Current affairs | Evening News Marathi
Current affairs 8 February 2020 Marathi |
8 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
2017-18 साली देशातला बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षांमध्ये सर्वाधिक
देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षांत सर्वाधिक राहिला आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने केलेल्या नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षणानुसार देशातला 2017-18 या वर्षाचा बेरोजगारीचा दर हा 6.1 टक्के होता.
सर्वेक्षणानुसार,
- 1972-73 या वर्षात हा बेरोजगारीचा दर सगळ्यात जास्त होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा बेरोजगारीच्या दरात गंभीर वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कामगारांची गरज कमी होत गेल्याने त्यांना कामावरून हटवण्यात आले. नोटाबंदीमुळे आलेल्या मंदीनंतर अनेकांचा रोजगार हिरावला.
- 2017-18 या वर्षात ग्रामीण भागातला बेरोजगारीचा दर 5.3 टक्के होता, तर शहरी भागात 7.8 टक्के राहिला.
- तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजेच 13 ते 27 टक्क्यांवर पोहोचला आहे.
- शहरी भागात 15 ते 29 या वयोगटातले तरुण सगळ्यात जास्त बेरोजगार आहेत. या वयोगटातले 18.7 टक्के पुरुष तर 27.2 टक्के महिला नोकरीच्या शोधात आहेत.
‘जियो पारशी’ योजना सुरू झाल्यापासून पारशी लोकसंख्येत वाढ झाली
2013 सालापासून देशातली पारशी धर्म पाळणाऱ्या लोकांची संख्या 233 एवढ्या संख्येनी वाढलेली आहे.
2013 साली भारत सरकारने देशातल्या अल्पसंख्याक गटात मोडणाऱ्या पारशी धर्मीय समुदायासाठी ‘जियो पारशी’ योजना लागू केली होती, ज्यांच्या अंतर्गत या समाजातल्या घटत्या लोकसंख्येला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
ठळक बाबी
- ‘जियो पारसी’ योजनेसाठी आतापर्यंत 14 कोटी रुपये खर्च झाला आहे.
- ‘राष्ट्रीय अल्पसंख्यांक कायदा-1992’ याच्या अंतर्गत अधिसूचित असलेल्या पारशी (झोरोएस्ट्रिअन) समुदायाची लोकसंख्या 1941 साली 1,14,000 वरून 2011 साली ती फक्त 57,264 पर्यंत खाली आली होती.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment