Current affairs | Evening News Marathi
Current affairs 20 June 2020 Marathi |
20 जून मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
‘सत्यभामा’: खनिकर्म क्षेत्रात प्रगतीसाठी संशोधन व विकास संदर्भात नवे व्यासपीठ
Satyabhama ': A new platform for research and development in the field of mining
केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते दिनांक 15 जून 2020 रोजी खाण मंत्रालयाच्या अंतर्गत ‘सत्यभामा’ (खनिज प्रगतीमध्ये आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान व तंत्रज्ञान योजना उर्फ SATYABHAMA) या संकेतस्थळ आधारित व्यासपीठाचा शुभारंभ करण्यात आला.
जोशी यांनी खाण व खनिज क्षेत्रातील वैज्ञानिक आणि संशोधकांना आत्मनिर्भर भारतासाठी गुणात्मक व नाविन्यपूर्ण संशोधन व विकास कार्य करण्याचे आवाहन केले आहे.
ठळक बाबी
- राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) आणि खाण माहिती विभागाद्वारे व्यासपीठाची रचना, विकास आणि अंमलबजावणी करण्यात आली आहे.
- हे व्यासपीठ प्रकल्पांवर ऑनलाईन लक्ष ठेवण्यासोबतच वैज्ञानिक / संशोधकांकडून सादर केलेले संशोधनाचे प्रस्ताव आणि त्यासाठी दिलेला निधी/अनुदान वापरण्यास परवानगी देते. संशोधक यावर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रकल्पांचे प्रगती अहवाल आणि अंतिम तांत्रिक अहवाल देखील सादर करू शकतात.
- जनहितासाठी लागू केलेल्या भू-शास्त्र, खनिज अन्वेषण, खाण आणि संबंधित क्षेत्र, खनिज प्रक्रिया, इष्टतम उपयोग आणि देशाच्या खनिज स्त्रोतांच्या संवर्धनासाठी संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने खाण मंत्रालयाच्या विज्ञान व तंत्रज्ञान कार्यक्रम योजनेच्या अंतर्गत संशोधन व विकास प्रकल्प राबविण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व औद्योगिक संशोधन विभागासह मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, राष्ट्रीय संस्था आणि संशोधन व विकास संस्थांना भारत सरकारचे खाण मंत्रालय निधी प्रदान करते. व्यासपीठामुळे योजनेच्या अंमलबजावणीची कार्यक्षमता आणि प्रभावीपणा वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.
IIT गुवाहाटीच्या संशोधकांकडून कोविड-19 च्या निदानासाठी स्वस्त टेस्ट किट विकसित
Researchers from IIT Guwahati have developed an inexpensive test kit for the diagnosis of Kovid-19
कोविड-19 विषाणूच्या संसर्गाच्या निदानासाठी आर.आर. अॅनिमल हेल्थकेअर लिमिटेड आणि गुवाहाटी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुवाहाटीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) इथल्या संशोधकांनी स्वस्त अश्या तीन वेगवेगळ्या टेस्ट किट (म्हणजेच तपासणी संच) विकसित केल्या आहेत; त्यामध्ये व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया (VTM) किट, RT-PCR किट आणि RNA आयसोलेशन किटचा समावेश आहे.
ठळक बाबी
- नाक आणि घशातून नमुने घेऊन ते सावधपणे जपण्यासाठी आणि तपासणीसाठी पाठवण्यातली पहिली पायरी VTM किट बजावते. या कालावधीत नमुन्यात विषाणू असले तर तो नमुना तपासणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्यवस्थित राखणे आवश्यक असते. या संचात SARS-CoV-2 विषाणूचे नमुने घेणे व वाहून नेणे या दरम्यान वापरण्यासाठी एक साधारण द्रावण असते.
- या संचात दोन वाहक माध्यमे आहेत - एक नासिकाद्रवासाठी तर दुसरा घशातून काढलेल्या स्रावासाठी. रोग नियमन व प्रतिबंध केंद्राने (CDC) सुद्धा प्रमाणित केल्यामुळे हे दोन्ही वापरासाठी सुरक्षित आहेत. याचे संपूर्ण संच हे विषाणू नमुने जमा करणे, वाहतूक, संरक्षण आणि दीर्घ कालावधीसाठी साठवण यासाठी योग्य आहेत.
- निर्जंतुकीकरण केलेल्या तपासणी संचासोबत संस्थेनी आर. आर. अॅनिमल हेल्थकेअर लिमिटेडच्या सहयोगाने RNA आयसोलेशन किट आणि RT-PCR किट विकसित केले आहेत. आयसोलेटेड आणि प्युरीफाईड RNA मधून एन्झाईम रिवर्स ट्रान्सक्रिप्शनद्वारे DNA मिळवला जातो. त्यामुळे कोविड-19ची शक्यता आहे किंवा नाही हे स्पष्ट होते.
- या संचाच्या किंमती कमी राखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) शिफारशीनुसार स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारा कच्चा माल वापरण्यात आला आहे. व्यापक पातळीवर या संचांचे उत्पादन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment