Current affairs | Evening News Marathi
Current affairs 24 May 2020 Marathi |
24 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी ‘कांगारा चहा’ प्रभावी: ICMRचा दावा
कांगारा चहामधील रसायनेही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात व कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यात HIV वरील औषधांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. कांगारा चहाची हिमाचल प्रदेशात लागवड होते.
कांगारा चहात मनुष्यप्राणीच्या शरीराला लाभदायक ठरणारे गुणधर्म आहेत. IHBT संस्थेनी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कोविड-19 वर मात करण्यासाठी हे सिद्ध केले आहे. शास्त्रज्ञांना कांगारा चहात '65 बायोॲक्टीव' रसायने किंवा 'पॉलिफेनोल्स' आढळून आली. त्यांच्या संयोगाने ते विशिष्ट विषाणूवर अधिक प्रभावी ठरु शकते. सध्या HIV वरील बाजारात उपलब्ध औषधांपेक्षाही ही रसायने अधिक प्रभावी आहेत. सध्या HIV वरील मान्यताप्राप्त औषधे कोविड-19 रुग्णांवर उपचारासाठी वापरली जात आहेत.
जैवविविधतेच्या संवर्धनासाठी भारत सरकारचे पाच नवे उपक्रम
22 मे 2020 रोजी पाळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पाच महत्त्वाच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
- राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (NBA) आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) यांचा जैवविविधता संरक्षण इंटर्नशिप कार्यक्रम
- लुप्तप्राय प्रजातींची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी 'नॉट ऑल अॅनिमल्स मायग्रेट बाय चॉइस' मोहीम
- ‘जैवविविधता संवर्धन आणि जैविक विविधता अधिनियम-2002’ विषयक एक ऑनलाइन परिसंवाद (वेबिनार) मालिका
- WWF मॉडेल कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (MCoP)
- मनुष्यप्राणी प्रजातीसाठी नैसर्गिकरीत्या नि:शुल्क उपलब्ध असलेल्या पर्यावरणीय सेवांच्या माध्यमातून निसर्गाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी ‘वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड’ (WWF) या संस्थेचे पाठबळ असलेली एक जनजागृती मोहीम
No comments:
Post a Comment