Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, July 12, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 12 July 2020 Marathi | 12 जुलै मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 12 July 2020  Marathi |
       12 जुलै  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स



    विद्यार्थ्यांसाठी अटल इनोव्हेशन मिशनचे ‘ATL ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाच्या आवाहनाच्या अनुषंगाने भारतीय मोबाइल ॲप नाविन्यपूर्ण पद्धतीने विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने (AIM) देशभरातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी 'अटल टिंकरींग लॅब (ATL) ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल’ सादर केले आहे.
    ‘ATL ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल हा एक ऑनलाईन अभ्यासक्रम असून पूर्णपणे मोफत आहे. 6 प्रकल्प-आधारित शैक्षणिक सामग्री पद्धती आणि ऑनलाईन मार्गदर्शक सत्राद्वारे तरुण नवनिर्माते विविध भारतीय भाषांमध्ये मोबाइल अॅप तयार करण्याचे शिकू शकतात आणि त्यांचे कौशल्य दाखवू शकतात. याव्यतिरिक्त, शालेय शिक्षकांमध्ये ॲप विकासासाठी क्षमता आणि कौशल्य तयार करण्यासाठी, अटल इनोव्हेशन मिशनच्या ॲप डेव्हलपमेंट अभ्यासक्रमात ठराविक कालांतराने शिक्षक प्रशिक्षण सत्र आयोजित केले जाणार आहेत.
    अटल इनोव्हेशन मिशनच्या महत्वाकांक्षी अटल टिंकरींग लॅब उपक्रमाच्या अंतर्गत भविष्यात शालेय विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढविण्याबरोबरच त्यांना ॲप वापरकर्त्यांकडून ॲप निर्माते बनविण्याचे उद्दीष्ट ठेवून प्लेझ्मो या भारतीय स्टार्टअप कंपनीच्या सहकार्याने ATL ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल सुरू करण्यात आले आहे.
    आतापर्यंत अटल इनोव्हेशन मिशनद्वारे देशभरातल्या 660 हून अधिक जिल्ह्यांमध्ये 5100 पेक्षा अधिक अटल लॅब सुरू आहेत आणि दोन दशलक्षाहूनही अधिक विद्यार्थ्यांना टिंकरिंग लॅबमध्ये प्रवेश आहे.



    भारतातल्या व्याघ्र गणनेनी कॅमेरांद्वारे मोठ्या प्रमाणात वन्यजीव सर्वेक्षण करून विक्रम केला

    भारतात दर चार वर्षांनी होणाऱ्या ‘राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018’ याच्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातल्या व्याघ्र गणनेनी नवीन गिनीज विश्व विक्रम स्थापित केला आहे.
    सन 2018-19 मध्ये केलेले सर्वेक्षण हे संसाधन आणि माहिती या दोन्ही गोष्टी संग्रहीत करण्याच्या दृष्टीने आजपर्यंतचे सर्वात व्यापक सर्वेक्षण होते.
    ठळक बाबी
    • वेगवेगळ्या 141 क्षेत्रात 26,838 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते आणि त्याद्वारे 121,337 चौरस किलोमीटर (46,848 चौरस मैल) क्षेत्रफळाचे प्रभावी सर्वेक्षण करण्यात आले. या सापळा रुपी कॅमेऱ्यांनी वन्यजीवांची 34,858,623 छायाचित्रे हस्तगत केली. त्यात 76,651 वाघ आणि 51,777 बिबट्या होते; बाकीचे इतर स्थानिक प्राणी होते.
    • नव्या गणनेनुसार, देशात सुमारे 2967 वाघ आहेत. जागतिक व्याघ्र संख्येच्या 75 टक्के वाघांचे वस्तीस्थान भारत आहे.
    • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प निर्धारित वेळेच्या चार वर्ष आधीच भारताने पूर्ण केला आहे. 2022 सालापर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा सेंट पीटर्सबर्ग येथे 2010 साली केलेला संकल्प भारताने आधीच पूर्ण केला आहे.
    चार वर्षातून एकदा होणारी राष्ट्रीय व्याघ्र गणना ही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे भारतीय वन्यजीव संस्थेच्या तांत्रिक सहकार्यातून राबविण्यात येत असून राज्य वनविभाग व हितधारक त्याची अंमलबजावणी करीत आहेत. नऊ व्याघ्र क्षेत्रांवर सुरु करण्यात आलेला ‘प्रोजेक्ट टायगर’ सारखा प्रजाती विशेष कार्यक्रम आता 50 व्याघ्र क्षेत्रांवर सुरु आहे.

    No comments:

    Post a Comment