Current affairs | Evening News Marathi
Current affairs 17 June 2020 Marathi |
17 जून मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन: 17 जून
दरवर्षी 17 जून या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन’ पाळला जातो. वाळवंटीकरण व दुष्काळाचा सामना करण्याविषयी केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
2020 सालाची संकल्पना - “फूड.फीड.फायबर. – द लिंक्स बिटविन कन्जम्पशन अँड लँड”.
या वर्षी वाळवंटीकरण आणि जमिनीचा पोत कमी होणे याचा वाढत्या लोकसंख्येशी कसा संबंध आहे, त्याबाबत सार्वजनिक दृष्टीकोन बदलण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
वाढती लोकसंख्या, श्रीमंत आणि अधिक शहरी होत असल्यामुळे, अन्न, वस्त्र आणि पशू-खाद्य यांची पूर्तता करण्यासाठी भूमीची अधिकाधिक मागणी आहे. त्यातच, हवामान बदलांमुळे अस्तित्त्वात उपयोगात येणाऱ्या शेतीयोग्य भूमीचे आरोग्य आणि उत्पादकता कमी होत चालली आहे.
2050 सालापर्यंत होणाऱ्या दहा अब्ज लोकसंख्येच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पुरेशी उत्पादक भूमी उपलब्ध होण्यासाठी, जीवनशैली बदलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे वैयक्तिक मागणी पूर्ण करताना पर्यावरणावर प्रभाव कसा कमी करता येणार याविषयी लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न यावर्षी केला गेला आहे.
काही तथ्य
- पूर्वी उपलब्ध असलेल्या उत्पादनक्षम भूमीपैकी आज दोन अब्ज हेक्टरपेक्षा जास्त भूमीचा कस कमी झाला आहे. 2030 सालापर्यंत पीक घेण्यासाठी अतिरिक्त 300 दशलक्ष हेक्टर भूमी लागणार आहे.
- 70 टक्के पेक्षा जास्त नैसर्गिक परिसंस्थेचे शेतीत रूपांतर झाले आहे. 2050 सालापर्यंत हे 90 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.
- 2030 सालापर्यंत वस्त्रोद्योगाने 35 टक्के अधिकची भूमी (जवळपास 115 दशलक्ष हेक्टर) वापरण्याचा अंदाज वर्तविला आहे.
‘IMD वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ यामध्ये भारताचा 43 वा क्रमांक
इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) या संस्थेनी त्यांचा ‘वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात 63 अर्थव्यवस्थांच्या कामगिरीबद्दल स्पष्टता दिली गेली आहे.
कमकुवत पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रात अपर्याप्त गुंतवणूक यासारख्या काही परंपरागत धोरणांमुळे भारताला “जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2020” या क्रमवारीत 43 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
भारतासाठी, दीर्घकालीन रोजगारात वाढ, चालू खात्यातली शिल्लक, उच्च तंत्रज्ञानाची निर्यात, परकीय चलन साठा, शिक्षणावरील सार्वजनिक खर्च, राजकीय स्थैर्य आणि एकूणच उत्पादकता या क्षेत्रांमध्ये सुधारणा नोंदविण्यात आल्या आहेत. तथापि, विनिमय दर स्थिरता, वास्तविक GDP वृद्धी, स्पर्धात्मक कायदे आणि कर यासारख्या क्षेत्रात स्थिती कमकुवत झाली आहे.
इतर ठळक बाबी
- या 63 अर्थव्यवस्थांच्या यादीत सिंगापूर या देशाने पहिले स्थान कायम राखले आहे.
- सिंगापूरच्या यशामागील घटक म्हणजे त्याची मजबूत आर्थिक कामगिरी जी भक्कम आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक, रोजगार आणि कामगार बाजारपेठेच्या उपायांमुळे उद्भवते. शिक्षण प्रणाली आणि दूरसंचार, इंटरनेट बँडविड्थ वेग आणि उच्च तंत्रज्ञानाची निर्यात यासारख्या तंत्रज्ञानात्मक पायाभूत सुविधांमधील स्थिर कामगिरी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
- सिंगापूरच्या पाठोपाठ अनुक्रमे द्वितीय ते पाचव्या क्रमांकावर, डेन्मार्क, स्वित्झर्लँड, नेदरलँड्स आणि हाँगकाँग SAR या देशांचा क्रम लागतो आहे.
- मध्य-पूर्व प्रदेश तेलाच्या संकटामुळे नकारात्मकपणे प्रभावित झाले आहे.
- BRICS देशांमध्ये चीननंतर भारत द्वितीय क्रमांकावर आहे. त्यानंतर जागतिक यादीत रशिया 50 वा, ब्राझील 56 वा आणि दक्षिण आफ्रिका 59 व्या क्रमांकावर आहे.
- सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या ASEAN देशांमध्ये केवळ सिंगापूर आणि थायलंड या देशांची आरोग्यासेवा संबंधी पायाभूत सुविधांच्या परिणामकारकतेत सकारात्मक कामगिरी आहे.
No comments:
Post a Comment