Current affairs | Evening News Marathi
सौदी अरब पाकिस्तानात ग्वादर बंदरावर तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारणार
सौदी अरब या आखाती देशाने पाकिस्तान या आशियाई देशातल्या ग्वादर बंदरावर USD 10 अब्ज खर्चून एक तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारणार असल्याची एक योजना तयार केली आहे.
पाकिस्तानात चीनच्या मदतीने हिंद महासागर बंदर (Indian Ocean port) उभारण्यात येत आहे. या ठिकाणी एक कार्यक्रमात यासंबंधी घोषणा करण्यात आली.
तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पाकिस्तानाची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी मदत म्हणून सौदी अरब देशात गुंतवणूक करीत आहे. शिवाय चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (China Pakistan Economic Corridor -CPEC) या प्रकल्पामधून चीनने पाकिस्तानाला USD 60 अब्ज एवढी आर्थिक मदत देण्याचे वचन दिले आहे. त्यामधूनच हिंद महासागर बंदर उभारण्यात आले आहे.
पाकिस्तान हा दक्षिण आशियामधील एक देश आहे. पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून देशात चार सुभे (परगणा) आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. पाकिस्तानी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे. हा देश इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचा (सध्याची इस्लामिक सहयोग संघटना/OIC) जनक राष्ट्र आहे.
सौदी अरब हा एक आखाती देश आहे, ज्याने अरब खंडाचा 80% भाग व्यापलेला आहे. हा जगातला सर्वात मोठा तेल निर्यातदार आहे. रियाध ही देशाची राजधानी आहे आणि सौदी रियाल हे चलन आहे.
Current affairs | Evening News Marath
अमली पदार्थांचे व्यसन या समस्येला संबोधित करणारी भारत सरकारची नवी पंचवार्षिक कृती योजना
देशामध्ये अमली पदार्थ व औषधांचा गैरवापर या समस्येला संबोधित करणार्या भारत सरकारच्या नव्या पंचवार्षिक कृती योजनेचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
‘अमली पदार्थांच्या मागणीत घट विषयक राष्ट्रीय कृती योजना 2018-23’ (National Action Plan for Drug Demand Reduction -NAPDDR) या नावाने ही योजना भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने आखली आहे.
मंत्रालयाने ‘अमली पदार्थांच्या मागणीत घट’ विषयक राष्ट्रीय धोरणाचा मसुदा रद्द केल्यानंतर हा पुढाकार घेतला गेला आहे. जवळपास साडेपाच वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या आणि कालांतराने दोनदा पुनर्रचना केल्यानंतर अंतिम मसुदा तयार केला गेला.
ठळक बाबी
- केंद्र, राज्य आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगी प्रयत्नांद्वारे सेवा प्रदात्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता-बांधणी करण्यासोबतच प्रसार माध्यमांमधून व्यसनमुक्तीच्या संदर्भात जनजागृती करणे, निवारक शिक्षण, सल्ला देणे, उपचार आणि पुनर्वसन अश्या घटकांवर ही योजना केंद्रीत आहे.
- एक राष्ट्रीय टोल-फ्री दूरध्वनी क्रमांक कार्यरत करणे.
- मुख्याध्यापक, कुलगुरू आणि शैक्षणिक संस्थांचे संचालक यांच्याकरवी संस्थेच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री होत नाही याची खात्री बाळगणे.
Current affairs | Evening News Marath
औरंगाबादमध्ये नववी ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद’ आयोजित
दि. 16 ते 18 जानेवारी 2019 या कालावधीत औरंगाबाद (महाराष्ट्र) येथे ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद 2019’ (International Micro Irrigation Conference -9IMIC) भरविण्याचे ठरविण्यात आले आहे.
या परिषदेत चर्चेचा विषय 'आधुनिक शेतीमधील सूक्ष्म सिंचन' (Micro Irrigation in Modern Agriculture) हा आहे. केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे हा कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहेत.
आंतरराष्ट्रीय सिंचन व नाला आयोग (ICID), भारत राष्ट्रीय भुपृष्ठावरील जल समिती (INCSW) आणि WAPCOS लिमिटेड यांच्या सहयोगाने भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय सिंचन व नाला आयोग (International Commission on Irrigation and Drainage -ICID) ही सिंचन आणि नाला या विषयक सन 1950 मध्ये स्थापन करण्यात आलेली एक आंतरराष्ट्रीय ना-नफा, अशासकीय संस्था आहे. हे जगभरातील तज्ञांचे एक व्यवसायिक जाळे आहे, जे ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी सल्ला व तांत्रिक मदत देते. याचे नवी दिल्ली (भारत) येथे मुख्यालय आहे.
Current affairs | Evening News Marath
केरळमधील आध्यात्मिक परिक्रमासाठी 85.23 कोटी मंजूर झाले
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने केरळमध्ये आध्यात्मिक परिक्रमा-3 (Spiritual Circuit) या प्रकल्पाच्या विकासासाठी 85.23 कोटी रुपये एवढ्या निधीला मंजुरी दिली आहे.
