Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, September 2, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 2 September 2020 Marathi | 2 सप्टेंबर मराठी करेंट अफेयर्स

    Views

     

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 2 September 2020  Marathi
     2 सप्टेंबर  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स

    हिंद-प्रशांत प्रदेशात पुरवठा साखळींचा लवचिकपणा वाढविण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि जापान या देशांचा पुढाकार

    भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, ऑस्ट्रेलियाचे व्यापार मंत्री सायमन बर्मिंगहॅम आणि जापानचे अर्थ मंत्री काजियामा हिरोशी या मंत्र्यांची 1 सप्टेंबर 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक बैठक झाली. 

    एक मुक्त, निष्पक्ष, सर्वसमावेशक, भेदभाव नसलेला, पारदर्शक, आणि स्थिर व्यापार आणि गुंतवणुकीचे वातावरण देत आणि आपल्या बाजारपेठा खुल्या ठेवण्यात पुढाकार घेण्याचा दृढ निश्चिय मंत्र्यांनी व्यक्त केला. कोविड–19 संकट आणि आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या पटलावर नुकत्याच झालेल्या जागतिक पातळीवरील बदलांच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी हिंद-प्रशांत प्रदेशात पुरवठा साखळींचा लवचिकपणा वाढविण्याची गरज आणि क्षमता यावर जोर दिला.

    हिंद-प्रशांत प्रदेशामधील पुरवठा साखळीच्या लवचिकतेबाबत प्रादेशिक सहकार्याची आवश्यकता ओळखून मंत्र्यांनी सहकार्याच्या माध्यमातून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करण्याच्या दिशेनी काम करण्याचा आपला हेतू यावेळी सामायिक केला.

    2019 साली संचयी मालाचा व्यापार करताना, भारताचे संचयी सकल राष्ट्रीय उत्पादन 9.3 लक्ष कोटी (ट्रिलियन) डॉलर इतके आणि सेवा व्यापार अनुक्रमे 2.7 लक्ष कोटी डॉलर आणि 0.9 लक्ष कोटी डॉलर होता.

    ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड आणि देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो. कॅनबेरा ही राष्ट्रीय राजधानी आहे. ऑस्ट्रेलियन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.

    जापान हा पूर्व आशियामधील एक द्वीप-देश आहे. टोकियो ही राष्ट्रीय राजधानी आहे. जापानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.


    भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी लावला विश्वातल्या दूरच्या आकाशगंगेचा शोध

    भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी विश्वातल्या आतापर्यंतच्या सर्वात दूरवरच्या आकाशगंगेचा शोध लावून या अंतराळ शोध क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. शास्त्रज्ञांनी त्याला ‘AUDFs01’ असे नाव दिले आहे.

    ठळक बाबी

    • भारताच्या ‘अॅस्ट्रोसॅट’ नामक ‘बहू-तरंगी’ अंतराळ वेधशाळेनी पृथ्वीपासून 9.3 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या आकाशगंगेमधून अति-अतिनील किरणे सापडली आहेत.
    • ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स म्हणजेच आयुका या पुण्याच्या संस्थेच्या एका शास्त्रज्ञांच्या पथकाने डॉ. कनक साहा यांच्या नेतृत्वाखाली या आकाशगंगेचा शोध लावला आहे.
    • या आकाशगंगेच्या मूळ शोधाचे महत्व तसेच वेगळेपण याविषयी ब्रिटनमधून प्रकाशित झालेल्या ‘नेचर अॅस्ट्रोनॉमी’ या अतिशय प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये नोंदविण्यात आले आहे.

    अॅस्ट्रोसॅट बाबत

    अॅस्ट्रोसॅट (ASTROSAT) ही 1513 किलो वजनी भारताची पहिली समर्पित बहू-तरंगी अंतराळ वेधशाळा आहे. ISROच्या पाठिंब्याने आयुकाचे माजी प्राध्यापक श्याम टंडन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही अंतराळ वेधशाळा विकसित केली आहे.

    ही मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्यावतीने (ISRO) दिनांक 28 सप्टेंबर 2015 रोजी पाठवण्यात आली. ते समुद्रसपाटीपासून 650 कि.मी. उंचीवर पृथ्वीच्या खालच्या विषुववृत्तीय कक्षेत प्रस्थापित करण्यात आले आहे. ते एकाचवेळी विविध तरंगांमध्ये वैश्विक क्ष-किरण स्रोत आणि दूरवर असलेले तारे शोधू शकण्यास सक्षम आहे.



    No comments:

    Post a Comment