Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 4 September 2020 Marathi 4 सप्टेंबर मराठी करेंट अफेयर्स
“इंद्रा नेव्ही-20”: भारत आणि रशिया यांचा संयुक्त युद्धसराव
भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे.
ठळक बाबी
- “इंद्रा नेव्ही-20”चा मुख्य उद्देश दोन्ही नौदलामधले आंतर-संचालन अधिक दृढ करणे आणि बहु आयामी सागरी अभियानासाठी आकलन आणि पद्धती विस्तृत करणे हा आहे.
- सरावादरम्यान भारतीय नौदलाच्या ताफ्यात क्षेपणास्त्र विनाशिका ‘रणविजय’, स्वदेशी लढाऊ जहाज ‘सह्याद्री’ आणि ‘शक्ती’ या तेलवाहू जहाजाचा आणि हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. तर रशियाच्या ताफ्यात विनाशिका ‘एडमिरल विनोग्राडोव्ह’, विनाशिका ‘एडमिरल ट्रिब्युट’ आणि फ्लीट टॅंकर ‘बोरिस ब्यूटोमा’ या जहाजांचा समावेश आहे.
- 2003 साली सुरु झालेला “इंद्रा नेव्ही” म्हणजे दोन्ही देशांच्या नौदलामधल्या दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांचे प्रतिक आहे. सरावामुळे दोन्ही नौदलात परस्पर विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ होणार असून, उभय देशातले दीर्घ काळापासूनचे मैत्रीचे बंध अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.
रशिया देश
रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातला एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया जगातला सर्वात मोठा देश आहे. जगाच्या एकूण भूभागाच्या क्षेत्रफळापैकी सुमारे एक-सप्तमांश क्षेत्र रशियाने व्यापलेले आहे. रशियाचा विस्तार यूरोप व आशिया अशा दोन्ही खंडांत असून यूरोप खंडाचा पूर्वेकडील जवळजवळ निम्मा भाग तर आशिया खंडाचा उत्तरेकडील सुमारे दोन-पंचमांश भाग या देशाने व्यापलेला आहे.
मॉस्को हे देशाच्या राजधानीचे शहर आहे. रूबल हे रशियाचे राष्ट्रीय चलन आहे.
जनऔषधी योजनेच्या अंतर्गत रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी आठ उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेच्या अंतर्गत रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आठ पोषक उत्पादनांना जनऔषधी केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
ती उत्पादने खालीलप्रमाणे आहेत –
- जन औषधी पोषण माल्ट-बेस्ड (500 ग्रॅम) – 175 रुपये
- जन औषधी पोषण माल्ट-बेस्ड विथ कोको (500 ग्रॅम) – 180 रुपये
- प्रोटीन पाऊडर (चोकोलेट) (250 ग्रॅम) – 200 रुपये
- प्रोटीन पाऊडर (वॅनीला) (250 ग्रॅम) – 200 रुपये
- प्रोटीन पाऊडर (केसर पिस्ता) (250 ग्रॅम) – 200 रुपये
- जन औषधी जननी (250 ग्रॅम) – 225 रुपये
- प्रोटीन बार (35 ग्रॅम) – 40 रुपये
- जन औषधी इम्युनिटी बार (10 ग्रॅम) – 10 रुपये
कोविड-19 महामारीच्या काळात शरीराची विषाणूच्या विरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या उत्पादनांचा उपयोग होऊ शकतो. नैसर्गिकरित्या तयार करण्यात आलेल्या या सर्व औषधांची गुणवत्ता चांगली असून बाजारातल्या इतर उत्पादनांच्या तुलनेत त्यांची किंमत जवळजवळ 26 टक्क्यांनी कमी आहे.
प्रधानमंत्री भारतीय जन औषधी (जनौषधी) योजना
गरीब, निम्न मध्यम वर्ग आणि मध्यम वर्गाला परवडण्याजोग्या दरात औषधे उपलब्ध व्हावीत आणि त्यांच्यावरचे आर्थिक ओझे कमी व्हावे, या उद्देशाने 1 जुलै 2015 रोजी “प्रधानमंत्री भारतीय जन औषधी (जनौषधी) योजना” लागू करण्यात आली. परंतु मुळात ही योजना 2008 सालापासून राबवली जात आहे आणि आत्ताची योजना त्याची सुधारित आवृत्ती आहे. जनौषधी केंद्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या किंमती बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर औषधांच्या तुलनेत 50-90% कमी आहेत. सध्या देशातल्या 732 जिल्हयांमध्ये 6587 केंद्र उघडण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment