Current affairs | Evening News Marathi
Current affairs 11 February 2020 Marathi |
11 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
केरळमधली 2,130 बेटे ‘किनारपट्टी नियंत्रण क्षेत्र’ अंतर्गत संरक्षित
केरळमधली 2,130 बॅकवॉटर बेटे ‘किनारपट्टी नियंत्रण क्षेत्र’ (Coastal Regulation Zone -CRZ) अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहेत आणि त्याद्वारे त्या बेटांवरील विकासाच्या कामांवर अंकुश लावला जाणार आहे.
या बेटांवर हाय टायड लाईन (HTL) ते किनाऱ्याकडील बाजूच्या 50 मीटरपर्यंतच्या प्रदेशादरम्यान कोणत्याही नवीन बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही. वसंत ऋतुत येणाऱ्या भरतीवेळी समुद्राचे पाणी जास्तीत जास्त ज्या सीमेपर्यंत पोहोचते त्याला हाय टायड लाईन (HTL) म्हणतात.
ठळक बाबी
- बेटांच्या यादीमध्ये मुलावूकड, चंदामंगलम, कोथड, पिझला आणि एर्नाकुलमचे कदममाकुडी, अलाप्पुझामधली 474 बेटे, कोल्लममधली 184 बेटे, तिरुवनंतपुरममधली 43 बेटे आणि इतर बेटांचा समावेश आहे.
- या क्षेत्रातल्या केवळ स्थानिकांना त्यांच्या राहत्या घरांची दुरुस्ती व पुनर्बांधणीस परवानगी दिली जाणार आहे. 50 मीटरच्या मर्यादेपलीकडे स्थानिक संस्था स्थानिक मंडळाच्या परवानगीने नवीन राहत्या घरांची निर्मिती करु शकणार.
- केरळ किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणासाठी (KCZMA) नॅशनल सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज (तिरुवनंतपुरम) ही संस्था या बेटांची यादी तयार केली.
कावेरी खोरे शेतीसाठी संरक्षित केले गेले: तामिळनाडू सरकार
राज्याची खाद्यान्न सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, कावेरी खोऱ्याचा भूप्रदेश ‘संरक्षित विशेष कृषी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात येणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एदाप्पडी के. पलानीस्वामी ह्यांनी केली. या घोषणेनंतर तामिळनाडू राज्य सरकार या क्षेत्रात हायड्रोकार्बन स्त्रोतांच्या शोध प्रकल्पांना परवानगी देणार नाही.
तामिळनाडू राज्यासाठी कावेरी खोरे क्षेत्र हा एक महत्त्वाचा कृषी प्रदेश आहे. हा प्रदेश समुद्राजवळ असल्याने या भागाचे रक्षण करण्याची गरज भासत आहे.
तंजावूर, तिरुवरूर, नागापट्टिनम, पुडुकोट्टई, कुडलूर, अरियलूर, करूर आणि तिरुचिरापल्ली येथील कावेरी खोऱ्याचे क्षेत्र संरक्षित विशेष कृषी क्षेत्रात रुपांतरित केले जाणार आहे.
या भागात नैसर्गिक वायूचे साठे असल्याचे यापूर्वी संशोधनात आढळून आले होते. त्याचा शोध घेण्यासाठी 2011 साली ग्रेट ईस्टर्न एनर्जी कॉर्पोरेशन या कंपनीसोबत सामंजस्य करार केला गेला होता. त्यानंतर याविषयी राज्यात वादाचे वातावरण निर्माण झाले.
तामिळनाडू राज्य
तामिळनाडू राज्य भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे. चेन्नई हे शहर राज्याची राजधानी आहे. राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. कावेरी नदी, पालर नदी व वैगई नदी या राज्यातल्या प्रमुख नद्या आहेत.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment