Current affairs | Evening News Marathi
Current affairs 9 February 2020 Marathi |
9 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
खवल्या मांजरापासून कोरोना विषाणू मानवात आला: शोध
चीनमधल्या संशोधकांनी कोरोना विषाणूचे मूळ शोधून काढले. संशोधनात असे आढळून आले आहे की खवल्या मांजर (पांगोलिन) या दुर्मिळ वन्यप्राणीपासून हा विषाणू मानवात आला आहे. खवल्या मांजराची आशियात सर्वाधिक तस्करी होते.
चीनमध्ये या विषाणूने आतापर्यंत 800 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे आणि हा आकडा वाढतच आहे. याचा उद्रेक वुहान शहरापासून झाला.
संशोधनानुसार, कोरोना विषाणूचे जैविक स्वरूप हे खवल्या मांजराच्या पेशीपासून मिळविण्यात आलेल्या जैविक स्वरूपाबरोबर 99 टक्के जुळतो. खवल्या मांजराची होणारी तस्करी यासाठी कारणीभूत असल्याचा संशय आहे. चीनमध्ये पारंपरिक औषधांमध्ये या प्राण्याचा वापर केला जातो. तसेच, त्यांच्या मांसाला अधिक मागणी आहे.
2002-03 या साली देखील अश्याच SARS विषाणूचा चीनमध्ये उद्रेक झाला होता. तेव्हा विषाणू सिव्हेट या सस्तन प्राण्यापासून मानवांमध्ये आला होता.
खवल्या मांजर
स्तनिवर्गातल्या फोलिडोटा गणाच्या मॅनिडी कुलातला हा प्राणी आहे. या कुलात मॅनिस हा एकच वंश असून त्यात सात जाती आहेत. त्यांपैकी काही आफ्रिकेत व काही आशियात आढळतात. मुग्यांची व वाळवीची वारूळे उकरून त्यांतल्या मुंग्या व वाळव्या ते आपल्या चिकट जिभेने टिपून खाते. जिभेने चाटून पाणी पितात.
खवल्या मांजराच्या दोन जाती भारतात आढळतात, त्या म्हणजे - भारतीय खवल्या मांजर (मॅनिस क्रॅसिकॉडेटा) आणि चिनी खवल्या मांजर (मॅनिस पेटॅडॅक्टिला). भारतीय जाती हिमालयाच्या दक्षिणेस मैदानी प्रदेशात व डोंगरांच्या उतरणीवर आणि श्रीलंकेत आढळतात. चिनी जाती हिमालय, आसाम, नेपाळ, म्यानमार, दक्षिण चीन, हैनान आणि फॉर्मोसा या देशांमध्ये आढळतात.
लेखक मनोज दास ह्यांना ‘मिस्टिक कलिंगा लिटररी अवार्ड’ मिळाला
ओडिशा सरकारच्या वतीने मनोज दास ह्यांना ‘मिस्टिक कलिंगा लिटररी अवार्ड’ (भारतीय व वैश्विक भाषा) हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मनोज दास ओडिया आणि इंग्रजी भाषेत लिखाण करतात.
8 फेब्रुवारी 2020 रोजी भुवनेश्वर या शहरात ‘मिस्टिक कलिंग फेस्टिव्हल’ या महोत्सवाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूपात 1 लक्ष रुपये रोख रक्कम, शाल व प्रमाणपत्र देण्यात आले.
‘मिस्टिक कलिंग फेस्टिव्हल’ हा ओडिशा सरकारच्या वतीने आयोजित केला जाणारा वार्षिक साहित्य व सांस्कृतिक महोत्सव आहे. हा कार्यक्रम 8 व 9 फेब्रुवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान कविता वाचन, चर्चा, व्याख्यान, संगीत मैफिली आणि नृत्य यांचे सादरीकरण करण्यात आले.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment