Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 30 July 2020 Marathi | 30 जुलै मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
झिम्बाब्वेसोबतच्या पारंपरिक औषधी व होमिओपथी क्षेत्रातल्या सहकार्यासंबंधीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
29 जुलै 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान पारंपरिक औषधी व होमिओपथी उपचारपद्धती क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासंबंधीच्या सामंजस्य कराराला पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी देण्यात आली.
समानता आणि परस्पर लाभाच्या जोरावर दोन्ही देशांमधील पारंपरिक औषधी क्षेत्रातील सहकार्य बळकट करणे, त्याचे संवर्धन करणे आणि विकास करणे हे या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दीष्ट आहे.
3 नोव्हेंबर 2018 रोजी या संदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या कराराच्या माध्यमातून पारंपारिक औषधी आणि होमिओपॅथीच्या प्रसारासाठी दोन्ही देशांमधील सहकार्यासाठी एक आराखडा तयार करण्यात येणार ज्याचा दोन्ही देशांतल्या पारंपारिक वैद्यकीय क्षेत्राला लाभ होणार.
झिम्बाब्वे देश
झिम्बाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतला एक देश आहे. झिम्बाब्वेच्या उत्तरेला झाम्बिया, पूर्वेला मोझांबिक, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पश्चिमेला बोत्स्वाना हे देश आहेत.
- राजधानी शहर - हरारे
- राष्ट्रीय चलन - झिम्बाब्वे डॉलर
फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (ITER) येथे कार्याला प्रारंभ झाला
28 जुलै 2020 रोजी फ्रान्समधील सेंट पॉल-लेझ-दुरांस या शहरात उभारलेल्या ITER टोकमॅकच्या असेम्ब्लीचे काम सुरु झाले. त्यानिमित्त फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी एक आभासी सोहळा आयोजित केला होता.
प्रकल्पाविषयी
आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर एक्सपिरिमेंटल रिएक्टर - ITER) हा फ्रान्समध्ये एक मोठ्या प्रमाणावर केला जाणारा वैज्ञानिक प्रयोग आहे, ज्यामधून न्यूक्लियर फ्यूजनद्वारा व्यावसायिक पातळीवर ऊर्जा तयार करणे शक्य आहे. भारत, चीन, अमेरिका, रशिया, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपीय संघ हे सात देश या प्रकल्पाचा भाग आहेत.
न्यूक्लियर फ्यूजनद्वारा ऊर्जा निर्मिती करण्याच्या उद्देशाने फ्रान्समध्ये चालविणार्या आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (ITER) संशोधन प्रकल्पासाठी उपकरणे पुरविण्यात भारताने पुढाकार घेतला आहे. ITER-भारत प्रकल्प हा संपूर्ण प्रकल्पामधील एक भाग सिरिश देशपांडे यांच्या नेतृत्वात चालवला जात आहे. आतापर्यंत पुरविण्यात आलेल्या एकूण यंत्रसामुग्रीपैकी जवळजवळ 40 टक्के भार भारतातून आला आहे.
भारत प्रकल्पाला त्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी, क्रायोस्टॅट, इन-व्हेसल शिल्ड्स, कुलिंग वॉटर, क्रायोजेनिक आणि क्रायो-डिस्ट्रिब्यूशन प्रणाली, RF आणि बीम तंत्रज्ञान वापरून सहाय्यक हीटिंग उपकरणे, मल्टिमेगा वॅट वीज पुरवठा आदी बाबींमध्ये भारताने भरीव योगदान देत आहे.
No comments:
Post a Comment