Current affairs | Evening News Marathi
Current affairs 7 February 2020 Marathi |
7 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
चालू आर्थिक वर्षातला शेवटचा द्वैमासिक पतधोरण आढावा: रेपो दर कायम
भारतीय रिझर्व्ह बँकेनी चालू आर्थिक वर्षातला शेवटचा द्वैमासिक पतधोरण आढावा 6 फेब्रुवारी 2020 रोजी जाहीर केला आहे. ही पतधोरण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांसाठी आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय आढावा समितीने एकमताने व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे दर पुढीलप्रमाणे आहेत –
- रेपो दर – 5.15 टक्के
- रिव्हर्स रेपो दर – 4.9 टक्के
- बँक दर – 5.4 टक्के
- कॅश रिझर्व्ह रेशियो (CRR) - 4 टक्के
- स्टॅट्यूटरी लिक्वीडिटी रेशियो (SLR) - 18.5 टक्के
पुढील दोन महिन्यांसाठी रेपो दर 5.15 टक्के राहणार असून, सलग दुसऱ्यांदा भारतीय रिझर्व्ह बँकेनी रेपो दर कायम ठेवले आहे.
रिझर्व्ह बँकेचे वक्तव्य
- 2020-21 या वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) किंवा विकास दर 6 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
- तसेच अर्थव्यवस्थेची अवस्था कुमकुवत असून, उत्पादनांना असलेली एकूण मागणी कमी राहण्याची शक्यता आहे.
- RBIने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये डिसेंबरमधील पतधोरणाआधी सलग पाचवेळा रेपो दरात कपात केली होती.
झांसीमध्ये ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ उभारणार
उत्तरप्रदेशाच्या झांसी या शहरात ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ उभारण्याची भारत सरकारची योजना आहे. सध्या विकसित करण्यात येत असलेल्या बुंदेलखंड प्रदेशात संरक्षण मार्गिका तयार केली जात आहे, त्यांच्याच एक भाग म्हणून ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ची उभारणी केली जाणार आहे.
- ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ याचा परिसर 6 हजार एकर पर्यंत पसरलेला असेल. प्रकल्पामध्ये अंदाजे 37 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
- हा प्रकल्प युक्रेनच्या कंपन्यांच्या सहकार्याने ‘टायटन एव्हिएशन अँड एरोस्पेस इंडिया लिमिटेड’ ही कंपनी विकसित करणार आहे.
- हा प्रकल्प चार टप्प्यात विकसित करण्याचे नियोजित आहे. तेथे एव्हिएशन यूनिवर्सिटी, एरोस्पेस लॅबोरेटरीज तसेच एअरबस, बोईंग, रशियन हेलिकॉप्टर अश्या वाहनांसाठी सिम्युलेटर सुविधा उभारली जाणार आहे. विमानांसाठी प्रगत देखरेख व दुरुस्ती केंद्र आणि ड्रोनची निर्मिती अश्या अत्याधुनिक सुविधा देखील असणार आहे.
- याशिवाय धावपट्टी, निवासी वसाहत, विमानांसाठी सुट्या भागांसाठी उत्पादन केंद्र आणि विमानबांधणी केंद्र देखील असणार आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment