Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, June 16, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 16 June 2020 Marathi | 16 जून मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 16 June 2020  Marathi |
       16 जून  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स



    इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX): भारतातला पहिला राष्ट्रव्यापी ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंच

    पेट्रोलियम व नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX) या नावाने भारतातल्या पहिल्या राष्ट्रव्यापी ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंचाच्या कार्याला सुरुवात करण्यात आली.
    मुख्य बाबी
    • ‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX) याच्या माध्यमातून नैसर्गिक वायूच्या वितरणासाठी व्यापार मंच म्हणून कार्य करण्यात येणार आहे.
    • भारतामध्ये ऊर्जा बाजार मंचाचे पूर्ण स्वामित्व असलेली ‘इंडियन एनर्जी एक्सचेंज’ (IEX) या कंपनीची उपकंपनी म्हणून IGX कार्यरत राहणार आहे.
    • नैसर्गिक वायू बाजारपेठेतल्या सर्व सहभागींना प्रमाणित मानकांनुसार व्यापार करण्यासाठी ही नवीन कंपनी समर्थ असणार आहे.
    • या मंचामुळे ग्राहकांना कोणत्याही समस्येविना, अडथळ्याविना व्यापार करणे शक्य होणार आहे.
    • IGX याचे कामकाज पूर्णपणे संकेतस्थळ-आधारित मंचच्या मदतीने करण्यात येणार आहे.
    IGXचे भविष्यकालिन फायदे
    • नैसर्गिक वायू व्यापारासाठी सुरू केलेल्या या नवीन इलेक्ट्रॉनिक मंचामुळे भारतातल्या ऊर्जा क्षेत्रामध्ये एका नवीन अध्यायाला प्रारंभ झाला. यामुळे नैसर्गिक वायूसाठी मुक्त बाजार मूल्य निर्धारण करण्याच्या दिशेने देशाला पुढे पावले टाकण्यासाठी मदत मिळणार आहे.
    • बाजार संचलित मूल्य निश्चिती प्रणाली असल्यामुळे इंडिया गॅस एक्सचेंज (IGX) नैसर्गिक वायूसाठी मुक्त बाजार साकार करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावू शकणार आहे.
    • पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) देशातल्या सर्व भागामध्ये नैसर्गिक गॅस योग्य दरामध्ये उपलब्ध व्हावा यासाठी दरांच्या सुसूत्रीकरणावर भर दिला जाणार आहे. या मंचमुळे मुक्त बाजारपेठेमध्ये ग्राहकांचा विचार मूल्यनिर्धारण करताना करणे शक्य होणार आहे. IGX बाजारपेठेतले चढ-उतार लक्षात घेवून किंमत निश्चित करू शकणार आहे.
    • IGXच्या माध्यमातून LNG टर्मिनल, गॅस पाइपलाईन, CGD पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेचा कल पाहून किंमत यंत्रणा यासंबंधी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार, अशी अपेक्षा आहे.
    भारताची अर्थव्यवस्था LNG आधारित बनवण्यासाठी हाती घेतलेली कार्ये
    • देशाकडे लवकरच 50 MMT एवढी LNG टर्मिनल क्षमता असणार आहे.
    • देशाने कतार, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि अमेरिका यांच्यासारख्या अनेक देशांबरोबर दीर्घकालीन LNG करार केले आहेत. तसेच मोझांबिक, रशिया आणि इतर देशांमध्ये अतिशय महत्वाच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूकही केली आहे.
    • देशामध्ये LNG विषयक पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी ऊर्जा गंगा, पूर्व भारत ग्रिड, ईशान्येकडे इंद्रधनुष प्रकल्प, धमरा-दहेज गॅसवाहिनी प्रकल्प, कोळसा गॅसीफिकेशन प्रकल्प आणि CBM कार्यशैली यासारख्या योजना सध्या कार्यरत आहेत.
    • येत्या काही वर्षामध्ये देशात 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त पाइपलाईन तयार असणार आहे.



    “कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी” यात भारत सहभागी

    “कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी (Global Partnership on Artificial Intelligence अर्थात GPAI किंवा Gee-Pay) याची स्थापना करण्यासाठी भारत सरकार अमेरिका, ब्रिटन, युरोपीय महासंघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, मेक्सिको, न्यूझीलंड, कोरिया, सिंगापूर यासारख्या आघाडीच्या प्रमुख अर्थव्यवस्थांच्या समूहामध्ये सहभागी झाला आहे.
    मानवी हक्क, सर्वसमावेशकता, विविधता, नवसंशोधन तसेच आर्थिक वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence -AI) तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्ण विकास आणि वापराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी “कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी” (GPAI) हा अनेक हितधारकांचा आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे.
    “कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी” (GPAI) एका सचिवालयाद्वारे व्यवस्थापित केली जाणार आहे, ज्याचे यजमानपद पॅरिस या शहरातली आर्थिक सहकार व विकास संघटना (OECD) तसेच मॉन्ट्रियल (कॅनडा) आणि पॅरिस (फ्रान्स) या शहरांमध्ये असणारी तज्ञांची दोन केंद्रे हे भूषवतील.
    ठळक बाबी
    • सहभागी देशांचा अनुभव आणि विविधता यांचा उपयोग करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आसपासची आव्हाने आणि संधी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे.
    • हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्राधान्यक्रमांवर आधारित उपक्रमांना सहाय्य करून कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित सिद्धांत आणि कृती यांच्यातले अंतर कमी करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न असणार आहे.
    • भागीदार आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहकार्याने GPAI कृत्रिम बुद्धिमतेच्या जबाबदार उत्क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, नागरी समाज, सरकारे आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या आघाडीच्या तज्ञांना एकत्र आणणार.
    • GPAI कोविड-19 विषाणूच्या विद्यमान जागतिक संकटाला चांगला प्रतिसाद देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा लाभ घेता येऊ शकतो, हे दर्शविण्यासाठी कार्यपद्धती विकसित करणार.
    भारताने अलिकडेच राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणि राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता संकेतस्थळ सुरू केले आहे; तसेच विकासाला पूरक मानवी दृष्टिकोनाचा समावेश आणि सबलीकरणासह शिक्षण, कृषी, आरोग्य सेवा, ई-कॉमर्स, वित्त पुरवठा, दूरसंचार इत्यादी विविध क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ उठवण्यास सुरवात केली आहे. संस्थापक सदस्य म्हणून GPAIमध्ये सामील झाल्यामुळे समावेशक वाढीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अनुभवाचा फायदा घेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक विकासात भारताला आता सक्रियपणे सहभागी होता येणार. 

    No comments:

    Post a Comment