Current affairs | Evening News Marathi
Current aaffairs 5 May 2020 Marathi |
5 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
अलिप्त राष्ट्रगट चळवळ (NAM) याच्या आभासी शिखर परिषदेत पंतप्रधानांनी सहभाग घेतला
4 मे 2020 रोजी अलिप्त राष्ट्रगट चळवळ (NAM) याची आभासी शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडियो कॉन्फ्रेंसच्या माध्यमाने सहभागी झाले होते. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाविषयी
- ‘कोविड-19 विरोधात एकजूट’ ही या शिखर परिषदेची संकल्पना होती.
- NAMचे सध्याचे अध्यक्ष आणि अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलीयेव यांनी या परिषदेचे आयोजन केले होते.
- कोविड-19 विरोधातल्या लढ्यात आंतरराष्ट्रीय ऐक्याला प्रोत्साहन देणे आणि या महामारीचा मुकाबला करण्यासाठीच्या राष्ट्रांच्या आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रयत्नांना गती देणे हा या परिषदेचा उद्देश होता.
परिषदेचा ठळक अहवाल
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत आशिया, आफ्रिका, लॅटीन अमेरिका, कॅरेबिया आणि युरोपातले NAM सदस्य राष्ट्रांचे प्रमुख आणि इतर नेते या परिषदेत सहभागी झाले होते.
- NAM नेत्यांनी कोविड-19 महामारीच्या परिणामाचे मुल्यांकन करून त्यावरच्या उपायांसाठीच्या आवश्यकता आणि गरजा निश्चित केल्या आणि यावर पाठपुरावा करणाऱ्या कृतीशील उपाययोजनांचे आवाहन केले.
- कोविड-19 विरोधातल्या लढ्यात आंतरराष्ट्रीय ऐक्याचे महत्व अधोरेखित करणाऱ्या जाहीरनाम्याचा या नेत्यांनी यावेळी स्वीकार केला.
- एका कृती दलाची स्थापना करत असल्याची घोषणाही यावेळी केली गेली. कोविड-19 विरोधातल्या लढ्यात मुलभूत वैद्यकीय,सामाजिक आणि मानवी गरजा प्रतिबिंबित होणारी आकडेवारी आणि माहिती देणारी सामायिक माहिती निर्माण करून त्याच्याद्वारे सदस्य राष्ट्रांच्या आवश्यकता आणि गरजा हे कृती दल निश्चित करणार.
अलिप्त राष्ट्रगट चळवळ (NAM) विषयी
1961 साली बेलग्रेड परिषदेत अलिप्त राष्ट्रगट चळवळ (Non-Aligned Movement -NAM) अस्तित्वात आली. या चळवळीची स्थापना भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्दल नासर आणि युगोस्लाव्हियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ब्रॉज टिटो यांनी केली होती. NAM मध्ये 120 राज्यांचा सभासद म्हणून समावेश आहे. तसेच 17 राज्ये आणि 10 आंतरराष्ट्रीय संस्थांना निरीक्षकांचा दर्जा आहे.
1955 साली झालेल्या आफ्रिकी-आशियाई परिषदेत स्वीकारलेल्या ‘बंडुंग प्रिन्सिपल्स’ यांच्या तत्त्वांवर NAMची स्थापना केली गेली. NAM ही अश्या राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, जी जगाच्या कोणत्याही अधिकारीत समुहासोबत किंवा त्यांच्या विरोधात उभी राहणार नाही आणि निष्पक्षरित्या आपले कार्य करणार या निश्चयाने तयार केली गेली. याची व्याख्या ‘हवाना घोषणापत्र-1979’ मधून स्पष्ट केली गेली.
DRDOच्या प्रयोगशाळेनी अतिनील निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केला
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) याच्या दिल्लीतल्या लेजर सायंस अँड टेक्नॉलॉजी सेंटर (LASTEC) या प्रयोगशाळेनी अतिबाधित क्षेत्रांमध्ये वेगाने आणि रसायन-रहीत निर्जंतुकीकरणासाठी अतिनील (UV) निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केला आहे. या उपकरणाला ‘UV ब्लास्टर’ असे नाव देण्यात आले आहे.
संस्थेनी न्यू एज इंस्ट्रुमेंट्स अँड मटेरियल्स प्रायवेट लिमिटेड (गुरुग्राम) या कंपनीच्या सहकार्याने उपकरणाचे आरेखन केले आहे आणि विकसित केले.
उपकरणाची ठळक वैशिष्ट्ये
- हे उपकरण अतिनील किरणांच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करते.
- या उपकरणात चौफेर किरणोत्सर्ग होण्यासाठी ‘254 nm’ लहरींवर सहा दिवे बसवले आहेत. प्रत्येक दिव्याची ऊर्जा क्षमता 43 UV-C वॅट एवढी आहे.
- खोलीत विविध ठिकाणी हे उपकरण बसवता येते. त्यानुसार अंदाजे 12x12 फुट आकाराची एक खोली 10 मिनिट आणि 400 वर्ग फुटाची खोली 30 मिनिटांमध्ये निर्जंतुक केली जाऊ शकते.
- प्रयोगशाळा, कार्यालय, विमानतळ, मॉल, उपहारगृह, कारखाने अशा महत्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी याचा प्रभावी वापर करता येऊ शकतो.
- अतिनील किरणांवर आधारित निर्जंतुकीकरणासाठी वायफायचा वापर करुन मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारेही दूर ठिकाणी ही प्रक्रीया करता येऊ शकते.
No comments:
Post a Comment