Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, January 14, 2019

    Current affairs 14 January 2019 Marathi | 14 जानेवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219
    Current affairs | Evening News Marathi

    अशोक चावला यांनी TERIच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला

    नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर दि. 13 जानेवारी 2019 रोजी अशोक चावला यांनी दिल्लीच्या ‘ऊर्जा व स्त्रोत संस्था’ (TERI) या ना-नफा संस्थेच्या अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे.
    केंद्र सरकारकडून CBIला ‘एयरसेल-मॅक्सिस’ प्रकरणामध्ये चावला यांच्याविरोधात खटला दाखल करण्याला परवानगी मिळालेली आहे. आर्थिक घोटाळा आणि सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी चावला अडकले आहेत.
    संस्थेविषयी
    ‘ऊर्जा व स्त्रोत संस्था’ (The Energy and Resources Institute -TERI) ही नवी दिल्लीतली एक ना-नफा संशोधन संस्था आहे, जी ऊर्जा, पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात संशोधन कार्य चालवते. सन 1974 मध्ये या संस्थेची स्थापना ‘टाटा एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ या नावाने करण्यात आली होती.

    Current affairs | Evening News Marathi

    UAE आणि सौदी अरब या देशांनी कृषी उत्पन्नासाठी भारताची निवड केली

    संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि सौदी अरब या दोन आखाती देशांमधील अन्न सुरक्षेसंबंधी समस्येचे निराकरण करण्यासाठी भारताचा आधार घेण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
    मुंबईत झालेल्या भारतीय उद्योग संघ (CII) याच्या 25व्या ‘भागीदारी शिखर परिषद’मध्ये याबाबत घोषणा करण्यात आली. भारताच्या निर्यात धोरणाला चालना देणारा हा निर्णय पहिल्यांदाच कृषीमाल तसेच दुग्ध, फलोत्पादन आणि मत्स्यपालन अश्या शेती-पूरक यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळविण्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे.
    फार्म-टू-पोर्ट प्रकल्प
    त्यासाठी आखण्यात आलेला भारत सरकारचा ‘फार्म-टू-पोर्ट’ प्रकल्प हा विशेष आर्थिक क्षेत्राच्या संरचनेप्रमाणेच आहे, परंतु यात कॉरपोरेट पद्धतीने शेती करण्याची शैली वापरात आणली जाणार जेथे आखाती देशांच्या बाजारपेठेने ठरवून दिलेल्या मानदंडाप्रमाणे पीक घेतले जाईल. भारताची ही संकल्पना दोन्ही आखाती देशांच्या सरकारांनी स्वीकारलेली आहे. त्यादृष्टीने संयुक्त अरब अमिरात (UAE) भारतात सेंद्रीय आणि अन्न-प्रक्रिया उद्योगांमध्ये गुंतवणूक करू इच्छित आहे.
    सद्यपरिस्थिती
    देशातल्या शेतकर्‍यांना आधीच किमान आधारभूत किंमत (MSP) म्हणून उत्पादन खर्चाच्या 150% किंमत मिळत आहे. नव्या योजनेमुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यात अधिकच मदत मिळणार.
    यावर्षी भारत 290 दशलक्ष टन कृषी-उत्पन्न आणि सुमारे 310 दशलक्ष टन फलोत्पादन अश्याप्रमाणे एकूण 600 दशलक्ष टनपेक्षा जास्त शेतमालाचे उत्पादन घेणार, असा अंदाज आहे.

    Current affairs | Evening News Marathi

    भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 7.3% असेल: भारत बॅरोमीटर अहवाल 2019

    PwC संस्थेच्या सहकार्याने भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (Federation of Indian Chambers of Commerce and Industry -FICCI) कडून ‘भारत बॅरोमीटर अहवाल 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
    भारताच्या उत्पादन निर्मिती क्षेत्रामध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेच्या संदर्भात उत्पादकांचा दृष्टीकोन, पुढील 12 महिन्यांसाठी व्यवसायाचे वातावरण आणि व्यापारामधील स्पर्धात्मकता निर्धारित करणारे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.
    महत्त्वाचे निष्कर्ष
    • उत्पादन निर्मिती क्षेत्र हे देशाच्या संपत्तीच्या एका महत्त्वाच्या भागासाठी एक आर्थिक क्षेत्र खाते आहे. 2025 सालापर्यंत भारत USD 1 लक्ष कोटी (ट्रिलियन) एवढी उत्पादन निर्मिती अर्थव्यवस्था असण्याची अपेक्षा आहे.
    • पुढील 12 महिन्यांमध्ये भारत सरासरी 7% किंवा त्याहून अधिक वृद्धीदराने वाढण्याची क्षमता ठेवतो. हा अंदाज जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सारख्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थांच्या अंदाजपत्रकांशी जुळलेला आहे.
    • आगामी 12 महिन्यात उद्योजकांनी त्यांच्या क्षेत्रात वेगाने वाढ होण्याची अपेक्षा दर्शविलेली आहे.
    • वस्तू व सेवा कर (GST) यामुळे मालवाहतुकीमधील वेग आणि सुलभतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
    • 85% उद्योजकांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की त्यांची भविष्यातली वाढ वाढत्या निर्यातीमुळे होणार. वित्त वर्ष 2017-18 मध्ये भारताच्या निर्यातीमधला वृद्धीदर 9 .8% इतका आहे, जो गेल्या 5 वर्षांमध्ये सर्वाधिक आहे.
    • भारताची अर्थव्यवस्था 7.3% ते 7.7% या दरम्यान वाढू शकते आणि देशांतर्गत बाजारपेठेतली मागणी ही देशासाठी चालक ठरणार आहे, असा अंदाज आहे.
    Current affairs | Evening News Marathi

    सिक्किम राज्य सरकारची ‘एक कुटुंब एक नोकरी’ योजना

    सिक्किम राज्य सरकारने दि. 12 जानेवारी 2019 रोजी राज्यात ‘एक कुटुंब एक नोकरी’ (One Family One Job) योजना लागू केली आहे.
    मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नेतृत्वात राज्य सरकार राज्यातल्या प्रत्येक कुटुंबामधील एका सदस्याला एकतरी सरकारी नोकरी मिळावी या उद्देशाने ही योजना राबवित आहे. अश्या प्रकारचा खास कार्यक्रम चालविणारे हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे.
    या अनुषंगाने 12 जानेवारीला गंगटोकमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात 12,000 हून अधिक बेरोजगार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. सुरूवातीला फक्त त्या कुटुंबांच्या सदस्यांना नियुक्ती पत्र दिले गेलेत, जे सध्या सरकारी नोकरीमध्ये नाहीत. यापूर्वीच 25,000 पेक्षा अधिकांना नोकर्‍या दिल्या गेल्या.
    केवळ 6.4 लक्ष लोकसंख्या असलेल्या या राज्यात वर्तमानात 1 लक्ष नियमित सरकारी कर्मचारी आहेत. शिवाय सिक्किम हे देशातले एकमेव राज्य आहे, जे सरकारी कर्मचार्‍यांना सर्वाधिक वेतन देते.

    ब्रह्म दत्त: यस बॅंकेचे नवे अध्यक्ष

    माजी IAS अधिकारी ब्रह्म दत्त यांची यस बँकेच्या (Yes Bank) अंशकालिक गैर-कार्यकारी अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती दि. 4 जुलै 2020 पर्यंत प्रभावी करण्यात आली आहे.
    भारतातली चौथ्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातली बँक असलेल्या यस बँकेला भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून ‘बँकिंग नियमन अधिनियम-1949’ अन्वये परवानगी प्राप्त झाली आहे.
    ब्रह्म दत्त जुलै 2013 पासून स्वतंत्र संचालक म्हणून यस बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. शिवाय ते ‘नामनिर्देशन आणि वेतन समिती’चे अध्यक्षही आहेत. त्यांनी आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत कर्नाटक सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक जबाबदार्‍या सांभाळलेल्या आहेत. त्यांनी पूर्वी मंत्रिमंडळ सचिवालयात तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्य पाहिले होते.

