Current affairs | Evening News Marathi
Current affairs 7 May 2020 Marathi |
7 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
‘वंदे भारत मिशन’: परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताची मोहीम'
Vande Bharat Mission': India's campaign to bring back Indians stranded abroad
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या सर्वात मोठ्या मोहिमेला 7 मे 2020 पासून सुरुवात झाली. ‘वंदे भारत मिशन’ असे या अभियानाचे नाव आहे.
या अभियानाच्या पार्श्वभूमीवर तिरुवनंतरपुरम, दिल्ली आणि मुंबईसह अनेक विमानतळांवर आरोग्यासंबंधी सर्व व्यवस्था केली गेली आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोविड-19 रोगाची कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत, त्यांनाच भारतात परत आणले जाणार आहे.
इतर ठळक बाबी
- एअर इंडिया या सरकारी हवाई सेवा कंपनीची विमाने आणि जहाजातून जवळपास 15 हजार भारतीयांना टप्प्याटप्प्याने मायदेशी आणले जाणार आहे. लोकांच्या वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी विमानतळे आणि बंदरे पूर्णत: सज्ज करण्यात आली आहेत.
- एकूण 64 विमानांपैकी 10 विमाने संयुक्त अरब अमिरातीकडे (UAE), 2 कतारकडे, 5 सौदी अरबकडे, 7 ब्रिटनकडे, 5 सिंगापूरकडे, 7 अमेरिकेकडे, 5 फिलिपीन्सकडे, 7 बांग्लादेशकडे, 2 बहारीनकडे, 7 मलेशियाकडे, 5 कुवैतकडे आणि 4 विमाने ओमानकडे उड्डाण करणार आहेत.
- एअर इंडिया 12 देशांमधून सुमारे 15000 भारतीयांना टप्प्याटप्प्याने परत आणणार आहे. पहिल्या टप्प्यात 13 मे पर्यंत 64 उड्डाण आयोजित केली जाणार. 13 मे 2020 नंतर खासगी विमान कंपन्याही भारतीयांना परत आणण्याच्या मोहीमेत सामील होऊ शकतात.
- भारतीय नौदलाची INS जलश्व आणि INS मगर ही जहाजे मालदीवहून भारतीयांना परत आणणार तर INS शार्दुल हे जहाज दुबईकडे वळविण्यात आले आहे.
लोकांच्या विस्थापनाबाबतचा UNICEF संस्थेचा “लॉस्ट अॅट होम” अहवाल
UNICEF's "Lost at Home" report on the displacement of people
संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या संस्थेनी स्थानिक आणि जागतिक पातळीवर झालेल्या लोकांच्या विस्थापनाबाबतचा “लॉस्ट अॅट होम” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला आहे.
अहवालातल्या ठळक बाबी
- 2019 साली जगभरात 33 दशलक्ष लोकांचे विस्थापन झाल्याची नोंद झाली असून त्यापैकी 25 दशलक्ष नैसर्गिक संकटांमुळे तर 8.5 दशलक्ष संघर्ष आणि हिंसाचारामुळे झालेले आहे. यात 12 दशलक्ष बालकांचा समावेश होता.
- याच काळात भारतात 5,037,000 लोकांचे विस्थापन झाले असून त्यापैकी 5,018,000 लोकांचे नैसर्गिक संकटांमुळे तर 19,000 लोकांचे संघर्ष आणि हिंसाचारामुळे झाले.
- 2019 साली पूर्व आशिया आणि प्रशांत क्षेत्रात सर्वाधिक स्थलांतर झाले असून त्याचे प्रमाण एकूण जागतिक प्रमाणाच्या 39 टक्के होते आणि हा आकडा सुमारे 10 दशलक्ष एवढा विक्रमी होता. दक्षिण आशियामध्ये 9.5 दशलक्ष लोकांनी स्थलांतरण केले.
- केवळ भारत, बांगलादेश, चीन आणि फिलिपिन्स या देशांमध्ये नैसर्गिक संकटांमुळे झालेल्या स्थलांतरणाचे प्रमाण जगाच्या तुलनेत 69 टक्के होते.
- 2019 सालाच्या अंती, संघर्ष आणि हिंसाचारामुळे स्थानिक पातळीवर झालेल्या स्थलांतरणाचे प्रमाण अंदाजे 46 दशलक्ष एवढे होते.
No comments:
Post a Comment