Current affairs | Evening News Marathi
Current affairs 5 February 2020 Marathi |
5 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
दिल्लीच्या मुघल गार्डनमध्ये ‘उद्यानोत्सव’चा शुभारंभ
3 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात ‘उद्यानोत्सव’ या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनामागील मुघल गार्डनमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
दरवर्षी फेब्रुवारी-मार्च या कालावधीत मुघल गार्डन नागरिकांसाठी खुले करण्यात येते. यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येत नाही.
उद्यानाविषयी
मुघल गार्डनमध्ये हजारो प्रकारची विविधरंगी फुलं पहायला मिळतात. मुघल गार्डनचा इतिहास मुघल सम्राट बाबर या राजाशी जुळलेला आहे. त्यानि अशी उद्याने उभारण्यास पाऊल उचलले होते.
1911 साली इंग्रजांनी मुघल गार्डनच्या स्थापनेला सुरुवात केली. सर एडविन ल्युटियन्स ह्यांनी राष्ट्रपती भवनात उद्यानाची निर्मिती केली. हे उद्यान 15 एकरावर पसरलेले आहे. म्युझिकल गार्डन, आयुर्वेदिक फुलांचे ताटवे, बोन्साय ही मुघल गार्डनची खास वैशिष्ट्य आहेत.
या उद्यानात भारतीय आणि पाश्चात्य देशांमधील फुलांची विशेष लागवड करण्यात आली आहे. उद्यानात 159 जातीची दुर्मिळ फुले फुलवण्यात आली आहेत, तसेच 50 प्रकारची इतर झाडेही लावण्यात आली आहेत. फुलांमध्ये विशेष म्हणजे गुलाबाचे शंभराहून अधिक जाती, ट्युलिप, लिली, डॅफोडिलसह इतर मोसमी फुलांची लागवड करण्यात आली आहे.
RBI गव्हर्नर यांना शक्तिकांत दास ह्यांना ‘सेंट्रल बॅंकर ऑफ द इयर 2020 - एशिया-पॅसिफिक’ सन्मान बहाल
लंडनमधल्या ‘द बॅंकर’ या मासिकाने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास ह्यांना ‘सेंट्रल बॅंकर ऑफ द इयर 2020 - एशिया-पॅसिफिक’ सन्मान बहाल केला आहे.माजी वित्त सचिव शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे RBIमध्ये कार्यरत असणार्यालाच गर्व्हनरपद मिळण्याची परंपरा संपुष्टात आली. अर्थमंत्रालयामध्ये सहसचिव, तामिळनाडूमध्ये महसूल आयुक्त, उद्योग खात्यात सचिव पदासह विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.
भारतीय बँकांना बुडीत कर्जे आणि घोटाळे यामध्ये अनेक समस्या भेडसावल्या आहेत. अश्या परिस्थितीत त्यांनी RBIची धुरा सांभाळून उत्कृष्ट प्रदर्शन दर्शविलेले आहे. त्यांच्या या प्रयत्नांसाठी हा सन्मान दिला गेला आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment