Current affairs | Evening News Marathi
Current affairs 29 July 2020 Marathi |
29 जुलै मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
“लिफास कोविड स्कोअर”: कोविड जोखीम व्यवस्थापन प्रोफाइल
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर तपासणीच्या माध्यमातून पारंपारिक चाचणीला प्राधान्य देण्यासाठी रोगाचे लवकर निदान आणि जोखीम मूल्यमापनासाठी पूरक नाविन्यपूर्ण तांत्रिक पद्धती शोधण्याच्या उद्देशाने सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड-19 हेल्थ क्रिसिस (CAWACH / कवच) या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या उपक्रमाने “लिफास कोविड स्कोअर” नावाने कोविड जोखीम व्यवस्थापन प्रोफाइल विकसित करण्यासाठी बंगळुरूच्या अकुली लॅब या स्टार्टअप कंपनीची निवड केली आहे.
कवच उपक्रमाबाबत
राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळ (NSTEDB), विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, केंद्र सरकार यांचा ‘कवच’ हा उपक्रम कोविड-19 च्या नियंत्रणासाठी बाजारात आणण्यासाठीच्या नवकल्पना आणि स्टार्टअप कल्पनांना बळ देत आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान लक्षणे नसलेल्या व्यक्तीमधील संभाव्य संसर्ग शोधेल तसेच लक्षणे न आढळणारी व्यक्ती बाधित होण्याच्या जोखमीचे मूल्यमापन करणार.
'लिफास' अॅप
अकुली लॅबकडे लवकर निदान, मूळ कारण विश्लेषण, तीव्र जोखीम मूल्यांकन, रोगनिदान आणि दीर्घकालीन रोगांवर घरी देखरेख यासाठी 'लिफास' हे क्लिनीकल-ग्रेड, नॉन-इन्व्हेसिव्ह, डिजिटल फंक्शनल बायोमार्कर स्मार्टफोन साधन आहे.
लिफास हे एक अँड्रॉइड अॅप्लिकेशन आहे ज्यात एखादी व्यक्ती मोबाइल फोनच्या मागील फोन कॅमेर्यावर 5 मिनिटे बोट ठेवते तेव्हा ते कपिलारी नाडी आणि रक्ताच्या मात्रेतले बदल टिपते. आणि अल्गोरिदम व सिग्नल प्रक्रिया तंत्रांसह 95 बायोमार्कर्स मिळतात. शरीरातल्या संकेतांचा एक समूह प्राप्त करण्यासाठी स्मार्टफोन प्रोसेसर आणि स्मार्टफोन सेन्सरची ऊर्जा हे वापरते. त्यानंतर फोटोप्लेथिस्मोग्राफी, फोटो क्रोमॅटोग्राफी, अर्टेरिअल फोटोप्लेथीस्मोग्राफी, मोबाइल स्पायरोमेट्री आणि पल्स रेट व्हेरिएबिलिटी या तत्त्वावर संकेतांवर प्रक्रिया केली जाते.
त्यानंतर लिफास कार्डियो-श्वसन, हृदय-रक्तवहिन्यासंबंधी, रक्तविज्ञान, रक्तस्त्राव, न्यूरोलॉजी आधारित घटक प्रदान करते जे शरीरातल्या सूक्ष्म पॅथोफिजियोलॉजिकल बदलांचा मागोवा घेण्यास सक्षम असतात. हे बदल पुढे ऑर्गन सिस्टम-व्यापी प्रतिसादामध्ये व्यक्त केले जातात
हे तंत्रज्ञान लोकसंख्या तपासणी, विलगीकरण केलेल्या व्यक्तींवर देखरेख आणि समुदाय प्रसार टप्प्यावर देखरेख ठेवण्यावर केंद्रित आहे.
केंद्र सरकार 23 सार्वजनिक उपक्रमांमधून निर्गुंतवणूक करणार
अर्थमंत्रालयाने 23 सार्वजनिक उपक्रमांमधून निर्गुंतवणूक करण्याची योजना तयार केली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केली आहे.
प्रस्तावानुसार, सार्वजनिक क्षेत्रातल्या 23 सरकारी कंपन्यांच्या भागभांडवलांची खासगी क्षेत्राला विक्री केली जाणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने आधीच मान्यता दिली आहे.
2020-21 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने 2.10 लक्ष कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी 1.20 लक्ष कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांमधून तर 90 हजार कोटी रुपये वित्तीय संस्थांमधील सरकारी हिस्सेदारीच्या विक्रीतून मिळतील.
निर्गुंतवणूक म्हणजे काय?
निर्गुंतवणूक म्हणजे सरकारच्या मालकी हक्कातल्या सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम, प्रकल्प किंवा इतर मालमत्तेची विक्री करणे होय. सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्याच्या किंवा विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी निधी उभा करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया चालवली जाते. आणि प्राप्त निधीतून इतर नियमित स्रोतांकडून होणाऱ्या महसुलातली तूट भरून काढता येते.
No comments:
Post a Comment