Current affairs | Evening News Marathi
Current affairs 8 May 2020 Marathi |
8 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
कोविड-19 परिस्थितीचा आयुष आधारित आंतरशाखा अभ्यास आणि 'आयुष संजीवनी' अॅपचे उद्घाटन
AYUSH based interdisciplinary study of Covid-19 situation and inauguration of 'AYUSH Sanjeevani' app
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते ‘आयुष संजीवनी’ या मोबाइल अॅपचे आणि कोविड-19 परिस्थितीशी संबंधित आयुष (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) उपचारपद्धती विषयक दोन प्रकारच्या अभ्यासांचा प्रारंभ केला गेला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष आणि डॉ भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखालच्या आंतरशाखा आयुष संशोधन आणि विकास कृती दलाने देशातल्या विविध संस्थांच्या तज्ञांशी चर्चा करून आणि आढावा घेऊन अभ्यासक्रमासाठी आराखडा निश्चित केला आहे. अश्वगंधा, यष्टीमधु, गुडूची आणि पिपळी यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
प्रामुख्याने दोन क्षेत्रात हे काम करण्यात येणार, ते पुढीलप्रमाणे आहेत -
- कोविड-19 महामारीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिबंधक म्हणून अश्वगंधा
- कोविड-19 ची सौम्य ते मध्यम लक्षणे असणाऱ्यासाठीच्या उपचाराकरिता प्रमाणित काळजीच्या बरोबरीने आयुर्वेद घटकांचा प्रभाव
ठळक बाबी
- 'आयुष संजीवनी' अॅपमुळे आयुष उपाययोजना आणि सूचनांचा नागरिकांनी केलेला स्वीकार आणि उपयोग तसेच कोविड-19 रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी आयुषचा प्रभाव याविषयी माहिती उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे.
- आयुष उपचारपद्धती विषयक दोन प्रकारच्या अभ्यासांमध्ये एकात कोविड-19 साठी घ्यावयाची काळजी आणि रोगप्रतिबंधक औषध यासाठी आयुर्वेदाचे सहाय्य याविषयी संयुक्त वैद्यकीय संशोधन अभ्यास केला जाणार आहे. आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, CSIR या संस्थांद्वारे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय यांचा हा संयुक्त उपक्रम असून त्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) तांत्रिक सहकार्यही लाभणार आहे.
- दूसरा अभ्यास म्हणजे दाट लोकवस्तीत कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी आयुष आधारित रोग प्रतिबंधक औषधाचा प्रभाव या लोकसंख्येवर आधारित अभ्यास आहे. कोविड-19 साठी आयुष घटकांचा प्रतिबंधात्मक क्षमतेचे आणि अति धोका असलेल्या भागात जीवनमान सुधारण्यासाठी मुल्यांकन करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.
"तोमान": इराण देशाचे नवे राष्ट्रीय चलन
"Toman": Iran's new national currency
इराण देशाने त्यांचे अधिकृत राष्ट्रीय चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने ‘इराणी रियाल’ हे चलन बदलून त्याऐवजी ‘इराणी तोमान’ हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. बदललेल्या चलनानुसार एका तोमानचे मूल्य हे 10 हजार रियाल एवढे असणार आहे.
4 मे 2020 रोजी इराणच्या संसदेमध्ये यासंदर्भातला विधेयक मंजूर करण्यात आला आणि राष्ट्रीय चलनामधून चार शून्य हटवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली. केंद्रीय बँक असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इराणला चलन बदलण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.
संयुक्त राज्ये अमेरिका देशाने इराणबरोबरचा अणुकरार रद्द करण्याबरोबरच इराणवर अनेक आर्थिक निर्बंधही लादले. याच कारणामुळे इराणच्या चलनाचे मूल्य 60 टक्क्यांपर्यंत घसरले आणि रियाल डॉलरच्या तुलनेत एक लक्ष 56 हजार इतका घसरला आहे. इराणी चलनाची किंमत घसरल्याने महागाई वाढली. हीच घसरण रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून इरणने चलन बदलण्याचा निर्णय घेतला.
इराण देश
इराण हा मध्यपूर्वेतला एक देश आहे. तेहरान ही राजधानी आहे आणि रियाल हे अधिकृत चलन आहे.
No comments:
Post a Comment