    बेंगळूरू रॅप्टर्स: 2019 प्रिमीयर लीग सांघिक बॅडमिंटन स्पर्धेचा विजेता

    बेंगळूरू येथे खेळल्या गेलेल्या ‘2019 प्रिमीयर लीग’ सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत बेंगळूरू रॅप्टर्सने अंतिम सामन्यात मुंबई राँकेटस् यांचा पराभव करीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे.
    या विजयासह बेंगळूरू रॅप्टर्सने त्यांचे पहिले प्रिमीयर बॅडमिंटन लीग जिंकले आहे. बेंगळूर रॅप्टर्स या संघात किडांबी श्रीकांत, वु जी त्रांग तसेच मोहम्मद अहसान आणि हेंदरा सतीयावान यांच्या पुरुष दुहेरी जोडीने आपापले सामने बेंगळूरूसाठी जिंकले आहेत.
    स्पर्धेविषयी
    प्रिमीयर बॅडमिंटन लीग ही सांघिक स्पर्धा आहे, जी भारतीय बॅडमिंटन महामंडळ (IBL) द्वारे व्यवस्थापित केली जाते आणि व्यवसायिक स्वरुपात IBL च्या मालकीची आहे. 2013 साली ‘इंडियन बॅडमिंटन लीग’ (IBL) या नावाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली. स्पर्धेत सहा संघ भाग घेतात. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात, ज्यात जास्तीतजास्त पाच परदेशी खेळाडू आणि कमीतकमी तीन महिला खेळाडू असतात आणि प्रत्येक संघाला किमान 2.12 कोटी रुपयांपर्यंत रक्कम खर्च करण्याची आवश्यकता असते.
    Current affairs | Evening News Marathi

    ‘2019 खेलो इंडिया खेळ’ याची सांगता झाली; महाराष्ट्र अव्वल ठरले

    दि. 9 ते 13 जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या पुणे शहरात खेळल्या गेलेल्या ‘2019 खेलो इंडिया खेळ’ या क्रिडा महोत्सवाची सांगता झाली.
    स्पर्धेअंती,
    • पदकतालिकेत अग्रस्थानी महाराष्ट्र राहले. महाराष्ट्र राज्याने 56 सुवर्ण, 44 रौप्य आणि 56 कांस्यपदकांची कमाई करीत पहिल्या क्रमांकावर स्पर्धा संपवली. महाराष्ट्राच्या पाठोपाठ दिल्ली (42 सुवर्ण, 27 रौप्य आणि 38 कांस्य) आणि हरियाणा (33 सुवर्ण, 34 रौप्य आणि 36 कांस्य) यांचा क्रमांक लागला.
    • खो-खोमध्ये महाराष्ट्राने मुलांच्या 17 व 21 वषार्खालील गटात विजय मिळविला.
    • पश्चिम बंगालच्या मेहुली घोष या आंतरराष्ट्रीय खेळाडूने 10 वर्षीय खेळाडू अभिनव शॉ याच्या साथीत 10 मीटर एयर रायफल मिश्रदुहेरी विभागात सुवर्णपदक पटकाविले. 10 वर्षांच्या खेळाडूने सुवर्णपदक मिळवण्याची ही पहिलीच कामगिरी आहे.
    या क्रिडा महोत्सवात 18 क्रिडाप्रकारांचा समावेश करण्यात आला होता. तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, लॉन टेनिस, टेबल टेनिस जिम्नॅस्टिक्स, ज्युदो, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, हॉकी, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, कबड्डी,  खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल असे 18 खेळ होते.
    खेलो इंडिया बाबत
    एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली. समाजाच्या अगदी तळागळात बदल करून राष्ट्रव्यापी क्रिडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जानेवारी-फेब्रुवारी 2018 या काळात ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ याच्या प्रथम संस्करणाचे आयोजन करण्यात आले.
    स्पर्धांमधून निवडण्यात येणार्‍या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत खेळाडूंना आठ वर्षापर्यंत दरवर्षी प्रत्येकी पाच लक्ष रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार, जी 1000 उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित करण्यात आलेली आहे.
    वर्षागणीक खेळाडूंना ‘खेलो इंडिया’ अंतर्गत जोडण्यात येणार. क्रिडा स्पर्धा आणि शिक्षण अश्या दोन्ही प्रकारे खेळाडूंना सहभाग घेता येईल अश्या देशभरातल्या 20 विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रिडा केंद्र म्हणून प्रोत्साहन दिले जाणार. मोठ्या राष्ट्रीय शारीरिक आरोग्यासंबंधी कार्यक्रमामधून 10-18 वर्षे वयोगटातील 200 दशलक्ष लहान मुला-मुलींना या कार्यक्रमात समाविष्ट केले गेले. शालेय खेळांमध्ये 16 क्रिडा प्रकारांचा समावेश केला गेला होता.

    Current affairs | Evening News Marathi

    No comments:

    Post a Comment