Current affairs | Evening News Marathi
Current affairs 14 June 2020 Marathi |
14 जून मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
जागतिक बालमजुरी विरोधी दिन: 12 जून
जगभरात दरवर्षी 12 जून या तारखेला ‘जागतिक बालमजुरी विरोधी दिन (World Day Against Child Labour)’ पाळला जातो. 2020 या वर्षी “कोविड-19: प्रोटेक्ट चिल्ड्रेन फ्रॉम चाइल्ड लेबर, नाऊ मोअर दॅन एव्हर” या संकल्पनेखाली हा दिवस पाळण्यात आला आहे.
या दिनानिमित्त, संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनी (ILO) “कोविड-19 अँड चाइल्ड लेबर: ए टाइम ऑफ क्रिसीस, ए टाइम ऑफ अॅक्ट” या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार बालमजुरीत अडकलेल्या बालकांची संख्या वर्ष 2000 पासून आतापर्यंत 94 दशलक्षांनी कमी झाली, परंतु कोविड-19 महामारीमुळे आणखी लाखो बालमजुरीकडे वळू शकतात.
बालमजुरीबाबत जागतिक सचित्र
जगभरात 5 ते 17 वर्षे वयोगटातली 218 दशलक्ष बालके कामगार आहेत. त्यापैकी 152 दशलक्ष सक्तीने काम करीत आहेत. त्यातले निम्मे 73 दशलक्ष धोकादायक कामांमध्ये गुंतलेले आहेत. जागतिक मालमजुरीच्या निम्मे आफ्रिकेत (72.1 दशलक्ष) आहेत, 62.1 दशलक्ष आशिया व प्रशांत क्षेत्रात, 10.7 दशलक्ष अमेरिका खंडात, 1.2 दशलक्ष अरब खंडात आणि 5.5 दशलक्ष युरोप व मध्य आशियामध्ये आहेत.
पार्श्वभूमी
बालमजुरीच्या समस्येवर जागतिक स्तरावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक कारवाई व प्रयत्न करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याने 2002 साली जागतिक बालमजुरी विरोधी दिनाची स्थापना केली.
या दिवशी बालमजुरीच्या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी आणि अश्या बालकांना मदत करण्यासाठी कश्याप्रकारे कार्य केले जाऊ शकते, या संदर्भात निर्णय घेण्याकरिता सरकार, नियोक्ते आणि कामगार संघटना, नागरी समाज आणि जगभरातील लाखो लोक एकत्र येतात.
बालमजुरीसंदर्भात समस्येला हाताळण्यासाठी सिद्धांतपूर्ण मार्गदर्शनासाठी ILO कडून 1919 साली ‘किमान वय करार क्र. 138’ आणि 1999 साली ‘बालमजुरीचे वाईट प्रकार करार क्र. 182’ तयार केले गेले. यांच्या मार्गदर्शनाखाली बालमजुरी नाहीसे करण्यासाठी ‘बालमजुरीवर ILO कार्यक्रम (IPEC)’ कार्य करते.
रिझर्व्ह बँकेनी बँकेचे CEO आणि पूर्ण-वेळ संचालकांसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष करण्याचा प्रस्ताव मांडला
बँकिंग क्षेत्रातला कारभार सुव्यवस्थित करण्याच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँकेनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालक या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष करण्याचा आणि प्रवर्तक गटाशी संबंधित असलेल्यांसाठी जास्तीत जास्त 10 वर्षाचा कार्यकाळ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
चांगल्या प्रशासन प्रवृत्तीची प्रबळ संस्कृती क्षेत्रात रुजविण्यासाठी आणि मालकांना व्यवस्थापनातून वेगळे करण्याचे सिद्धांत अवलंबण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालक या पदांसाठीचा कार्यकाळ मर्यादित ठेवणे इष्ट आहे, असे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.
इतर प्रस्तावित बाबी
- प्रवर्तक गटाशी संबंधित असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालकांनी दहा वर्षानंतर व्यवस्थापकीय नेतृत्त्व व्यवसायिकांकडे सोपविणार.
- मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालक या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षापेक्षा कमी करण्याचा निर्णय स्वतंत्र बँकेचे संचालक मंडळ घेवू शकते.
- जो प्रवर्तक / प्रमुख भागधारक नाही असा व्यवस्थापकीय कार्यकारी सलग 15 वर्षांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालक पदावर राहू शकतो. अशी व्यक्ती तीन वर्षांच्या मुदतीनंतरच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालक पदावर पुन्हा नियुक्त करण्यासाठी पात्र ठरू शकते. या तीन वर्षांच्या कालावधीत ती व्यक्ती स्वतंत्र किंवा अप्रत्यक्षपणे सल्लागार किंवा अन्य कोणत्याही प्रकारे बँकेशी संबंधित राहणार नाही.
- 10 किंवा 15 वर्ष पूर्ण केली आहेत अश्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालकांना दोन वर्ष अधिक दिले पाहिजेत, ज्यादरम्यान ते आपला उत्तराधिकारी शोधतील.
No comments:
Post a Comment