Current affairs | Evening News Marathi
Current affairs 10 February 2020 Marathi |
10 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
कमकुवत आणि उत्कृष्ट कामगिरी करणार्या स्मार्ट शहरांच्या जोड्या तयार केल्या गेल्या आहेत: स्मार्ट सिटीज मिशन
भारत सरकारच्या “स्मार्ट शहरे अभियान” अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या स्मार्ट शहरांदरम्यान कामगिरीच्या बाबतीत तफावत दिसून आली आहे. त्यावर तोडगा म्हणून कमकुवत आणि उत्कृष्ट कामगिरी करणारे स्मार्ट शहर अश्या जोड्या तयार करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाने अश्या 20 जोड्या तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालय आणि स्मार्ट सिटीज मिशन या संस्था शहरांमधील भागीदारीसंबंधी काम करीत आहेत. विकास करण्यात मागे पडलेल्या शहरांना उत्कृष्ट कामगिरी करणारी शहरे त्यांचे कार्य सुधारण्यासाठी मदत करणार. त्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान करणार.
अहमदाबाद (प्रथम), नागपूर, तिरुपूर, रांची, भोपाळ, सूरत, कानपूर, इंदौर, विशाखापट्टणम, वेल्लोर, वडोदरा, नाशिक, आग्रा, वाराणसी, दावणगेरे, कोटा, पुणे आणि उदयपूर ही शहरे स्मार्ट शहरे बनण्याच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी अव्वल शहरे आहेत.
अभियानाविषयी
2015 साली “स्मार्ट शहरे अभियान” चालू करण्यात आले. या अभियानाच्या अंतर्गत स्पर्धेमधून चार फेऱ्यांमध्ये 100 शहरांची निवड केली गेली. शहरांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने तसेच पर्यावरणावर त्याचा कमीतकमी परिणाम व्हावा या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाताच्या आर्सेनिक-प्रतिरोधक वाणाची लागवड केली गेली
भारताच्या संशोधकांनी भाताचे (तांदूळ) आर्सेनिक-प्रतिरोधक वाण विकसित केले आहे. त्याच्या चाचणी यशस्वी ठरल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये त्याचे व्यापारीकरण केले गेले आहे.
भारतात पश्चिम बंगाल या प्रदेशामध्ये भूगर्भात आर्सेनिकचे प्रमाण अत्याधिक आहे. राज्यातल्या सात जिल्ह्यांमध्ये 83 विभाग आहेत, ज्यात आर्सेनिकची पातळी मानवी आरोग्याच्या दृष्टीने ठरविलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे.
नव्या वाणाविषयी
- “मुक्तोश्री (IET 21845)” असे नाव या भाताला देण्यात आले आहे. हे वाण जेनेटिकली मॉडीफाईड (JM) आहे म्हणजेच भात पिकाच्या मूळ संरचनेत बदल करण्यात आले आहेत.
- पश्चिम बंगालच्या कृषी विभागाच्या अंतर्गत असलेले चिनसुरहमधले तांदूळ संशोधन केंद्र आणि लखनऊची राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था इथल्या संशोधकांनी संयुक्तपणे ही वाण विकसित केले आहे.
- ही बियाणे राज्याच्या वेगवेगळ्या भागात ओल्या हंगामात आणि कोरड्या हंगामात यशस्वी चाचण्यानंतर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
- चाचण्यांमधून असे आढळले की इतर विविध प्रकारच्या तांदळाच्या तुलनेत नव्या वाणामध्ये आर्सेनिकचे प्रमाण कमी प्रमाणात होते. या वाणाचे हिवाळ्याच्या हंगामात हेक्टरी 5.5 मेट्रिक टन आणि खरीप हंगामात हेक्टरी 4.5 ते 5 मेट्रिक टन उत्पादन घेतले जाऊ शकते.
आर्सेनिक पदार्थ
आर्सेनिक नैसर्गिकरीत्या पृथ्वीच्या भूगर्भात विपुल प्रमाणात तसेच खडक, माती, पाणी आणि हवेमध्ये कमी प्रमाणात आढळते. हा पदार्थ बर्याच वेगवेगळ्या खनिजांमध्ये देखील आढळतो. वातावरणात असलेल्या आर्सेनिकपैकी एक तृतियांश भाग ज्वालामुखीसारख्या नैसर्गिक स्त्रोतांकडून वातावरणात आला आहे आणि उर्वरित भाग मानवनिर्मित स्त्रोतांकडून आला आहे.
विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की आर्सेनिक हा रासायनिक घटक भूजळ आणि मातीपासून धान्याच्या माध्यमातून अन्न साखळीत प्रवेश करू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, आर्सेनिकचा दीर्घकाळ होणारा संपर्क विषबाधा होण्यास कारणीभूत ठरते. यामुळे त्वचेचे घाव आणि त्वचेचा कर्करोग होऊ शकतो.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment