे.
    उदा. 440 ची 100% म्हणजे 440 हिच संख्या आहे.

    कोणत्याही संख्येच्या च्या 150% म्हणजे त्या संख्येची दीड पट असते.

    10 च्या 150% म्हणजे दिड पट 15 आहे.
    आपण येथे प्रथम 10 च्या आर्धी संख्या काढली(म्हणजे 50% काढले)ती आली 5 आणि नंतर 5 ही संख्या मूळ संख्येत मिळवली (10+5) तर उत्तर आले 15

    आता 440 च्या दिड पट कसे काढावे.
    येथे 440 च्या आर्धे 220 केले आणि नंतर ते 220 हे 440 मध्ये मिळवले. 440+220 = 660

    दुसरा प्रकार:- 44 च्या आर्धे 22. आणि 22 च्या तिप्पट म्हणजे 66. आता शेवटी शून्य लावायचा म्हणजे 660.

    आता तुम्ही पुढील संख्यांचा 150% काढा.
    100, 200, 250, 28, 4000

    प्रश्न:- आंब्याची पेटी आहे. त्यातील 5 आंबे जे की 10% आहेत, ते बाहेर काढले, तर,
    1) 5 आंबे काढण्या आगोदर पेटीत एकूण किती आंबे होते ?
    2) 5 आंबे काढल्यानंतर पेटीत किती आंबे राहिले ?
    उत्तर :-
    आता जर 5 आंबे 10% असतील तर 100% म्हणजे एकूण आंबे असतील. 10% च्या 10 पट म्हणजे 100% म्हणजेच 5(10%) च्या 10 पट म्हणजे 50(100%) आहेत.
    5 =10%
    50=100%
    म्हणजे 5 आंबे काढण्या आगोदर पेटीत 50 आंबे होते.
    5 आंबे पेटी मधून काढल्या नंतर पेटीत 45 (90%)आंबे राहतील.


    आपण काल पाहिले आहे की 150 च्या 20% म्हणजे 30 आहे.(हे तोंडी काढता आले पाहीजे)
    आता प्रश्न असा असतो,
    एका संख्येची 20% ही 30 आहे तर मूळ संख्या काढा?
    म्हणजे आपल्याला 100% संख्या काढायची आहे.(कारण कोणत्याही संख्येची 100% म्हणजे तिच संख्या असते)

    20% X  5 = 100%
    30 X  5    = 150

    म्हणजे मूळ संख्या 150 आहे.


    आता 20 ही एका संख्येची 10% आहे तर मूळ संख्या काढा ?
    20*10 =200

    आता 20 ही 50% आहे तर मूळ संख्या काढा?
    50%*2=100%
    20*2=40

    आता 20 ही 200% आहे तर मूळ संख्या काढा ?
    200%/2=100%
    20/2= 10
    म्हणजेच 20 ही 200% असल्यास 10 ही 100% आहे.



    No comments:

    Post a Comment