Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 June 2020 Marathi |
15 जून मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी फिट इंडिया चळवळ आणि मनुष्यबळ मंत्रालयात करार
‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत भारतातल्या 10 देशी खेळांना प्रोत्साहन देणार्या विशेष चित्रपटांची मालिका सुरू करण्यासाठी युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाचा ‘फिट इंडिया’ कार्यक्रम आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांच्यादरम्यान करार झाला.
भारतीय तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी आणि देशी खेळांच्या समृद्ध वारसा प्रदर्शित करण्याच्या प्रयत्नात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. भारतीय खेळांविषयी जागृती निर्माण करणे आणि या खेळाशी संबंधित असलेल्या राज्यांविषयी जागृती करणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.
या कार्यक्रमातून गटका, कबड्डी, कलारिपयट्टू, खो-खो, मल्लखांब, रोल बॉल, स्के, शूटिंग बॉल, थांग-ता आणि रस्सीखेच या खेळांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
कृषिवनीकरण शेतकर्यांना उद्योगाशी जोडण्यासाठी वेबिनारचे आयोजन
13 जून 2020 रोजी कृषीवनीकरण क्षेत्रातल्या शेतकर्यांना उद्योगाशी जोडण्यासाठी आणि वाण / प्रजातींची योग्य निवड करण्यात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अंमलबजावणी करणार्या राज्यांमध्ये जनजागृती करण्याबाबत उपाययोजना आणि चर्चा करण्यासाठी वेबिनार (आभासी परिसंवाद) आयोजित करण्यात आले होते. कृषी सहकार्य व शेतकरी कल्याण विभागाचे सचिव संजय अग्रवाल या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
कार्यक्रमादरम्यान, कृषी क्षेत्रातल्या विविध सुधारणा अधोरेखित केल्या गेल्या. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होता –
- 1.63 लक्ष कोटी रुपये खर्च
- आंतरराज्यीय व्यापारातले अडथळे दूर करून आणि कृषी उत्पादनांची ई-ट्रेडिंग सुविधा पुरवून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय बाजारपेठ स्थापन करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जिथे शेतमाल विक्री करायची आहे तेथे बाजारपेठ निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी ‘शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) अध्यादेश 2020’
- शेतकर्यांना अतिरिक्त उत्पन्न, विशेषत: महिला बचत गटांसाठी रोपवाटिका, हिरवा चारा, शेंगायुक्त प्रजाती लागवडीद्वारे खतांची गरज कमी करणे, हवामान बदलाशी लढा देण्यासाठी कार्बन कमी करणे यांसारखे कृषीवनीकरणाचे बहुविध उपयोग
चर्चा झालेल्या इतर बाबी
- पंतप्रधानांनी आपल्या स्थानिकांसाठी केलेले व्होकल फॉर लोकल आवाहन कृषीवनीकरणासाठी अगदी संयुक्तिक आहे. काही महत्त्वपूर्ण वस्तूंमधील आयात अवलंबत्व कमी करण्यासाठी कृषीवनीकरण उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा वाढविण्यास हातभार लावू शकते.
- औषधी आणि सुगंधी वनस्पती, रेशीम, लाख, कागद व लगदा, जैव-इंधन उत्पादनासाठी वृक्षजन्य तेलबिया अश्या अनेक क्षेत्रामुळे शेतकर्यांना त्वरित परतावा मिळतो आणि उद्योगांची गरज पूर्ण होते.
- आयातीवर अवलंबून असलेल्या कागद उद्योगांना कच्च्या मालाच्या पुरवठ्यात येणाऱ्या अडचणीं संबंधित विषयांवर चर्चा झाली.
- राज्यांना पेरणीपूर्व, लागवड आणि कापणी दरम्यान पिकाच्या धर्तीवर कंत्राटी शेतीला प्रोत्साहन देण्याचा सल्ला देण्यात आला.
पार्श्वभूमी
2014 साली राष्ट्रीय कृषीवनीकरण धोरण आखणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे. राज्यांना शेतकऱ्यांना पिकांसह वृक्ष लागवडीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करता यावे यासाठी पाठपुरावा म्हणून 2015 साली कृषीवनीकरण उप-मोहीम सुरू करण्यात आली. ICAR आणि ICFRE यासह संशोधन संस्थांकडून कृषिवनीकरण मॉडेल क्षेत्र निहाय विकसित केली गेली आहेत. ही योजना सध्या देशातील 21 राज्यात राबवली जात आहे.
No comments:
Post a Comment