भारत सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत उभारण्यात येणार्या या प्रकल्पामधून राज्यातल्या सर्व 14 जिल्ह्यांमध्ये आढळून येणार्या 133 धार्मिक ठिकाणांना जोडले जाणार आहे. राज्याच्या कसारगोडे, वायंद, कन्नूर, कोझिकोडे, पलक्कड, मलप्पुरम, थ्रिसूर, एर्नाकुलम, इदूक्की, अलाप्पुझा, कोट्टायम, पठाणम्हीट्टा, कोल्लम आणि तिरुवानथपुरम या जिल्ह्यांमध्ये प्रकल्पाच्या अंतर्गत विकासकार्ये चालवली जाणार.
योजनेविषयी
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘प्रसाद’ (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive -PRASAD) आणि ‘स्वदेश दर्शन योजना’ सन 2014-15 मध्ये सुरू केली. देशात विषय आधारित पर्यटन परिक्रमा (circuit) प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरू केली गेली आहे.
या योजनेच्या अंतर्गत विकासासाठी आतापर्यंत 15 पर्यटन परिक्रमांची ओळख पटविण्यात आलेली आहे. ते आहेत - बुद्धीष्ट परिक्रमा, ईशान्य परिक्रमा, तीर्थंकार परिक्रमा, सागरकिनारा परिक्रमा, हिमालय परिक्रमा, कृष्ण परिक्रमा, वाळवंट परिक्रमा, पर्यावरण परिक्रमा, वन्यजीवन परिक्रमा, आदिवासी परिक्रमा, ग्रामीण परिक्रमा, सूफी परिक्रमा, आध्यात्मिक परिक्रमा, रामायण परिक्रमा आणि वारसा परिक्रमा.
आतापर्यंत मंत्रालयाने 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 77 प्रकल्पांसाठी 6131.88 कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे.
Current affairs | Evening News Marath
महिला उद्योजकांसाठी भारत सरकारचा ‘वुमॅनिया ऑन GeM’ पुढाकार
भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ‘गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस’ (GeM) कडून महिला उद्योजक आणि महिलांच्या स्वयंसेवी गटांना GeM या ऑनलाइन मंचावर विविध उत्पादने विकण्यास प्रोत्साहन देण्याकरिता ‘वुमॅनिया ऑन GeM’ नावाचा एक नवा पुढाकार सुरू करण्यात आला आहे.
हा उपक्रम महिला उद्योजकांना आणि महिलांच्या स्वयंसेवी गटांना हस्तशिल्प आणि हातमाग, तागाची उत्पादने, गृह व कार्यालयाचे सुशोभीकरण अश्या विविध उत्पादनांची थेट विक्री करण्यास सक्षम करेल.
गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM)
हा वाणिज्य मंत्रालयाचा एक ऑनलाइन मंच आहे, जेथे सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्था आणि इतर विभागांकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते. सन 2016 पासून वस्तू व सेवांची भारत सरकारच्या सार्वजनिक खरेदी प्रक्रिया मंत्रालयाच्या ई-मार्केट व्यासपीठाद्वारे (GeM) व्यवस्थापित केली जात आहे. CII प्रादेशिक कार्यालयांमध्ये GeM संसाधन केंद्रे स्थापन केली गेली आहेत.
Current affairs | Evening News Marath
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फिलीप कोटलर अध्यक्षीय’ पुरस्काराने सन्मानित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्या वहिल्या ‘फिलीप कोटलर अध्यक्षीय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.पुरस्कारासाठी नरेंद्र मोदी यांची निवड राष्ट्रीय नेतृत्वाद्वारे त्यांनी दिलेल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी झाली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची ओळख मूल्यवर्धित निर्मिती (मेक इन इंडिया) आणि नाविन्यताचे केंद्र म्हणून झाली आहे. तसेच भारताला माहिती तंत्रज्ञान, वित्त व लेखा यासारख्या व्यवसायिक सेवा देणारे जागतिक स्तरावरचे केंद्र म्हणूनही ओळख मिळाली आहे.
पुरस्काराविषयी
प्राध्यापक फिलीप कोटलर हे अमेरिकेच्या केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट (नॉर्थ वेस्टन विद्यापीठ) येथे विपणन शास्त्राचे जागतिक दर्जाचे जेष्ठ प्राध्यापक आहेत. ते जागतिक ख्यातीचे एक लेखक आणि सल्लागार देखील आहेत. हा पुरस्कार ‘पीपल, प्रॉफीट आणि प्लॅनेट’ या तिहेरी टॅगलाईनवर प्रकाश टाकतो. हा पुरस्कार कोटलर यांच्याकडून दरवर्षी राष्ट्राच्या प्रमुखांना दिला जाईल.
No comments:
Post a Comment