Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, May 9, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 9 May 2020 Marathi | 9 मे मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 9 May 2020  Marathi |
       9 मे  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स


    सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने नाट्य क्षेत्रातल्या ज्येष्ठ कलाकारांकडून वेबिनारचे आयोजन

    कोविड-19 मुळे लागू असलेल्या टाळेबंदी दरम्यान सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने (NSD) 10 मे 2020 पासून एक आठवडाभर दररोज नाट्य क्षेत्रातल्या ज्येष्ठ कलाकारांद्वारे एका वेबिनारचे (थेट व्हीडियोद्वारे परिसंवाद) आयोजन केले आहे. इच्छुक लोक NSDच्या यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेजवर या वेबिनारमध्ये सहभागी होऊ शकतात.
    कार्यक्रमात प्रा. सुरेश शर्मा, प्रा. अभिलाष पिल्लई, दिनेश खन्ना, अब्दुल लतीफ खटाणा, हेमा सिंग, एस. मनोहरन, सुमन वैद्य, राजेश तैलंग यांचे व्याख्यान असणार.
    ठळक बाबी
    • दररोज एक तासाचे हे वेबिनार संध्याकाळी 4 वाजता सुरू होणार आणि लोकांना प्रश्न-उत्तरासाठी 30 मिनिटे अतिरिक्त मिळणार.
    • वेबिनारमध्ये केवळ रंगमंचाच्या इतिहासावर आणि समीक्षेवरच नव्हे तर डिजिटल माध्यमातून व्यवहारिक प्रशिक्षण देण्यावर देखील भर दिला जाणार आहे.
    • व्याख्याने, लेक-डेम, मास्टर क्लास, नाट्य आणि इतर कला क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींशी संवाद तसेच भारतीय रंगभूमीच्या महान कलाकारांबरोबर सखोल चर्चा यांचा यात समावेश असणार. या संवादामुळे संशोधनासाठी आणि अभ्यासासाठी एक संसाधन सामग्री उपलब्ध होणार.
    • देशातल्या काना-कोपऱ्यातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे त्यांच्या घरगुती क्षेत्रापर्यंतच मर्यादित आहेत आणि नियमित रंगमंचाच्या अभ्यासाच्या संपर्कात नाहीत अशांसाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने हा उपक्रम आखला आहे.



    भारत सरकार आणि AIIB यांच्या दरम्यान कोविड-19 मदतीसाठी 500 दशलक्ष डॉलरच्या करारावर स्वाक्षऱ्या

    कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सज्जता बळकट करण्यासाठी भारत सरकार आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) या संस्थेच्या दरम्यान 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढ्या रकमेच्या “कोविड19 आपत्कालीन मदत आणि आरोग्य यंत्रणा सज्जता प्रकल्प”वर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
    ही मदत देशातल्या सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळणार असून त्यातून बाधित लोक, धोका असलेले लोक, वैद्यकीय आणि आपत्कालीन कर्मचारी आणि सेवा पुरवठादार, वैद्यकीय आणि चाचणी सुविधा,राष्ट्रीय आणि प्राणी आरोग्य संस्था यांच्या गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत.
    इतर ठळक बाबी
    • बॅंकेकडून भारताला आरोग्य क्षेत्रासाठी देण्यात आलेली ही पहिलीच मदत आहे.
    • या प्रकल्पामुळे भारतात कोविड19 रोगाचा प्रसाराचा वेग कमी करणे केंद्र सरकारला शक्य होणार. PPE खरेदी, ऑक्सिजन आणि औषधे वितरण प्रणालीची व्याप्ती वाढवणे, कोविड-19 आणि भविष्यातल्या अन्य रोगांच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्य सार्वजनिक आरोग्य, प्रतिबंध आणि रुग्ण व्यवस्थापन यासाठी लवचिक आरोग्य यंत्रणा उभारणे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने काम करणाऱ्या भारतीय आणि इतर जागतिक संस्थांद्वारे कोविड-19 वरील संशोधनाला सहाय्य करणे आणि प्रकल्पाच्या समन्वय तसेच व्यवस्थापनासाठी सार्वजनिक व्यवस्था  बळकट करणे यांसारख्या उपाययोजनांना गती मिळणार.
    • या प्रकल्पाला जागतिक बँक आणि AIIB कडून एकूण 1.5 अब्ज डॉलर एवढ्या निधीचे अर्थसहाय्य असून त्यातले 1 अब्ज डॉलर जागतिक बँक तर 500 दशलक्ष डॉलर AIIB पुरविणार आहे.
    • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) यांच्यामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

    No comments:

    Post a Comment